या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०० एकनाथी भागवत. पवित्रता । जो माझ्या भजनपथा विन्मुख ॥ ९२ ॥ त्याहूनि श्वपच गा वरिष्ठ । जो माझ्या भजनी भजननिष्ठ । त्याते वंदिती पुराणश्रेष्ठ । कविवरिष्ठ महाकवी ॥ ९३ ॥ विदुर दासीपुत्र तत्वतां । भावे पढिया भगवंता। भावो प्रमाण परमार्था । जात्यभिमानता सरेना ॥ ९४ ॥ मज पावावया साचोकारें । भावो सरे जाती न सरे । यालागी अवघ्यांचे धुरे। म्यां वनचरें उद्धरिली ॥ ९५ ॥ पक्ष्यांमाजी केवळ निघू । जटायु उद्धरिला म्यां गीधू । अंत्यज उद्धरिला धर्मव्याधू ।भाव शुद्भू मदर्थी ॥१६॥ भलता हो भलते जाती ज्यासी माझी भावार्थ भक्ती । तोचि जाण पां पवित्र मूर्ती । माझी प्राप्ती महजने ।। ९७ ॥ सांडोनियां माझी भक्ती । नाना साधनें व्युत्पत्ती करितां नव्हे माझी प्राप्ती । तेचि श्रीपती सांगत ॥९॥ धर्म सत्यदयोपेतो विद्या वा तपसाबिता । मद्भक्त्यापेतमात्मान न सम्यक् प्रपुनाति हि ॥ २२ ॥ माझे भक्तीवीण कर्मधर्म । जाण पां तो केवळ भ्रम । चुकले मत्प्राप्तीचे वर्म । तो धर्म अधर्म परिणामें ॥ ९९ ॥ माझे भकीचीण सत्यवादू । तो जाण पां जैसा गर्भाधू । प्रतिपदीं घडे प्रमादू । अध:पतनवाधू देखेना ॥ ३०० ।। भक्तीवीण दयेची थोरी । जेवीं पुरुवीण सुंदरी । ते विधवा सर्व धर्मावाहेरी । तैसी परी दयेची ॥१॥ माझे भक्तीवीण जे विद्या । ते केवळ जाण पा अविद्या । जेवीं वायस नेणती चांदी । तेवी माझ्या निजचोधा नोळसतीश चंदनभार पाहे खर । परी तो नेणे सुवासाचें सार । माझेनि भक्तीवीण विद्याशास्त्र । केवळ भारवाहक ॥ ३ ॥ माझे भक्तीवीण जें तप । शरीरशोपणादि अमूप । ते पूर्वादृष्टं भोगी पाप । नव्हे सद्रूप तयःक्रिया ॥४॥ माझे भक्तीवीण जें साधन । ते कोशकीटोच्या ऐसे जाण ! आपण्या आपण बंधन । भक्तिहीन क्रिया ते ॥५॥ एवं माझे भक्तीवीण । जे केले ते अममाण । ते भक्तीचे शुद्ध लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६॥ कथ बिना रोमहर्षे नवता चेतसा विना । विनाऽऽनन्दानुकलया शुध्येतया विनाशय ॥ २३ ॥ आवडी हरिकथा ऐकतांनाना चरित्रे श्रवण करिता माझी आत्मचर्चा हृदयीं धरितां । पॉलटू चित्ता तेणे होये ॥७॥ तेणेंचि उपजे माझी भक्ती । माझ्या भजनाच्या अतिप्रीती । आवडी माझी नामें गाती । रगी नाचती सद्भावे ॥ ८॥ पोटातूनिया उल्हासतां । रगी गाता पे नाचतां । अतरी द्रवो झाला चित्ता । ते अवस्था वाह्य दिसे ॥ ९ ॥ अतरी सुखाची झाली जोडी । वाद्य रोमांची उभिली गुढी । त्या स्वानुभवसुखाची गोडी। नयनी रोकडी प्रवाहे ।। ३१० ।। माझे भक्तीचिया आवडी । अहं सोहं दोनी कुडी।तुटली अभिमानाची बेडी । विषयगोडी निमाली ॥ ११॥ ते काळींचें हेंचि चिह्न । पुर्लकाकित देहो जाण । नयनी आनंदजीवन । हृदयीं परिपूर्ण स्वानंदू ॥१२॥ पुंजाळले दोनी नयन । सदा सर्वदा सुप्रसन्न । स्फुरेना देहाचे भान । भगवती मन रंगले ।। १३ ॥ ऐसी नुपजता १ चांडाळ २ आवडता ३ कर्यक्षम नाही ४ सरोखर ५ पुढारी किंवा प्रेष्ठ होय भवश्रेष्ठ जाति छन ज्ञानावाराय मणतात “झणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण" (अध्याय ९-४५२) अगोदर ७ गिधाड, गृध्र ८ ज्ञानोबा ह्मणतात "गोनि कुळ जाति वर्ण । है आधचि गा अकारण। एथ अजुना माझेपण । सार्थक एक" (अध्याय १-४५६) तो धर्म परिणामान अधर्मच ठरतो १० कावळे १९ चद्राला १२ कोसल्याप्रमाणे १३ फरक, शुद्धी १४ केशाची, पारि रोमाचित झाले हा भाव १५ अश्रुरूपान वाहते १६ रोमाचित १७ भानदाशु. १० नेनातल तेज वाहून गमीर दिसू लागले १९ उत्पन्न न होता.