या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३८३ नाचौ चनीं । अथवा तटस्थ राहो विजनीं । दशा अधिकउणी बोलूं नये ॥ ७० ॥ जें सिंहासनी राजत्व जोडे । ते वनात खेळतां न मोडे । की धावता व्याहाळीपुढे । राजपद चोख. ढळू नेणे ॥१॥रावो रानी वशिनला । त्या रानासी राजभोग आलारानी रायो राजत्वा मुकला । मूर्खही या बोला न बोलती ॥ २ ॥ तेवीं पावोनि स्वरूपप्राप्ती । योगी प्रारब्धाच्या स्थिती । नाना कम करिता दिसती । परी निजात्मस्थिती भंगेना ॥३॥ यालागी समाधि आणि व्युत्थान । या दोही अवस्थाचे लक्षण । अपक्कासीचि घडे जाण । परिपूर्णासी लक्षण ते केचे ॥४॥ स्वरूपावेगळे काही एक । पूर्णासी उरले नाहीं देख । समाधिव्युत्थानाचें मुख । त्यासमुख येवो लाजे ॥ ५ ॥ अर्जुना देवोनि समाधी । सचि घातला महायुद्धी । परी कृष्ण कृपानिधी । तटस्थ त्रिशुद्धी न करीच ॥ ६॥ यालागी समाधिव्युत्थानविधी । ताटस्थ्यसहित निरवधी। गिळूनि झाली सैर ममाधी । पूर्ण निजपदी विलसता ॥ ७॥ एवं प्रारब्ध जब असे । तंव मुक्ताचे देह वर्ते ऐसे । परी अहममतेचें पिसें । पूर्षिल्या ऐसे वाधीना ॥८॥ जेवीं स्वमदेहाच्या नाना अवस्था । जागृती आलिया तत्त्वता । पुरुप नेघे आपुले माया । तेवीं समाधिस्था देहकम ॥९॥ हेचि परमार्घतां ब्रहास्थिती। नाना परींच्या उपपत्ती । म्या सागीतल्या तुह्माप्रती । ज्ञानसपत्ती निजगुह्य ।। ७१० ।। तूं कोण हे पुसिले होतें । सागाचया तें सनकादिकांते । सागतसे निजरूपात । विश्वास त्यात दृढ व्हावया ॥ ११॥ मौतदुत यो विप्रा गुह्य यत्साग्ययोगयो ! जानीतमागत यन युष्मधर्मविवक्षया ॥ ३८ ॥ अतिगुह्य ज्ञान परात्पर । जे उपनिषदाचे भांडार । म्या सांगीतले साचार । योगसार योग्याचें ॥ १२ ॥ ज्या ज्ञानालागी साधनकोटी । मुमुक्षु करिती हटतीं। योगी रिपोनि गिरिकपाटी। महामुद्रा नेहटी साधिती ॥१३॥ वेदशाखाचिया युतीयोटावल्या जिये अर्थी । तें निजज्ञान म्या तुह्माप्रती । यथानिगुता सागीतले ॥ १४ ॥ एबढिया ज्ञानाचा ज्ञानवक्ता । मी कोण हे न कळेल सर्वधा । तरी यज्ञाचा यज्ञभोक्ता । जाणा तत्त्वता मी विष्णू ॥ १५ ॥ मज यावया हेचि कारण । तुही ब्रयाप्रति केला प्रश्न । ते उपदेशावया ब्रह्मज्ञान । स्वयें आपण येथे आलों ॥ १६ ॥ ज्या उपदेशाच्या पोटीं । वर्णाश्रमपरिपाटी । न साडिता होय माझी भेटी । तेही गोष्टी निलीसे ॥ १७ ॥ साडावे ब्राह्मणपण । मग माडावे सन्यासग्रहण हे दोनी धर्म देहींचे जाण । उपदेशी देहपण मुख्यत्वे मिथ्या।॥१६॥ एपदेश करूनि प्रमाण । सनकादिकी ब्राह्मणपण । अद्यापि साडिले नाही जाण । माझं गुद्य ज्ञान पावले ॥ १९ ॥ तेणेचि उपदेशे निश्चित । नारद ब्राह्मणपणे वर्तत । ब्रह्मानर्दे खुल्लत । गात नाचत निजबोधे ॥ ७२० ॥ ऐसें जें चैतन्यधन । आपुले स्वरूप आपण । स्वयें करिताहे स्तवन । निजमहिमान द्योतीवया ॥२१॥ १ व्याहाळी-कीडा, शिकार मागे अध्याय ६-३६४ पहा "जेव्हा व्याहाळिये निघसी। मग आपुले रवी सविसी" ज्ञानेश्वरी ( अध्याय १८-५४१) मध्य घोड्याच रगण, चौफेर रपेट या अर्थी हा शब्द वापरला आहे २ रादिला ३ समाधिक्सिजन ४ अर्धवटाला ५ यथेच्छ ६ योगमार्गाच रहस्य ७ हठयोगाने ८ खेचरी आदि चार महा ९ नित्याभ्यासान १० ज्ञान, शहाणपण ११ हात टेकले १२ संगतवार १३ जागविली आहे १४ प्रकाशविण्यासाठी