या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथी भागवता अध्याय पहिला. श्रीगणाधिपतये नम ॥श्रीसरस्वत्यै नमः॥श्रीगुरुभ्यो नमः॥ॐ नमो श्रीजनार्दना।नाही भवअभवभावना न देखोनि मीतूंपणा।नमन श्रीचरणासद्गुरुराया ॥१॥ नमन श्रीएकदता। एकपणे तूंचि आतां । एकी दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥ २ ॥ तुजमाजी वासु चराचरा । ह्मणोनि बोलिजे लंबोदरा । यालागीं सकळाचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥ ३ ॥ तुज देखे जो नरू । त्यासी सुखाचा होय ससारू । यालागी विघ्नहरू । नामादरू तुज साजे ॥४॥ हरुप ते वदन गणराजा । चान्ही पुरुपार्थ त्याचि चाही भुजा । प्रकाशिया प्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजंदंतु ॥५॥ पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानी । नि शब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ।। ६॥ एकेचि काळी सकळ सृष्टी । आपुलेपणे देखत उंठी । तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसतुष्टी विनायका ॥७॥ सुखाचें पेलले दाँद । नाभी आवर्तला आनंद । बोधाचा मिरवे नौगवद । दिसे सन्नद्ध साजिरा ॥८॥शुद्धसत्वाचा शुलावर । कासे कसिला मनोहर । सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभती ।। ९॥ प्रकृतिपुरुप चरण दोनी । तळी घालिशी वोजावुनी । तयावरी सहजासनीं । पूर्णपणी मिरवसी ॥ १० ॥ तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधिता विघ्न न पड़े दृष्टी । तोडिसी ससारफोसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥११॥ भावे भक्त जो आवडे । त्याचे उगविसी भसाकडे । वोनि काढिसी आपणाकडे । निनिवाडे अकुशे॥१२॥साच निरपेक्ष जो नि शेख । त्याचे तूचि बाढविसी सुख । देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्ते ॥ १३ ॥ सूक्ष्माहूनि सूक्ष्म साँन । त्यामाजी तुझे अधिष्ठान । यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥ १४ ॥ पाहता नरू ना कुंजरू । व्यक्ताव्यक्कासी पैरू । ऐसा जाणोनि निर्विकारू । नमनादरू ग्रंथार्थी ॥१५॥ एशिया जी गणनाधा । मीपणे कैंचा नमिता । अकाचि जाहला कर्ता । अथकथाविस्तारा ॥ १६ ॥ आता नमूं सरस्वती । जे सारासारविवेककी । चेतनारूपें इद्रियवृत्ती । जे चाळिती सर्वदा ॥१७॥ जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक । जे प्रकाशा प्रकाशक । स्वयं देख स्वप्रभ ॥ १८ ॥ते शिवागी शक्तिउठी । जैसी डोळ्यामाजी दिठी । किवी सुर (या प्रथात पाठभेट जाड टैपान व अर्थद्योतक टीपा सूक्ष्माक्षरात दिल्या आहेत ) १ नमो जी पाठ २ येथे प्राचीन प्रयामध्ये "मस्या मागपत भावमभावं काव्यपाठत । पठनात्पद न्युत्पत्तिानप्राप्तिस्तु मकित ॥१॥" हा एक श्लोक अधिक आहे ३ खरा ४ धर्म, अर्थ, काम व मोक्ष ५ रविचन्द्रादिकालाही ६ खच्छपणे ७ एकटतु ८ क्मप्रतिपालक व ज्ञानप्रतिपादक प्रय ९ परा, पश्यती, मध्यमा आशियरी या चार वाचा १० आत्मरूपाने, सचिदानदखरूप ११ स्फूर्ति १२ वाढरे १३ भोवऱ्याप्रमाणे दोऊन राहिला १४ कटिमूषण १५ सन्निध १६ रीतसर, सारखे करुन एकपणी १७ सरतिपाश १८ समार-जन्ममरणम्म राकट ११ निजबोधरूप अकुशान २० ठहान २१ हत्ती २२ पलीकडचा ३ विवेकामुर्ती २४ प्रकाशक २५ जे स्फूर्तीची दायक २६ गतीचा उठाव ७की रसुरसत्य पुटी