या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८० एकनाथी भागवत. तेथ कैंचा स्वर्ग कैचा नरक ! कैंचें चोख कैंचें वोख । कैंचे चतुर्दश लोक । ब्रह्मा एक एकलें ॥ ६३० ॥ कैचे पवित्र कैंचें अपवित्र । कैचें तीर्थ कैंचें क्षेत्र । कैचा वेदू कैंचें शास्त्र । ब्रह्म स्वतंत्र अद्वय ।। ३१ । तेथ कैचा उत्पत्तिविनाशू । कैचा वैकुंठ कैलासू । कैचा ब्रह्मा विष्णु महेश । एक अविनाश उरलासे ॥ ३२ ॥ तेध कैंचा बोधू कैंची बुद्धी । देवपण बुडाले त्रिशुद्धी । लाजा निमाली मोक्षसिद्धी । कैचा क्षीराब्धिशेषशायी ॥ ३३ ॥ तेथ माझीही भगवंतता । हारपोनि जाय तत्त्वतां । प्रणवाचा बुडाला माथा । ऐसी सायुज्यता पावले ॥३४॥ यालागी देहाचे केले ठेले । अथवा आले का गेले । हे स्फुरेना में बोलिले। ते विशद केले या रीती ॥ ३५ ॥ अविद्या कारण देह कार्य । ते अविद्या नासोनि जाये। कारण नासल्या कार्य राहे । हे न घडे पाहें ह्मणाल ॥३६॥ वृक्ष समूळी उपडिला जाये। साद्रेता तत्काळ न जाये । पत्र पुष्प फळ सार्द्र राहे । शुष्क होये अतिकाळें ॥ ३७॥ तेवीं अविद्या नासोनि जाये । भोगानुरूप दैव जे राहे । तेणे ज्ञाता वर्तताहे । निजदेही पाहें विदेहत्वे ॥३८॥ ह्मणाल वाढवितां वाकोडें । प्रतिपाळिता सुरवाडें । राखतराखतां देह पडे । प्रत्यक्ष रोकडे दिसताहे ॥ ३९ ॥ ज्याचें देह त्यासी हूँढ नन्हे । तरी ते तत्काळचि पडाचे । वाचलें असे कोणभावे । ऐसें कांही जीवे कल्पाल ॥६४०॥ ज्याचें देह तो न पुसे त्यातें । तरी ते देह केवी कर्मी वर्ते । ऐशी आशंका तुह्मांतें । ऐका सावचित्तें सांगेन ॥ ४१ ॥ देहाचे उत्पत्तिस्थितिनिधन । पुरुपासी वश्य नव्हे जाण । त्यासी अहएचि प्रमाण । दैवयोगें चळण देहाचे ॥ ४२ ॥ उठणे का वैसणें । ते देहासी देवगुणे । अदृष्टगती देणे घेणे । खाणे जेवणे अदृप्टें ॥ ४३ ॥ स्वदेशी का परदेशी । अदृष्ट नेतसे देहासी । स्वर्ग नरक भोगासी । अदृष्ट देहासी उपजवी ।। ४४ ॥ यश लाभ हानि मृत्यु । देहासी अदृष्टं असे होतू । ज्ञाता देहासी अलितू । जैसा घटातू चंद्रमा ॥ ४५ ॥ जैशी छाया पुरुषासरसी । तैशी काया सज्ञानासी । ते राहिली अदृष्टापाशी । निजकर्मासी भोगावया ॥४६॥ जन्मोनि छाया सरसी वाढे । माझी ऐशी अहंता न चढे । तैसेंच देह झात्याकडे । मी ह्मणोनि पुढे येवो न शके ॥४७॥ सदा छाया सरिसी असे । परी कोठे असे कोठे नसे । हे ज्याची तो न 'पुसे । देहाचे तैसे वर्तन झालें ॥ ४८ ।। छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजी चढे । पुरुपासी सुखदुख न जोड़े। ज्ञात्यासी तेणे पाडे देहभोग ॥ ४५ ॥ येथवरी निजदेहासी । कैसेन विसर पडिला त्यासी । ऐक त्याही अभिप्रायासी । दृष्टांतसी सांगेन ॥ ६५० ।। जो मोले मदिरा पिवोनि ठाये । तो तेणे मदें नाचे गाये । देहवंत देह विसरोनि जाये । वस्त्र नाही आहे सरेना ॥५१॥ हा तंव ब्रह्मरस प्याला । परमानंद तृप्त झाला । देही झाला की मेला | आठवू ठेला तेणे मदे ॥५२॥ एव देहाचे भैरण पोपण । जन्म अथवा मरण । ते दैवयोगें जाण । तेचि निरूपण हंस बोले ॥५३॥ १ माइंट २ चवदा लोक भलोंका अवलोक, खलक, महलोंक, बनोलोक, तपोलोक, व सल्ललाई ६ सात खगराक य तल, वितल, मतल, तलातल, महातल, रसातल, व पाताल अशी सात पाताळे, मिटून चोदा भुपर्ने होतात. २ फचे दान फैचे सत्पात्र ५ घडेन हैमणाल. ५ ओलसरपणा ६ दृष्ट ७ अष्ट किंवा पूर्वक में असेल स्याप्रमाणे देह खकर्मफळ भोगील त्याची मानी रुपाला वार्ताही नसते ८ मलावर दास १० । चरितार्थ