या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९८ एकनाथी भागवत. पुरा ज्याच्या जिव्हारा वोसडे ॥४६॥ वीज अधिकाधिक पेरितां । उल्हास कृपीवळाचे चित्ता । तेवीं सर्वस्व मज अर्पितां । तैशी उल्हासता जै होये ॥४७॥ सगुण सुरूप समर्थ भैा । निघोन गेलिया तत्त्वतां । त्यालागी तळमळी जैशी कांता । तैशी कळवळता जे उठी ॥४८॥ त्या नांव गा माझी भक्ती । उद्धवा जाण निश्चिती। जे भक्तीसी मी भुलोनि श्रीपती । भक्तांहाती आतुडलों ॥४९॥ चढत्या आवडी माझी प्रीती । तेचि जाण पां माझी भक्ती। ऐसा भक्तीचा महिमा श्रीपती । स्वयें उद्धवाप्रती सांगत ॥२५०॥ आवडी धरोनि पोटेंसी। देवो सागे उद्धवासी । माझी भक्ती ते जाण ऐशी । अखंड जीपाशी मी असे ॥ ५१ ॥ ससारतरणोपायीं । हेचि एक मुख्य पाहीं । मोक्ष लागे इच्या पायी । इतर साधनें कायी वापुडी ॥ ५२॥ मी तव अजित लोकीं तिही । त्या मज भक्तप्रताप पाहीं। जिंतोनिया ठायींच्याठायीं । भाववळे पाही स्ववश केलों ॥ ५३ ॥ र्यालागी सर्व विजयाचे माथा । माझी भक्तीचि गा सर्वथा । ऐक पां तेही कथा । तुज मी तत्त्वता सांगेन ॥ ५४॥ न साधयत्ति मा योगो न साख्य धर्म उद्धय । न स्वाध्यायमापस्त्यागो यथा भक्तिममोर्जिता ॥ २० ॥ सांख्य जे का नित्यानित्य । कर्म जे कां नित्यनैमित्य । अष्टागयोग समस्त । नव्हती समर्थ मत्प्राप्ती ॥ ५५ ॥ स्वाध्याय जे वेदाध्ययन । तप में घातांबुपर्णाशन । त्याग जो सन्यासग्रहण । माझे भक्तीविण बापुडी ॥ ५६ ।। जैशी नाकेंवीण बरेव । कां शिरेंवीण अवयच । भर्तारेंवीण अहेव । जाण पा तो सर्व विटंबू ॥ ५७ ॥ तैसे माझे भक्तीविण । सकळ साधने वापुडी जाण । मज पावावया समर्थपण । नाहीं आगवण समस्ता ॥ ५८॥ तैशी नन्हे माझी भक्ती । चढती वाढवून माझी प्रीती । तत्काळ करी माझी प्राप्ती । नव्हे पंगिस्ती आणिकाची ॥ ५९॥ जेव्हा उपजली माझी भक्ती । तेव्हांच झाली माझी प्राप्ती । हैं पुनःपुन्हां उद्धवाप्रती। हरिखें श्रीपती सागत ॥२६०॥ रत्लासवे जैगी दीप्ती । अरुणासवे जेवीं गभस्ती । तेवी भक्तीपाशी मी श्रीपती । असे निश्चिती उद्धवा ॥११॥ ते भक्ती लागे ज्याच्या चित्तीं । तें मी सापडलों त्याच्या हाती । आणिकां साधनाचे प्राप्ती । विनाभक्ती मी नातुडें ॥ १२ ॥ भरयाऽहमेकया प्राय श्रद्धयाऽमा प्रिय सताम् । भक्ति पुनाति मनिष्ठा पाकानपि सम्भवात् ॥ २१ ॥ इतर साधने व्युत्पत्ती । दूरी सांडूनि परती। श्रद्धायुक्त माझी भक्ती । धरिल्या हाती मी लामें ॥ ६३ ॥ निर्विकल्प निःसदेहो । सर्व भूती भगवद्भावो । हा भक्तीचा निजनिर्वाहो । भजनभावो या नाव ॥६४॥ होऊनि सर्वार्थी उदासू । माझ्या भजनाचा उल्हासू । न धरी मोक्षाचा अभिलापू । एवढा विश्वासू मद्भजनीं ॥ ६५॥ तेथें तरे की न तरें। हा विकल्पू कोठे उरे । माझेनि भजने निर्धार । केले पाठिमोरे विधिवादः ॥ ६६ ।। एवढा विश्वासी ज्याचा भावो । न धरी भक्तीवेगळा उपायो । आहा त्याचेनि जीवे जीवो । तो आत्मा पहा वो 4 माझा ॥ ६७ ॥ जो मी ज्ञानियाचा आत्मा । भक्तांचा प्रिय परमात्मा । शास्त्री प्रतिपादिती पुरुषोत्तमा । तो मी साउमा त्या धावें ।। ६८ ॥ मज आवडे १ अत करणाला २ नवरा ३ पायको ४ सापडलों, भडकून पडलों ५ ससारसागर तरून जाण्याच्या उपायात भी हीच मुख्य होय ६ ससारावर मिळविल्या जाणा-या जयामध्ये ७ याचरी सर्व विषयाचे ८ वायु, उदक व पिकरेला पाने भक्षण करणे शोभा मिळविणे १० सुवाविनी ११ सामथ्य १२ परतनता १३ चकाकी १४ सूर्य १५ सर्वख, मुम्य रक्षण, १६ दूर, तुच्छ, १७ सामोरा (ज्ञानेश्वरी अभ्याय १६-६०) ।