या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५४ एकनाथी भागवत. आलस्य दाटी गहन । अत्यंत अल्प में भोजन । तेणें विकळपण देहाचें ॥ १२ ॥ गुरुसेवेलागी जाण । शरीर राखावे सावधान । यालागीं शिष्यासी भोजन । युक्ताहारपण सर्वदा ॥ १३ ॥ गुरुसेवेलागों जाण । शरीर राखावे सावधान । तें गुरुसेवेचे लक्षण । स्वयें जनार्दन सांगत ॥ १४ ॥ शुश्रूपमाण आचार्य सदोपासीत नीचवत् । यानशय्यासनस्थानांतिदूरे कृताञ्जलि ॥२९॥ सर्वदा अतिसादर । न पडताही अंतर । गुरुसेवेसी निरतर । अतितत्पर उल्हासे ॥ १५ ॥ गुरु यानारूढ असतां । पुढे चालावे साटोपंतां । पाठीसी यावे चरणी चालतां। उपचारतासमवेत ॥ १६ ॥ समयोचित जाणोन । द्यावे तांवूल जीवन । करावें चरणसवाहेन । घालावे आसन बैसती तेथें ॥ १७॥ सद्गुरु बैसल्या आसनीं । शिष्ये न बैसावे नेहेंदूनी । दूरी नवजावे तेथूनी । नयनोमीलनी रहावे ॥ १८ ॥ अजैळिसपुट जोडूनी । समुख रहावे सावधानी । गुरूची संज्ञा ज्यालागूनी । तें अविलंनी करावें ॥ १९ ॥ गुरु शेजेवरी निजले असतां । जवळी नसावे सर्वथा । जेथूनि ऐकू ये वचनार्था । तेथे निशी अवस्था क्रमावी ॥ ३२० ॥ मी एक सेवेने सपन्न । ऐसा धरिलिया अभिमान । केले सेवेसी आंचेवण । सवेचि जाण होईल ॥ २१॥ सेवकांमाजी मी एक । केवळ रंकाचाही रक । ऐसा भावो निष्टंक । सेवेसी देख करावा ॥२२॥ तैसेचि नीचे काम करितां । लाज न धरावी सर्वथा । वग न मानूनी चित्ता। उल्हासता गुरुभजनीं ॥ २३ ॥ एववृत्तो गुरकुले बसेनोगविवर्जित । विद्या समाप्यते यावद्विगतमखण्डितम् ॥३०॥ सांडोनि सकळ भोगांतें । गुरुकुळी राहोनि तेथें । गुरुसेवेचेनि व्रतें । प्रिय सर्वांतें तो जाहला ॥ २४ ॥ एवं गुरुसेवायुक्त । धरोनियां अखंड व्रत । पावला वेदशास्त्र समस्त। पढणे समाप्त पं जाहले ॥ २५ ॥ एवं विद्या जाहलिया समाप्त । उपकुर्वाण नैष्ठिक व्रत ।' स्वयें सागावयास अनत । पुढील श्लोकार्थ सांगतू ॥२६॥ यद्यसौ छन्दमा लोकमारोक्षन् ब्रह्मविष्टपम् । गुरवे विन्यसे देह स्वाध्यायार्थ बृहद्रत ॥ ३ ॥ जरी ब्रह्मचारी व्रतस्थ । येणेचि आश्रमे निश्चित । सत्यलोक वैकुंठपर्यंत । वाछी वेदोक्त मत्माप्ती ॥ २७॥ तेणे योवजन्म आपण । दृढ करावया गुरुभजन । निजदेहाचेही जाण। करी समर्पण गुरुचरणीं ॥ २८ ॥ सद्गुरुभजनाची परवडी । नित्य नूतन आवडी । निजा. स्मभावे चोखंडी । लागली गोडी गुरुचरणीं ॥ २९ ॥ पूर्वील व्रतें व्रत धरी । तेचि व्रत दृढ करी । होय नैष्ठिक ब्रह्मचारी । गुरुभजनावरी निर्धारू ॥३३०॥ न मनी सन्मानाचे कोडे । न हाणे हे विपय गोड। न धरी ससाराची चाड । व्रती दृढ व्रतस्थ ॥३शा ऐसा थोर व्रते व्रतधर । तैसाचि गुरुभजनी सादर । करी सद्गुरूशी विचार । वेदातसार स्वाध्यायें ॥ ३२ ॥ स्व झणिजे आत्मा जाण । ते ठायीं नित्य अनुसंधान । तो स्वाध्याय हाणती सज्ञान । ज्ञानविचक्षण निजद्रष्टे ॥ ३३ ॥ ऐशिया साधकासी जाण । सर्वत्र ब्रह्मभावन । हेंचि स्वमुखें मधुसूदन । स्वयें आपण सागत ॥ ३४ ॥ १ घेरून टाकितो २ ग्लानि, विकळवळण ३ मितभोजन ४ मध्ये स्ट ५ पालखी वगैरे वाहनात बसले असता, ६ उत्साहाने ७ सामानासह ८ उदक ९ पाय रगड़णे १० टंकून, चिकटन ११ जाऊ नये १२ नेनसकेतात रहावें १३दो ही हात १४ सकेत, इच्छा १५ तत्क्षणी १६ रानी रहावे १७ नाश १८ प १९ हल २० कटाला, पास २१ गुरुच्या घरी २२ मरेपर्यत २३ उत्तम, चांगली. २४ आवट, २५ तत्पर २६ आत्मवरूपाच्या ठिकाणी रिय भामपान ठेवणे हा खाध्याय २७ देवरयुद्धि