या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत नाही बोध । दांत चावूनि साहतां वंद्व । ते क्षमा नोहे शुद्ध । ऐक विनोद क्षमेचा ॥१२॥ अंतरी ठसावलें परब्रह्म । वाह्य सर्वा भूती जाहला सम । ते क्षमा मी ह्मणे पुरुपोत्तम । इंद्वाराम वाधीना ॥ १३ ॥ असत्य पापी सकळ सृष्टी । असत्यामाजी पापकोटी। असत्याची खोटी गोठी । जो तो पोटी सांडीना ॥ १४ ॥ उभय लौकिकी खोटेपणे । असत्य बहिर्मुख नाणे । तें मनीहूनि जेणे सांडणे । तो म्यां श्रीकृष्णे बंदिजे ।। १५ ।। तें गुह्यांमाजी अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन । तें मी ह्मणे मधुसूदन । सत्यप्रिय जाण निजगुह्य ॥ १६ ॥ स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनु शतरूपा मूळमिथुन । तें मी ह्मणे नारायण । मनुष्यत्रजन सद्भावे ॥ १७ ॥ ___ सवत्सरोऽस्यनिमिपामृतूना मधुमाधवौ । मासानां मार्गशीर्षोऽह नक्षत्राणा तथाऽभिजित् ॥ २७ ॥ सावधाने अविकळ । न चुकतां प. पळ । संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें ह्मणे ॥ १८ ॥ सरेणूपासूनि जाण । लवनिमिपदिनमान । संवत्सरवरी सावधान । गणी मी सकर्पण काळगणना ॥ १९ ॥ मधुमाधववसंतयुक्तू । कृष्ण ह्मणे तो मी ऋतू। मार्गशीर्ष मी मासांआंतू । जो धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥ २२० ।। गणितां न ये पंचोंगात । नक्षत्री असोनि सदा गुप्त । अव्यक्त परी सज्ञान प्राप्त । तें मी अभिजित माणे हरी ।। २१॥ अह युगाना च कृत धीराणा देवलोऽसित । द्वैपायनोऽस्मि ब्यासाना कवीना काव्य आरमवान् ॥ २८ ॥ युगांमाजी कृतयुग । तें मी ह्मणे श्रीरंग । जेथ संपूर्ण धर्म साङ्ग । अधर्मभाग असेना ॥ २२ ॥ निजधैर्य अतिअद्भुत । असित देवल धैर्यवंत । तो भी 'ह्मणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवा ॥ २३ ॥ वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास । तो मी झणे हपीकेश । निवडूनि द्विजास दीधले वेद ॥ २४ ॥ कवि त्यांमौजी परमार्थज्ञाता। उशना कवी जाण तत्त्वतां । तो मी हाणे रमाभा । निजात्मकविता मी शुक्र ॥ २५ ॥ धासुदेवो भगवता व नु भागवतेप्वहम् । किपुरुपाणा हनुमान्विद्याधाणा सुदर्शन ॥ २९ ॥ ' पडणभाग्य भाग्यवंत । पूर्णाशे जो भगवंत । वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथ श्रीकृष्ण ॥ २६ ॥ भागवतामाजीं अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण । ऐसे बोलतां श्रीकृष्ण । उद्धवे श्रीचरण वंदिले ॥ २७ ॥ उद्धवें करितां नमन । कृष्णे दीधले आलिंगन । आनंदें कोंदले त्रिभुवन । स्वानंदधन तुष्टला ॥ २८ ॥ उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण । 'मी तो तूं जे बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥२९॥ दोघांचे मोडले दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण । कृष्णाअंगी उद्धधपण । सपूर्ण जाण वाणले॥२३०॥ तेणे उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाधला आपणांत । मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हैं जाणोनि अनंत बोलिला ॥ ३१ ॥ वानरांमाजी हनुमंत । 'तो मी हाणे १ कौतुफ, नवल २ क्षेम झणजे निर्भयस्थान, यात अतनिष्ठा हे माझं स्वरूप होय ३ द्वद्वाचा समूह ४ बहिर्मति असणे हच अमत्य ५ सृष्टीचे ६ जोडप्यात-ज्याच्या देहामध्ये खायभुवमा व शसारूपा है पहिलं जोडपं उत्पन झाले तो प्रजापति मी ७ जे कधी प्रमत्त (बेसावध) नसतात त्यात सवत्सर भी ८ कोणत्याही घरात पडलेल्या सूर्यकिरणामध्य सूक्ष्म परमाणु दिसतात त्यापासूा ९क्षण, पळ, घटी, प्रहर, दिवस इत्यादि १० मधु ह्मणजे चैन प माधव कागज यशाप ११ उत्तरापाढाचा चवधा पाद व श्रवणाचा पहिला पाद १२ कवींमर्थे १३ शुक्राचार्य १४ "उत्पत्ति प्रलय चप भूतानामागति गतिम् । वेति विद्यामविद्या च स बाच्यो भगवानिति" १५ क्षणभर १६ मोठेपणाने फुगला