या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०२ एकनाथी भागयत ययाऽमिना ममल साहाति प्रमात पुनः स्व भजते स्वरूपम् । मात्मा घ कर्माशय विध्य मतियोगेन भजत्यथो माम् ॥ २५ ॥ डॉकमिळणी सुवर्ण । हीन कसे झाले मलिन । उदकें धुतांही जाण । निर्मळपण न ये त्या ॥ ३७ ॥ त्याच सुवर्णाचे तगटे । अग्निमुखे देता पुट । मळत्यागें होय चोखट । दिसे प्रकट पूर्वरूपें ॥ ३८ ॥ तेवीं अविद्याकामकर्मी मलिन । त्याचे चित्तशुद्धीलागी जाण । माझी भक्तीचि परम प्रमाण । मळक्षालन जीवाचें ॥ ३९ ॥ जंब जंव भक्तीचें पूट चढे । तंव तंव अविद्यावंध विघडे । मायेचें मूळचि खुडे । जीवू चढे निजदा ॥ ३४० ॥ तुटोनियां अविद्याबंधू । चिन्मात्रैक अतिविशुद्धू । जीव पाये अगाध बोधू । परमानदू निजवोधे ॥४१॥ जीवासी अविद्येची प्राप्ती । ते ज्ञानास्तव होय निवृत्ती । तेथ का पां लागली भक्ती । ऐशी आशंका चित्ती जरी धरिसी ॥ ४२ ॥ तरी माझ भक्तीवीण ज्ञान । सर्वथा नुपजे जाण । तेचि अर्थीचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४३ ॥ यथायथारमा परिमृज्यतेऽसौ मरघुण्यगाथाश्रवणानिधान । तथातथा पश्यति वस्तु सूक्ष्म चक्षुर्यथैवानसप्रयुक्तम् ॥ २६ ।। माझी प्रतिपाद्य स्वरूपता । नाना चरित्र पवित्र कथा । तेथें श्रवणमनने चित्ता । प्रक्षाळिता कीर्तने । ४४ ॥ जंब जंव करी माझी भकी । तब तंव अविद्यानिवृत्ती । तेणे माझे स्वरूपाची प्राप्ती । जे श्रुतिवेदांती अतक्यं ॥ ४५ ॥ जे कां अतिसूक्ष्म निर्गुण । अलक्ष्य लक्षेना गहन । तेणे स्वरूपं होय संपन्न । जीव समाधान मदजने ॥४६॥ नयनीं सूदल्या अजन । देखे पृथ्वीगंभीचे निधान । तेवीं मगजने लाहोनि ज्ञान । चैतन्यधन जीव होय ॥ ४७ ॥ उद्धवा ऐक पा निश्चिती । बहुत न लगे व्युत्पत्ती । जैसा भावो ज्याचे चित्तीं । तैगी प्राप्ती तो पावे ॥४८॥ विपयाध्यायतशित विपये निपश्यते । मामस्मरतशित मस्येव प्रविलीयते ॥ २७ ॥ __ जो करी विपयाचे ध्यान । तो होय विषयी निमग्न । जो करी सदा माझें चिंतन । तो चैतन्यघन मीचि होय ॥४९॥ स्त्री गेली असतां माहेरी । ध्याताचि प्रकटे जिव्हारी । हावभावकटाक्षेवरी । सकाम करी पुरुपाते ॥ ३५० ॥ नसते स्त्रियेचें ध्यान करितां । प्रकट दिसे यथार्थता । मी स्वतःसिद्ध हृदी असता । सहजे मद्पता चिंतिता मज ।। ५१॥ आवडी माझे जे चितन । चित्त चिता चितितेपण । "विरोनि होय चैतन्यधन । मद्रूपपण या नाव ॥ ५२ ॥ माझे प्राप्तीलागी जाण । हेचि गा मुख्य लक्षण । माझें ध्यान माझे भजन । मद्रूपपण तेणे होय ॥५३॥ मजवेगळे जे जे ध्यान । तेंचि जीवासी दृढ बंधन । थालागी साडूनि विषयाचे ध्यान । माझे चिंतन करावें ॥ ५४॥ । - तस्मादसदभिध्यान पथा स्वममनोरथम् । हि त्वा मयि समाधत्स्व मनो मनावभावितम् ॥ २८ ॥ साचाच्योपरी दिसत । परिणामी नाशवत । त्यासीच बोलिजे असत । जे मिथ्याभूत आभासू ॥५५॥ तेवीं इहामुत्र कमनीय जे अविचारितरमणीयें । त्यालागी प्राणी पाहे । UM १ हीणास किंवा डांकलग सोने २ पत्रा ३ शुद्ध, स्वच्छ ४ निजरूपा ५ वरज्ञानरूप ६ निर्मळ केल्यावर ७ घातल्यास ८ भूमीत पुरलेला देवा ९ मात, चित्तात १० समोर नसणान्या ११ चित्तादि निपुटी नाश पावून १२ ख यामारसे १३ भ्रमरूप १४ या लोकी व खर्गलोकी १५ इच्छा करण्यास योग्य असे, लोभनीय १६ भनिचारामुळे मनात विचार उद्भवू न देता केवळ त्याला भुलविणारे