या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८४ एकनाथी भागवत. , भह योगस्य सारयस्य सत्यस्वतंय तेजस । परायण द्विजश्रेष्ठा श्रिय कीर्तेर्दमय च ॥ ३९ ॥ सांख्य में परम ज्ञान । योग अष्टांगादिसाधन । सैत्याचे सत्यपण । सत्यस्वरूप जाण मी एक ॥ २२॥ पहा पा ज्या सत्याच्या ठायीं । संत सद्धर्मे राहिले पाही । सुनत जे वाचा तेही । मजवेगळी कांहीं हों नेणे ॥२॥ तेजाची जे प्रगल्भता । ते माझेनि तेजे सतेजता। श्रियेची जे ऐश्वर्यता । जाण तत्वतां माझेनी ॥ २४ ॥ कीर्ति माझेनि कीर्तन । सदा दिजे साधुजने । मजवेगळे कीर्तीचे जिणे । कोणी पोसणे न घेती ॥ २५॥ माझेनि तेजें निग्र. हता । निग्रहो करी समस्ता । अदम्या दमू दमिता । जाण तत्त्वतां माझेनि ॥ २६ ॥ येथ ध्येय आणि ध्यान । कां साध्य आणि साधन । या अवधियां भी अधिष्ठान । मजवेगळे भान यां कैंचें ॥ २७ ॥ तुझी ब्राह्मण अतिश्रेष्ठ । मजही पूज्यपणे वरिष्ठ । यालागी निजज्ञान चोखेट । तुझांसी म्यां प्रकट सागीतले ॥ २८ ॥ मा भजन्ति गुणा सर्वे निर्गुण निरपेक्षकम् । सुहद श्रियमारमान सान्यासनादयो गुणा ॥ ४० ॥ मी वस्तुतां निरपेक्षं निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण । सुहृद आत्मा प्रिय जाण । ऐसे लक्षण मज करिती ॥ २९ ॥ समता आणि असगता । याही गुणांच्या अवस्था । आणूनि ठेविती माझ्या माथा । गुणस्वभावता लक्षणे ॥ ७३० ॥ हो का सबळ वळे अंध. कार । के युद्धा आला सूर्यासमोर । तरी तमारी हा वडिवार । सूर्या आंधार जेवीं देत ॥ ३१॥ कोणे धरोनियां आकाश । घटी घातले सावकाश । तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आले ॥ ३२ ॥ नाहीं घटासी आतळेला । गगनीचा गगनींच सचला । तो घटें घटचंद्रमा केला । मूर्सासी मानला सत्यत्वे ॥३३॥ तेवीं मी केवळ निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण । सुहृद आत्मा इत्यादि जाण । असंगादि लक्षण मज देती ॥३४॥ गुणासी मी नातळे जरी । तरी मज ह्मणती लीलाधारी । एव गुणचि गुणामाझारी ! मिथ्या मजवरी आळ हा ॥ ३५ ॥ तेथ मी घेता ना देता । कर्ता ना करविता । हे माझी निजस्वभावता । येर ते अवस्था गुणांची ॥ ३६॥ एवं पूर्वापर अतिविचित्र । सागोनि ज्ञानविज्ञाननिर्धार । त्या इतिहासाचा उपसहार.। स्वयें सारंगधर करीतसे ॥ ३७॥ . __ इति मे छिन्नसन्देहा मुनय सनकादय । सभाजयित्या परया भक्त्यागृणत सस्तरै ॥ ४ ॥ आत्मज्ञानी परम दक्ष । मुमुक्षुमाजी अतिनेटके । सदेहापन्ने सनकादिक । म्या यापरी देख निःसदेह केले ॥ ३८ ॥ सदा सावधाने निर्मळ । माझ्या भजनी अतिप्रेमळ । सदा मद् मननशीळ । अव्याकुळ श्रवणार्थी ॥ ३९ ॥ उद्धवा तिही ऐकता माझी गोष्टी । माझ्या स्वरूपी घातली मिठी । मद्रूप झाले उठाउठी । बाप जंगजेठी ब्रह्मपुत्र ॥ ७४०॥ तिही दृश्य द्रष्टा दर्शन | त्रिपुटीचे केले शून्य । परब्रह्मचि झाले पूर्ण । माझेनि जाण उपदेशे ॥४१॥ परम पावले समाधान । गद्यपद्यादि सुलक्षण । माझें करोनिया स्तवन । पूजाविधान माडिले ॥ ४२ ॥ १ सारय झणजे भात्मानात्मविवेक २ सत्य हाणजे सत जो आचरितात तो धर्म ३ चागली मधुर वाचा, प्रमाणसिद्ध चागी ४ प्रभावाची ५ श्रीमतीची ६ स्वामित्वाने शिक्षा करणे ७ दमनास कठिण आश्रम ९ सोज्ज्वळ १० इच्छाराहत, अकाम ११ अधाराचा नाशक १२ योग्यता, मोठेपणा १३ मिळाला, अडकून राहिला १४ निश्चयी, नैष्ठिक. १५ संशयप्रत झारेले १६ उत्साही १७ फार मोठे १८ शांती,