या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. कैंची ॥ ५८०॥ न झुंझें ह्मणोनि रणी रिघतां । जेवीं कां घाय वाजती माथां । तेवी देहासंगें वर्ततां । देहअहंता सोडीना ॥ ८१ ॥ येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासी देहाचे बाधित भान । तेथें स्फुरे जो अभिमान । तो भर्जित जाण बीज जैसें ॥८२॥ भर्जित बीजे जाण । हो शके क्षुधाहरण । परी करितां वीजारोपण । अंकुर जाण त्या नाहीं ॥ ८३ ॥ चित्रामाजी व्याघ्र दिसे। परी वाधकत्व त्यासी नसे । तेवी भर्जित अभिमानशेपें । बाधा नसे ज्ञात्यासी ॥ ८४ ॥ चित्रींच्या वाघासी जाण । निःशेप नाही व्याघ्पण । तेवीं मुक्ताच्या देहासी जाण । देहपण असेना ॥ ८५ ॥ दृढ ठेसायल्या चैतन्यधन । स्वरूपी वृत्ति होय निमन्न । तेव्हां दिसतेही भर्जित भान । तेंही स्फुरण निमाले ॥८६॥ एशी मावळल्या स्मृती। ज्ञात्याची वर्तती स्थिती । स्वयें सांगतु श्रीपती । यथानिगुती निजबोधे ।। ८७॥ सर्व कर्मी वर्तता जाण ।देहाचे स्फुरेना देहपण । तें मुख्य समाधिलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८॥ देह च नश्वरमवस्थितमुस्थित वा सिद्धो न पश्यति यतोऽध्यगमत्स्वरूपम् । दैवादुपेतमुत देववशादपेत चासो यथा परिकृत मदिरामदांध ॥ ३६॥ जया देहाचेनि मनजने । माझें शुद्ध स्वरूप पावणें । त्या देहासी विसरिजे तेणें । मी माझेपणे देखेना ॥ ८९ ॥ जेवीं का भाडियाचे घोडें । जेणे आणिले निजधामा रोकडें । ते आहे की गेले कोणीकडे । हे स्मरेना पुढे तो जैसा ॥५९० ॥ हो का भेटावया भ्रारासी । संवे मजुर आणी विश्वासी । ते पतीसी पहुडल्या राणिवसी । त्या मजुरासी विसरली ॥ ९१ ॥ कां जो दैवयोगें पालखी चढे । तो पूर्वील तुटके मोचडे । आहेत की गेले कोणीकडे । हे स्मरेना पुढे तेणे हरिखें ॥ ९२ ॥ हो का बहुकानें पत्नी जैसी । भर्तारू मीनल्या निजसेजेसी । ते निःशेप विसरे लाजेसी । देहाची तैसी दशा जाहली ।। ९३ ॥ त्या दापत्याचे सुखभेटी । पारकें देखता लाज उठी। तेवी देहाचे भान द्वैतदृष्टीं । मर्दक्यपुष्टी देह कैचे ।। ९४ ॥ एवं पावोनि माझ्या स्वरूपासी । स्वानंदपूर्ण साधकासी । सुखें सुखरूपता जाहली त्यासी । निजदेहासी विसरोनी ॥९५ ॥ मग उठले की वैसले । चालतें की राहिले । जागतें की निजलें । हे स्मरण ठेले" देहाचें ॥ ९६ ॥ हे धाले की भुकेले । हिवले की तापले । प्याले की तान्हले। राहिले उगले स्मरेना तो ॥९७ ॥ हे येथें की तेथे । मुकें की चोलते । होते की नव्हते । स्मरणसहिते स्मरेना तो॥९८॥ हे ओवळें की सोवळें । चोखंट की मैनें । डोळस की आंधळें । अगी पागुळले स्मरेना तो ॥ ९९ ।। हे आले की गेले होते की केले । जाहले की मेले । तटस्थ राहिले स्मरेना तो ।। ६०० ॥ हे वाळ की प्रौढ । मोठे की रोड । हलू की जड । आणणे दृढ स्मरेना तो॥ १॥ खाटे की भुयीं । ठायी की कुठायीं । आहे की नाही हेही पाहीं स्मरेना तो ॥२॥ हे मंत्री की तंत्री । तीर्थी की क्षेत्रों । विष्ठी की मूत्री । आहे 'पवित्री स्मरेना तो ॥३॥ जनीं की वनीं । अथवा निरजनीं । जपी की ध्यानी । हेही मनी स्मरेना तो ॥४॥ हैं सुजनी की दुर्जनीं । वंदी की विमानी। मंदिरी की मसणी । पाहती कोणी स्मरेना तो॥५॥ १ जसम, घाव, प्रहार २ भाजलेले ३ हृदयी बिंवल्यावर, भसडाकार झाल्यावर ४ देहाच भान नाहा हही मान मग राहत नाही ५आपल्या स्थानी ६नवन्यास ७ बरोबर ८ अत पुरात ९ जोडे १० परक मनुष्य दिसल तर लाज, तसे द्वतदृष्टि आली तर देहमान ! ११ राहिले, बद पडलें १२ खच्छ की घाणेरडे १३ नाटेवर की भुईवर १४ागल्या ठिकाणी की बाईट ठिकाणी. १५ शुद्ध भूमीवर फारागृहात विमानात, १७ मदिरात की स्मशानात