या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४२ एकनाथी भागवत. मूर्तिमंतपणे उभी असती ॥४०॥ तेथे सनकादिकांचा प्रश्न । ब्रयासी न सांगवे जाण । तुवा हंसरूपें येऊन । समाधान दीधले ॥४१॥ ते ब्रह्मसभेच्या ठायी । तुजऐसा वक्ता नाहीं। तो तूं भक्तानुग्रहे पाहीं । या लोकाच्या ठायी मूर्तिमंत ब्रह्म ॥ ४२ ॥ तेणें तुवां सर्व कर्मधर्मसंस्था । करूनि दाविली तत्त्वता । तो तूं निजधामा गेलिया आतां । स्वधर्मवका मग कैचा ॥ ४३ ॥ भक्तियुक्त स्वधर्मगती । सागावया यथास्थिती । तुजवांचोनियां श्रीपती । आणिकासी शक्ती असेना ॥ ४४ ॥ तूं भक्तसाह्य जगज्जीवन । भक्तमंदगजभंजन । यालागी नावे मधुसूदन । ऐसें प्राथून वोलत ॥ ४५ ॥ तत्व न सर्वधर्मज्ञ धर्मस्त्वद्भक्तिरक्षण । यथा यस विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥ ७ ॥ तूं सर्वज्ञ ज्ञानमूती । तरी मनुष्याची कर्मगती । वर्णाश्रमांची धर्मस्थिती । यथानिगुती मज सांग ॥ ४६ ॥ वर्णवाद्याचें निजकर्म । तेही सांगाचे विहित कर्म । उद्धवें प्रार्थिला पुरुषोत्तम । तेणे मेघश्याम तुष्टला ॥४७॥ सकळ जनाचा हितकर । उद्धवे प्रश्न केला संधर । तो ऐकोनि शुकयोगींद्र । आनंदनिर्भर तेणे प्रश्ने ॥ ४८ ॥शुक ह्मणे परीक्षितीसी । धन्य वुद्धी ते उद्धवासी । जेणे प्राथूनि हुपीकेशी । जाहला जगासी उपकारी ॥ ४९ ॥ श्रीवादरायणिवाच-एव स्वभृत्यमुख्येन पृष्ट स भगवान्हार ।। प्रीत क्षेमाय माना धर्मानाह सनातनान् ॥ ८॥ शुक ह्मणे गा परीक्षिती । सावधान होई चित्तीं । धन्य उद्धवाची प्रश्नोक्ती । स्वकर्म मुक्ती पुशिली ॥ ५० ॥ जो भृत्यांमाजी पढियंता । अत्यंत आवडे, कृष्णनाथा । त्यावेगळे श्रीअनंता । क्षणही सर्वथा कमेना । ५१ ॥ ज्यापाशी गा निजगुज । सदा सांगे गरुडध्वज । ज्यावेगळे आप्तकाज । अधोक्षज वोलेना ॥५२॥ ज्याच्या वचनासी विलंबू । क्षण न करीच रमावल्लभू । जो ब्रह्मादिका दुर्लभू । तो जाहला सुलभू उद्धचा ॥ ५३॥ या जगी भृत्यमुख्यता । आली उद्धवाचे हाता । तेणे प्राथूनियां भगवंता । स्वकर्मे मुक्तता पुशिली ।। ५४ ।। हो का ज्याचेनि प्रश्नधर्मे । जग उद्धरिले यथानुक्रमें । ज्यालागी गा पुरुपोत्तमें । मोक्ष स्वधर्म प्रकटिजे ॥ ५५ ॥ स्वधर्म करिता स्वभावता । निजमोक्ष लामे यिता । एवढ्या उपकाराची कथा । उद्धवे तत्त्वता पुशिली ।। ५६॥ ऐकोनि चातकाचे वचन । गोंनि वर्षे जेवी घन । का वत्सहुकारे जाण । ये हुंबरोन धेनु जैशी ॥ ५७॥ तेवी ऐकोनि उद्धवाच्या बोला । कृष्ण निजबोधे गर्जिनला । अतिस्वानंदें सतोपला । काय बोलिला गोविदू ॥ ५८॥ श्रीभगवानुवाच-धम्य एप तव प्रश्नो नै प्रेयसकरो नृणाम् । वर्णाश्रमाचारवता तमुद्धव निबोध मे ॥९॥ . जेवीं का पुत्र एकुलता । त्यासी कांही वंचीना माता । तेवी उद्धव श्रीकृष्णनाथा । त्याचे पचन वृथा हों नेदी ॥ ५९॥ हरिखें ह्मणे सारगपाणी । धन्य उद्धवा तुझी पाणी । मोक्षमार्गाची निशाणी । हे जनालागोनी त्वां केली ॥६०॥ तुझ्या प्रश्नाचे प्रश्नोत्तर । वर्णाश्रमी जे कोणी नर । त्यासी स्वधर्मचि मोक्षकर । ऐक साचार सांगेन ।। ६१॥ कल्पादिपासोनि स्वधर्मसस्था । पुरातनयुगवर्ती कथा । तुज मी सागेन तत्त्वतां । ऐक आता उद्धवा ॥ १२ ॥ १ कर्मधर्माची स्थापना २ भकमद हाच गज त्याला मारणारा ३ सुदर, उत्तम ४ भावडता. ५ करमत नाही. ६ निरगुन ७ सेवकात प्रमुसव ८ ठकवीत नाहीं. ९ सिमी-निसण '