या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत ॥२६॥दीनाचिये दयेलागी।जो 'रिघे जळत्या आगी। त्याचे चरण मी वंदी वेगौं। धन्य जगी दयाळू।।२७॥ऐशिये दयेचेनि गुणे । मज अनंतालागी तेणे । विकत घेतलें जीवेभावे जाणे । की जाहलों पोसणे मी त्याचें ॥ २८ ॥ चालागी दयालुवाचे घरीं। मी सदा नाटिका काम करी । जे दयावंताचे अवसरी । ते माझे शिरी सर्वदा ॥ २९ ॥ जो जाणे दीनांचा विचार । दीनदयालु जो साचार । उद्धवा तो माझे निजभाडार । सुखाचे सुखसार तो मज ॥१३०॥ या नाव गा दया जाण । ते हे नववे लक्षण । आतां सत्याची उणखूण । तुज मी सपूर्ण सांगेन ॥ ३१ ॥ सत्याचें सत्यत्व हैं ऐसें । जागृतिस्वप्नसुषुप्तिवशे । ज्यासी असत्यता न स्पर्शे । निज सत्य ऐसें निडारिले ॥ ३२ ॥ ऐसें सत्य परिपकल्या पोटीं। सत्य वाचा सत्य दृष्टी । निजसत्यत्वे सत्य सृष्टी । पडिली तुटी असत्याची ॥ ३३ ॥ यापरी गा सत्यत्व जाण । त्या नांव दहावे लक्षण । हे ब्राह्मणाचे सपूर्ण । कर्माचरण स्वभावे ॥ ३४ ॥ ब्राह्मणप्रकृतीचे क्षितीं। या दश लक्षणाची उत्पत्ती । स्वाभाविक सहजगती । अकृत्रिम स्थिति उद्धवा ॥ ३५ ॥ येही दश लक्षणी संपूर्ण । वर्णवरिष्ठ वद्य ब्राह्मण । आता क्षात्रप्रकृतीचे गुण । ऐक निरूपण उद्धवा ॥ ३६॥ तेजो यल पति शौर्य तितिक्षादायमुद्यम । स्थैर्य ब्रह्मण्यतैश्चय क्षत्रप्रकृतयस्त्विमा ॥ १७ ॥ ब्राह्मणप्रकृति दश लक्षण । तुज म्यां सागीतली सुलक्षण । आतां क्षात्रवृत्तीचे दश गुण । ऐक सपूर्ण उद्धवा ।। ३७ ॥ तेज हणजे प्रतापशक्ती । जैसा क्षितितळींचा गर्भस्ती । ज्याचिया प्रतापदीप्ती । लोपले जाती महींद्र ॥ ३८ ॥ क्षात्रधर्मी प्रथम काज । तया नांव जाण तेज । आता क्षात्रवळाची पोज । ऐक चोर्ज सांगेन ॥ ३९ ॥ त्याच्या शरीरवळाचें कोड । एकला लक्षावरी दे झंड । जरी तुटला दुधंड । तरी वैरियाचे तोंड विभाडी ॥१४०॥ रिघता रणामाझारी । दुजयाचे साह्य न विचारी । जेवी पनगजी केसरी । तेवी रिघोनि दळभारी विभाडी वीर ॥४१॥ आकाश दाटल्या निशाचरी । भूमंडळी कोदल्या असुरीं । ऐसे प्रबळ वळें आत्या वैरी ।ज्याचे धृतीमाझारी विस्मयो नुठी ॥४२॥ आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडवडी । तरी ज्याचे धृतीची रोकडी। नव्हे वाकुडी रोमावळी ॥४॥ वोर्डवलियाही कल्पांती। धाक रिघों नेणे ज्याच्या चित्ता। ऐसे निजधैर्य स्वभावता । धृति तत्त्वता ती नाव ॥४४॥ चौऱ्याशी दंडायुधे करूं जाणती। शस्त्रास्त्रे धारणा युक्ती । स्वधर्मे आवश्यकें करिती । या नाच धृति क्षत्रियांची ।। ४५ ॥ शूराचे शौर्य तें कैसे । शत्रूचे निशेप नाव पुसे । वैरी कोणी कोचि नसे । करणे ऐसें ते शौर्य ॥ ४६ ॥ धर्मयुद्धाची शौर्यवृत्ती । जेणे विजयश्री चढे हातीं। दुश्चित्त निःशस्त्री न हाणिती । पळतया न मारिती महाशूर ॥४७॥ समुख आलिया रणांगणीं । मार्गे पावो न ठेवी रणीं । एकला विभाडी वीरक्षोणी । हे स्वधर्मकरणी निजशौर्य ॥४८॥ मृत्यूएवढा महावैरी । जो निःशेष नाहीं करी । त्याच्या शौर्याची थोरी । सुरासुरी वानिजे ॥४९॥ एवं निजशौर्य निर्धारा । निवैरी करणे धरा । हा चौथा गुण खरा । जाण क्षात्र १ पेटलेल्या आगीत शिरतो २ पोसलेलें माणूस, आश्रित, दास ३ प्रसगी ४ पूर्णतेस आल्यावर ५ सूर्य ६ राजे, तेज ागताच ज्ञानोबानाही सूर्यच आठवला होता " आणि सूर्याचेनि प्रतापे । कोडिही नक्षत्र हारपे" ५ चमत्कार मौज ८ लगट करितो ९ दोन तुकडे होऊन १० फोडी ११ धैर्य लवमान ढळत नाही १२ प्रळयकाळ आला तरी १३ धन्याचे नाव पुसून जाते, त्याला कोणी शत्रूच राहत नाही १४ उदासीन किंवा नि शस्त्र क्षारल्यास १५ वीराची भक्षोहिणी, हजारों वीर १६ 'निवारमतिकम करणे याचें नांव शौर्य