या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. उद्धरले ऐकिजेती । परी स्त्रैणाचे संगती । उद्धार गती असेना ॥ ७९ ॥ जो कां स्त्रियेचा अंकिला । जो स्त्रियेसी जीवें विकिला । जो स्त्रियेचा पोसणा झाला । तिचे वोलामाजी वर्ते ॥३८० ॥ जैशी कुलदेवता खेचरी । तैसे स्त्रियेसी पूज्य करी । मग तिचेचि सेवेवरी। नाना उपचारी नाचत ॥८१॥ पाळिल्या श्वानाचे परिपाटी । लाविल्या लागे सुहृदापाठीं। त्या हर्डकिलिया शेवटीं । कामाळोरां पुसाटी घालूनि पडे ॥ ८२ ॥ धड गोड उत्तम पदार्था । आपण भोगीना सर्वथा । ते देऊन स्त्रियेच्या हाता । आपुली सत्ता निवर्तवी ॥८॥ इसी जै विरुद्ध वाटेल । ते हे ब्रह्मांड पालथेल । इचा उल्लंधितां बोल । क्षीराब्धि सुफेल सुखाचा ॥ ८४ ॥ नाही देवोकुळदेवां पूजणे । मायवापाते चंचणे । शेखी गुरूतेही ठकणे । परी सर्वस्व देणे स्त्रियेसी ।। ८५ ॥ एवं माकड जैसे गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदै नाचे । ऐशिया स्त्रैणाचे संगतीचें । तेथ सुख कैचें साधका ॥ ८६ ॥ ज्याच्या ऐकतां स्त्रियेच्या गोठी । सज्ञानासही काम उठी। जो लावी योपितापाठी । उठाउठी सकामत्वे ॥ ८७ ॥ ऐशिया स्त्रैणाचे सगती । कैची साधका सुखप्राप्ती । तो घालील अधोगतीं । अधतमानती नेईल ।। ८८ ॥ यालागी स्त्रैणाची कथा । कानी नायकावी वार्ता । त्याचा वाराही लागता । तेथूनि सर्वथा पळावें ॥ ८९ ॥ त्याची न घ्यावी भेटी । त्यासी न करावी गोठी । तो न पहावा दिठी । न लागाचे पाठी स्त्रैणाचिये ॥ ३९० ॥ स्त्रैण पुढे वाटे जाये। त्याच्या मार्गी मागू उरला राहे । तेही आपण चुकवावी 'भोये । येथवरी पाहें त्यागावा ॥ ९१ ॥ स्त्री आणि स्त्रैणाचे संगतीं । जैशी होय दुःखप्राप्ती । तैसे दुःख त्रिजगती । माजी निश्चिती असेना ॥९२॥ अत्यंत स्त्रीकामी वशता । ती नाव मुख्य स्त्रैणता । केवळ स्त्रियेची अधीनता । तो बाधू परमार्था अतिनिद्यत्वे ॥ ९३ ॥ आपुले हृदयींची कामासक्ती । तेचि स्त्रीसगाची दृढ प्राप्ती । तेथ उपजलिया विरक्ती । मग स्त्रियेची प्राप्ती कोण पुसे ॥९४ ॥ ऐसे हृदयींचे कणवे । उद्धवासी सांगीतले देवे । हे ऐकोनिया उद्धवे । विचारु जीवें आदरिला ॥ ९५ ॥ अनिवार उपजे विरक्ती । जेणे वाधीना विषयासक्ती । ऐशी जे ध्यानस्थिती । तेचि देवापती पुसत ॥ ९६ ॥ जे लागलिया ध्यान । न दिसे स्त्रीपुरुषभान । जीवी उपजे चित्समाधान । तैसे विधान पुसत ॥ ९७ ॥ उद्धव उवाच-यथा स्वामरविन्दाक्ष यादृश वा यदात्मकम् । ध्यायेन्मुमुक्षुरेतन्मे ध्यान मे वक्तमहंसि ॥ ३१॥ उद्धव ह्मणे कमळनयना । मुमुक्षु करिती तुझिया ध्याना । त्या ध्यानाची ध्यानलक्षणा । जगजीवना मज सागें ॥ ९८ ॥ ते सगुण की निर्गुण । कोण रूप कैसा वर्ण । ते अवघंही सपूर्ण । कृपा करून मज सागा ॥ ९९ ॥ जेथ रिघतां नुगे मन । ज्याचें अत्यंत गोडपण । जे तुजही आवडतें जाण । ते मज ध्यान सागावे ॥ ४०० ॥ ऐकोनि उड़वाचा प्रश्न । सागावया उत्तम ध्यान । पूर्वपीठिका आसन । प्राणायामलक्षण सागतो।।१।। श्रीभगवानुवाच-सम आसन आसीन समकायो यथासुसम् । हस्ताबुत्सग आघाय म्बनासाप्रकृतेक्षण ॥ ३२॥ एक आसनाचे लक्षण । पापाणी व्याधि सभवे जाण | केवळ धरणीचे आसन । त आत. १ तरणोपाय २ अकित ३ गुलोम, पोसलेला ४ आकाशात सचार करणारी ५ बुज्यानमार्ण ६ हाकून लावल क्षमता ७ मागाल पायर्यात शेपूट घालून यामधाराकर ( रतिसाधन, कामस्थान जी खी तिच्या आश्रयास ) येऊन पडतो थारोळाशहाचा खटगा, दूध तापविण्याच भुईतील कुट शेपटी ९ घालवितो, दवद्धितो १० जमीन, वाट ११ कळवळयान, म पापजे कृपा, दया १२ ज्ञानजन्य सतोर १३ मार्ग, प्रकार १४ उवगत नाही, कटास्त नाही