या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. एका एकपणचि सहजें । आले निजबोधैं ग्रंथार्थे ॥ १२ ॥ तेथें देखणेंचि करूनि देखणे। अवघेचि निर्धारूनि मनें । त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणे सार्थक ॥ १३ ॥ पाहोनि दर्शमाचा प्रातूं । एकादशाच्या उदयाआतू । एकादशावरी जगन्नाथू । ग्रंथाy आरभी ॥ १४ ॥ ह्मणोनि एकादगाची टीका । एकादशीस करी एका । ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वे ॥१५॥ आतां बंदू महाकवी। व्यास वाल्मीक भार्गवी । जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥ १६ ॥ तिही आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती। हेचि करीतसे विनंती । ग्रंथ समाप्ती न्यावया ॥ १७॥ चंदूं आचार्य शंकरू । जो का ग्रंथाविवेकचतुरू । सारूनि कर्मठतेचा विचारू । प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥१८॥ आतां चंदूं श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधेर । जयाची टीका पाहता अपार । अर्थ साचार मैं लाभ।। १९ ॥ इतरही टीकाकार । कान्यकर्ते विवेकचतुर । त्याचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं होआवे ॥१२०॥ वदंप्राकृत कवीश्वर | निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर । नामदेव चागदेव वटेश्वर । ज्याचे भाग्य थोर गुरुकृपा ।।२१।। जयांचे ग्रंथ पाहता । ज्ञान होय प्राकृता । तयाचे चरणी माथा । निजात्मता निजभावे ॥२२॥ सस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी। मा प्राकृती काय उणीवी । नवी जुनी ह्मणावी । कैसेनि केवी सुवर्णसुमने ॥ २३ ॥ कपिलेचे झणावे क्षीरें । मा इतराचे ते काय नीर । वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥२४ा जे पाविजे सस्कृत अर्थे । तेचि लाभे प्राकृतें । तरी न मनावया येथे । विपमचि ते कायी ॥२५॥ का निरजनीं वसला रावो । तरी तोचि सेवका पावन ठावो । तेथे सेवेसि न बचता पाहाहो । दंडी रावो निजभृत्या ॥२६॥ को दुबळी आणि समर्थ । दोहीस राय घातले होते । तरी दोघीसिही तेथ । सहजे होत समसाम्य ॥ २७ ॥ देशभापावभवे । प्रपंच पदार्थी पालटली नावें । परी रामकृष्णादिनामां नव्हे । भापावैभवे पालटू ।। २८ ॥ सस्कृतवाणी देवें केली तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली असोतु या अभिमानभुली । वृथा बोली काय काज ॥ २९ ॥ आता सस्कृता किवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा । ते पावनचि तत्वता । सत्य सर्वथा मानली ।। १३० ॥ वदूं भानुदास आता । जो को पितामहाचा पिता । ज्याचेनि वश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥ ३१ ॥ जेणे वाळपर्णी आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु । जितोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥ ३२ ॥ जयाची पैदवंधप्राप्ती । पाहो आली श्रीविठ्ठलमूर्ती । कानी कुंडले जगज्योती। करिता राती देखिला ॥ ३३ ॥ तया भानुदासाचा चक्रपाणी । तयाचाही सुत सुलक्षणी। तया सूर्य नाम ठेवूनी । निजी निर्जे होऊनि भानुदास ठेली ॥ ३४ ॥ तया सूर्यप्रभामताप .. १ दशमस्वधाचा अखेर २ शुक्राचाय ३ ज्ञानसूये आचार्यानी पूर्वमीमासेचे सहन केले व 'ज्ञानादेव झणजे ज्ञानापासूनच मोक्षाची प्राप्ति होते, हा सिद्धात स्थापिरा ४ श्रेष्ठ ५ मग ६ काळ्या गाईचे दध का ९ जाता १. आपल्या नोकराला ११ गरीबाची पन्या १२ श्रीमताची पन्या १३ पर्णिर, पाणिग्रहण केले १४ राम ष्णादि नावाला १५ (राम, कृष्ण, सचिदानद, ब्रह्म इसादि नावें संस्कृतात व प्राकृतात सारसो ली अमी तरफदारी केली झणन ती योग्यतेस चटली आहे १६ भाप, भापत १७ हे नाथाचे पणजे होत विजयानगरच्या फिरीदी रामराजान पढरहा पाडुरंग्सची मूर्ति नेली होती, ती यानी शके १४२६ मा र पेतला १९ मानसूर्य १. पदवधव्युत्पत्ति २१ आरति *२ गाथाचा आजा २३ जायाचा वाप २४ निजधामास गेला