या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ह्मणताती ॥६५॥ काव्य नाटक अळंकार करिती । ते कवित्वचि साधन मानिती । कविताप्रबंधव्युत्पत्ती । मोक्ष मानिती तेणें यशे ॥ ६६ ॥ कवीश्वरांचे मत ऐसे । आपुले कवित्वाचेनि यशे । मोक्ष लाहो अनायासें । हे कवितापिसे कवीश्वरां ॥ ६७ ॥ वात्स्यायनकोकशास्त्रमत । त्यांचा अभिप्रायो विपरीत । कामसुखें मोक्ष मानित । काम सतत सेवावा ॥ ६८ ॥ सांख्ययोगांची वदंती । सत्य शमदमादि सपत्ती । हेचि साधन मोक्षाप्रती । नेम निश्चिती तिहीं केला ॥६९॥ नीतिशास्त्रकारांचे मत । सार्वभौम राज्य प्राप्त । त्यातेंचि मोक्ष मानित । सामदानादि तेथ साधन ॥ ७० ॥ एकांचा मतविभाग । शिखासूत्रमात्रत्याग । त्याचे नांव मोक्षमार्ग । परम श्लाघ्य मानिती ॥७१॥ देहात्मवाद्यांचा योग । स्वेच्छा भोगावे यथेष्ट भोग । कैचा नरक कैचा स्वर्ग । मेल्या मग कोण जन्मे ॥७२॥ अश्वमेध राजसूययाग । हाचि एकांचा मोक्षमार्ग । एका मूर्तिउपासना सांग । पूजाविभाग ते साधन ॥ ७३ ॥ एकांचे मत साक्षेप । कर्डकडाटेंसी खटाटोप । शरीरशोषणादि जें तप । तो मार्ग समीप मोक्षाचा ॥ ७४ ॥ एक ह्मणती श्रेष्ठ साधन । मोक्षमार्गी केवळ दान । दीक्षित ह्मणती बेतग्रहण । हेचि साधन मोक्षाचें ॥ ७५ ॥ एकाच्या मताचा अनुक्रम । अवश्य करावे व्रत नियम । एवं मतानुसारे उपक्रम । नानासाधनसभ्रम वोलती ॥ ७६ ॥ या साधनांची पाहता स्थिती । आचंतवंत निश्चिती । तेचि पै उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥ ७७ ॥ आद्यन्तयन्त एवैपा लोका. वर्मविनिमिता । दु खोदास्तमोनिष्ठा क्षुद्रानन्दा शुचार्पिता ॥ ११ ॥ __ सांडूनि फळाशा देहाभिमान । मज नार्पिती जे साधन । त्यांचे फळ दुखरूप जाण । जन्ममरणदायक ॥ ७८ ॥ तिहीं साधी साधिले लोक । ते अतवंत नश्वर देख । ते लोकींचे जे सुख । साखरेंसी विख राधिले ॥ ७९ ॥ त्याचे जिहाग्री गोडपण । परिपाकी अचूक मरण । तैसा तो क्षुद्रानंद जाण । शोकासी कारण समूळ ॥ ८० ॥ निजकम मलिन लोक । त्यांच्याठायीं कैचें सुख । उत्तरोत्तर वाढतें दुःख । अर्धतमदायक परिपाकू ॥८१॥ भोगासक्त जे झाले मन । त्यासी असंड विषयांचे ध्यान । विपयाध्यासें तमोगुण । अधःपतनदायक ॥ ८२॥ इहीच साधनी माझी भक्ती । जो कोणी करील परम प्रीती । ते भक्तीची मुख्यत्वे स्थिती । स्वयें श्रीपती सागत ॥ ८३ ॥ मय्यर्पितात्मन सभ्य निरपेक्षस्य सर्वत । मयात्मना सुख यत्तस्कृत स्याद्विपयात्मनाम् ॥ १२ ॥ भक्ती निजसुखाची मातू । सांगावया उद्धवासी सवोधितू । भक्तिसुखालागी भाग्यवंतू । तूंचि निश्चितू उद्धवा ॥ ८४॥ भक्तिसुखाचे भाग्य यासी । ह्मणोनि सभ्य ह्मणणे त्यासी । ऐसें पुरस्करोनि उद्धवासी । भक्तिसुसासी देवो सागे ॥ ८५ ॥ पावावया माझी स्वरूपप्राप्ती । इहलोकीची भोगासक्ती । निःशेप नातळे चित्तवृत्ती । जेवीं निजपती रजस्वला ॥ ८६ ॥ साधूनि माझिया अनुसधाना । परलोक नातळे वासना । धिकारी पे किया गया तो किया सापाचे वीज जोशील का वा पारित वध माना १ अलकारशास्त्री मणतात "यावत्कीर्तिमनुष्यस्य पुण्यलोकेषु गीयते । तावद्वर्षसहस्राणि 'स्वर्गलोके महीयते ॥" २ फामशास्त्रकार ३ वाता, गोष्ट ४ व्यवहारशास्त्रज्ञाचे ५शंडी व यनोपवीत टाकणे ६ बुद्धाचा, नास्तिकाचा 'ऋण कृत्वा प्रत पिवत्' या मताचे लोक ७ यानिमाचा ८ हठयोग ९यज्ञकरुण बाधणे १० अनित्य ११ माखरेत विप मिसळले. ५ परिणामी १३ निर्मिले १४ अप्रतम नावाच्या गरकाप्रत नेणारे १५ सम्मानून १६ सशे करीत नाही. ।