या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकमाथी भागवत. महत्यारमनि यासूत्रे धारयन्मयि मानसम् । माकाइय पारमेष्य मे विन्दतेऽव्यातजन्मनः ॥ १५ ॥ जें महत्तत्त्व गा जाण । तें मायेचें प्रथम स्फुरण । ज्यासी क्रिया सूत्रप्रधान । नामामिधान बोलती ॥ ८३ ॥ तेथ अजन्मा मी आपण । जाहलों सूत्राचा सूत्रात्मा जाण । त्या माझ्या स्वरूपाचे ध्यान । सावधान जो करी ॥ ८४ ॥ ज्या सूत्राचेनि प्रकाशप्रवाहे । ब्रह्मांड हिरण्यगर्भ प्रकाशला राहे । ते प्रकाशता त्यासी वश्य होये । येणे सूत्रात्मा पाहे निदिध्यासने ॥ ८५ ।। त्या निदिध्यासनापोटीं । करूं शके ब्रह्मांडकोटी । एवढी प्रकाशसिद्धी गोमटी । हे मजवीण नुठी साधकां ॥८६॥ विष्णौ ध्यधीश्वरे चित्त धारयेरकालविग्रहे । स ईशिरयमयामोति क्षेत्रक्षेप्रशचोदनाम् ॥ १५॥ मायादित्रिगुणनियंता । जो कळिकाळातें आकळिता । उत्पत्तिस्थितिप्रळयको । जाण तत्त्वता अतर्यामी ॥ ८७ ॥ त्या मज विष्णूचें ध्यान । निरतर जो करी जाण । त्यासी अदृष्टद्रष्टेपण । शक्तिप्रेरण ईशित्वे ये ।।८८॥ मिथ्या बुद्धिवळाच्या खेळाप्रती । स्वारीची जाणे गती निगती। तेवीं मिथ्या ससारमतीती। भूताची ऑगती निर्गती खये जाणे ॥८॥ तो जीवादि शरीरप्रेरण । स्वयें करूं शके आपण । करिता अतर्याम्याचें ध्यान । एवढी सिद्धी जाण उपतिष्ठे ॥ ९० ॥ तो आपुलेनि प्रतापस्वभावी । मशकाहाती मेरू विभोंडवी । नीचहस्ते सृष्टी विध्वंसूनि माडवी । कां इंद्राते मारवी उंदिराहातीं ॥९१॥ यापरी एकातें मारवी। जीवे गेलिया जीववी । अचेतनातें पालेजवी। ये सिद्धीची पदवी ईशित्व ॥ ९२॥ ___ नारायणे तुरीयाख्ये भगवच्छब्दान्दिते । मनो भय्यादधद्योगी मवर्मा वशितामियात् ।। १६ ।। जीव शिव आणि प्रकृती । याहूनि परती चौथी स्थिती । ज्यातें नारायण ह्मणती । जाण निश्चिती सज्ञान ॥ ९३ ॥ जागृती स्वम सुषुप्ती । यावेगळी तुरीय स्थिती । त्यातें नारायण ह्मणती । यथानिगुती सज्ञान ॥ ९४ ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । याअतीत चौथा जाण । त्यातें ह्मणती नारायण । ज्ञानविचक्षण निजबोधे ॥ ९५ ॥ त्रिपुटीवेगळी जे मातू । असोनियां त्रिपुटी आतू । जो का त्रिपुटीसी अलिप्तू । तो मी विख्यातू नारायण ॥ ९६ ॥ यश श्री वैराग्य ज्ञान । ऐश्वर्य औदार्य हे पडण । नित्य वसती परिपूर्ण । तो मी नारायण भगवंत ॥ ९७ ॥ त्या मज नारायणातें ध्याता । माझी वशिता सिद्धी ये हाता सर्व कर्मी अलिप्तता। भोगूनि अभोक्ता भोगातें ॥ ९८॥ निर्गुणे ब्रह्माणि मयि धारयन् विशद मन । परमानन्दमामोति यन्त्र कामोऽघसीयते ॥ १७ ॥ चित्तदेवता सत्वगुण । इंद्रियें तो रजोगुण । विषय केवळ तमोगुण । हेंचि आवरण परमानंदा ॥ ९९ ॥ परमानदासी आवरण । आडवे असती तिन्ही गुण । त्याते साडूनि निर्गुण । ब्रह्म परिपूर्ण मज जो ध्याये ॥ १०॥ त्यासी माझिये ध्यानस्थिती । होय परमानदअवाप्ती । ज्या आनदामाजी उपशांती। होय निश्चिती सकळ कामा ॥१॥ झालिया परमानंदप्राप्ती । सकळ काम निमग्नं होती। जेवीं सूर्योदयाप्रती । तारा हारपती सचंद्र ॥२॥ तेवी परमानंदाच्या पोटीं । हारपती कामकोटी । तेथ इद्रियसुखाच्या गोठी। १ कियाशक्तिप्रधान व न्याला सून हाणतात त्या महत्तात्वरूप मास्या ठायी चित्त लावणान्यास प्राकाश्यसिद्धी होते २ ब्रह्माड हा देह ज्याचा असा हिरण्यगर्भ व ब्रह्माड ही दोन्ही प्रकाशित होतात ३ अदृश्य वस्तू पाहणे ४ येणे जाणे ५ फोदवी, नाहींसा करवी ६ सचेतन करतो ७ यांच्या पलीकडचा ८ पद्गुणाचे ऐश्वर्य ज्याच्यापाशी आहे त्याला । भगवान् मणतात "ऐश्वर्यस्य समप्रस्य धर्मस्य यशस थिय । ज्ञानवैराग्ययोचैव पण्णा भग इतीरणा ॥" ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, संपत्ती, शान व पैराग्य पा सहा परिपूर्ण गुणाना मग झणतात १ आच्छादन. १.स