या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतरावा. द्वारा क्षत्रियांचा ।। १५० ॥ शस्त्राचे घाय वाजता माथा | का सपिच्छ वाण खडतरता । रणांगणी न सरे मागुता । हे सहिष्णुता क्षनियाची ॥ ५१ ॥ आलिया गजदळाचे थाट । महावीराचे पडघडाट । तो यावा साहे सुभट । सहिष्णुता चोखट ती नांय ।। ५२ ।। समुद्रलहरींच्या संपाता । कुलाचल न सरे परता । तेवीं परसैन्याच्या आधाता । न सरे मागुता रणागणीं ॥५३॥ तेथ यशअपयशाची व्यथा । हर्षशोकविषमता । वाधीना क्षत्रियाच्या चित्ता । सर्वसहिष्णुता या नाम |॥ ५४॥ या नांव तितिक्षा जाण । हे क्षत्रियाचे पाचवे लक्षण । ऐक औदार्याचा गुण । दातेपण क्षत्रियाचें ।। ५५ ।। क्षत्रियांचे प्रकृत्तीस जाण । द्रव्य तें तृणासमान । याचकाचे निवे मन । ते देणे दान सर्वस्वं ॥५६॥ देश काल सत्पात्र स्थान । तेथ देऊनि सन्मान । निर्विकल्पभावे गहन । देणे दान विध्युक्त ॥ ५७ ॥ चन्द्र चकोरात पाही । सदा देता बने कांहीं । तेवी हा याचकाचे ठायीं । पराअखता नाही क्षत्रिया ॥१८॥ऐसे स्वाभाविक जे दानाहा क्षत्रियाचा प्रकृतिगुण । या नाच गा उदारपण । सहावे लक्षण क्षत्रियाचे ॥ ५९॥ परमार्थप्राप्तिउपायौं । स्वधर्मनिष्ठा क्षत्रियाठायीं । जो जो व्यवसानो करणे कांहीं । तो उद्यम पाही बोलिजे ॥ १६० ॥ वेचूनिया निजप्राण । गोब्राह्मणाचे सरक्षण । स्वधर्म प्रजापालन । पृथ्वीरक्षण निरुपद्रवे ॥शा या नाव गा उद्यम जाण । क्षत्रियाचें सातवें लक्षण । आता स्वधर्मस्थैर्यगुण । तेही निरूपण अवधारी ।। ६२ ॥ गोप्रालणसरक्षणता । स्वधर्म प्रजापाळकता । ये ठायीं उबगू न ये चित्तार या नाव स्थिरता क्षत्रियाची ॥६॥ स्वधर्म जे स्थिरता । ते आठवे लक्षण तत्त्वता । ब्राह्मणभक्तीधीजे कथा। ऐक आता सांगेन ।।६४॥ परमार्थप्राप्तीचे कारण। क्षत्रियासी मुख्यत्वे गुरु ब्राह्मण । त्या ब्राह्मणाचें ब्रह्मभजन । सर्वस्वे जाण करावे ॥६५॥ ब्रह्मभावे प्रामाणभजन । विधियुक्त देवोनि सन्मान । अनुदिनी ब्राह्मणपूजन । सदाचे जाण जो करी ।। ६६ ॥ जो मदावें ब्राह्मणपूजा । सन्माने सुरसी करी द्विजा । उद्धवा तो आत्मा माझा । तेणे मज अधोक्षजा पूजिलें ।। ६७ ॥ क्षत्रिय सन्माने द्विज पूजिती । तेणें त्यांसी ऐश्वर्यप्राप्ती । ब्राह्मण ब्राह्मणा द्वेपिती । तेणे पावती दरिद्रदु ख ॥ ६८ ॥ ब्राह्मण. भजनमार्ग । ब्रह्मसुख पाया लागे । ब्रह्मसायुज्य घर रिघे । तरी भक्त नेघे द्विजभजने ऐसें करिता साह्मणभजनामी परब्रह्म होय त्या अधीन । त्याच्या ऐश्वर्या, चिल्ल। दहावें ते ऐक ।। १७० ॥न करिता ब्राह्मणभजन । अगी ऐश्वर्य न ये जाण । मी जाहलों पड्गुणैश्वर्यसपन्न । सदा द्विजचरण हृदयीं बढ़ पाहता ॥७१॥ ब्राह्मणभजने स्वभावता । माझी सत्ता ये त्याच्या हाता । तेव्हा त्याची आज्ञा वदिती माथा । जाण तत्त्वता सरासर ॥७२॥ त्याचे आज्ञेभेण । पडों न शके अवषेण । न्यायता प्रजापालन । धर्मसरक्षण त्याचेनी ॥७३॥ येणेच स्वधर्मे अतिचोख । भरत पुरूरवा जनकादिक । महाऐश्वर्य पावले देख । अलोलिक द्विज जने ॥७४ ॥ एव क्षत्रियाचें दशलक्षण । तुज म्या केले - १ बोक्यावर पाय लागले असता. २ अगाला लागतां ३ हल्ला ४ आदळण्याने, सपदा ५ महापर्यंत ६ खभावाला 'देशे काले च पाने च तहान साविक स्मृतम्'-गीता अध्याय १७-२० ८ यावकाचे निवे मनातव नासत नाही १० उद्योग, व्यपहार ११ स्थिर राखायें चित्ता. १२ प्रक्षभावनेनें भजन १३ दररोज १४ मादाणाच्या सेवेर्ने,