या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला. काळरूपं क्षोभला ॥ २६ ॥ अतुर्वळ अतिप्रवळ । बाढले जें यादवकुळ । ते वीर देखोनि सकळ । असा केवळ श्रीकृष्णासी ।। २७ ।। नया यत परिभवोऽस्य भयेकथचिन्मरसश्रयस्य विभवोगहनस्य नित्यम् । भत कार यदुकुलस्य निधाय येणुस्त्रयस्य वहिमिव शातमुपैमि धाम ॥ ४ ॥ मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्ततील अधर्मा । श्रियोन्नत अतिगर्वमहिमा । मुख्य अकर्मा निजहेतु ॥ २८ ॥ हे मदळे अतिप्रबळ । अतिरथी जाले सकळ । यासि अप्रतिमल्ल दिग्मंडळ । यांत दमिता केवल मी एकु ॥ २९ ॥ हे नाटोपती इद्रादि देवा । दैत्यराक्षसा का दानवां । शेखी निर्दाळावया यादवा । मागुते मज तेव्हा पडेल येणे ।। २३० ॥ तरी आताचि आपुले दिठी । कुळ वायूं काळगांठी । ऐसा विचार जगजेठी । निश्चयो पोटीं दृढ केला ॥ ३१ ॥ यदुवंशवंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळी । तेथें अवकृपेची इंगळी । ऋपिशापमेळी कपटे पडली ॥ ३२॥ ते मुळी पेटली श्रीकृष्णसकल्प । धडाडली ब्रह्मशा। ते स्वजनविरोधरूपे । काळानिको नाशील ॥ ३३ ॥ ऐसे यादवकुळनिर्दळण । करूनियां स्वयें श्रीकृष्ण । निरमूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करू इच्छी ॥ ३४ ॥ एव व्ययमितो सास यसक्रप ईश्वर । शापयाजेन विप्राणा सजह स्वक्ल विभु ॥ ५ ॥ . यापरी आपुले कुळ । नासूं आदरिले तत्काळ । हाचि विचारू अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥ ३५ ॥ हेंचि कार्य होय कसें । तें विचारिले जगदीशे । ब्रह्मशापाचेनि मिसे। कुळ अनायासे नासेल ॥ ३६॥ इतके है जै सिद्धी जाय । ते सरले अवतारकृत कार्य । मग स्वधामा यदुवर्य । जावो पाहे खलीला ॥३७॥ लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मकिया अतिपायन । जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥ ३८ ॥ स्वमूर्या लोकलावग्यनिर्मुक्त्या लोचन नृणाम् । गीर्भिस्ता सरता चित्त पदेस्तानीक्षा क्रिया ॥ ६ ॥ जो सकळ मंगळा माळ पूर्ण । जो का गोकुळी कामिनीरमण । मोक्षाचे तारूं स्वयें श्रीकृष्ण । ज्याचें वरवेपण अलोलिक ॥ ३९ ॥जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम । ज्याचें त्रिलोकी दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ।। २४० ॥ श्रीकृष्णाचिया सौदर्यापुढे । लक्ष्मी भुलोनि जाली वडें । मदन पोटा आले वापुडें । तेथ कोणीकडे इद्र चन्द्र ॥४१॥ ज्याचें त्रैलोक्यपाचन नाम । जो करी असुरांते भस्म । तो बोलिजे अवाप्तकाम 1 भक्ता सुगम सर्वदा ॥४२॥ त्रिलोकींचे बरवेपण । भुलोनि कृष्णापायी आले जाण । ना कृष्णलेशे वरवेपण । शोभे सपूर्ण तिहीं लोकी ॥ ४३ ।। जो सकल सौदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा । ज्याचिया अगसगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥ ४४ ॥ जो हैरिखत्वाचा सोलींव हरिख । की सुखें सुखावतें परमसुख । ज्याचेनि विश्नांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥४५॥ तो अमूर्त मूर्तिधारण । की सकललोकलावण्य । शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्यसपूर्ण साजिरी ॥ ४६ । घृत विजले की विधुरले । परी घृतपणा नाहीं मुकले । तेवी अमूर्त मुर्ती मुसावले । परी तें सचले परब्रह्म ॥४७॥ तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखी देखणेचि सरे । पहाणे पाहातेनिसी माघारें। लाजोनि वोसरे सलज्ज ॥४८॥ दृष्टी धाली दे ढेकर । आपण आपुले शेजार। होवोनियां परात्पर । सुखावे साचार श्रीकृष्ण.१ रापप्तीन उन्मत २ ठिणगी ३ निमुर ४ विचारिजे ५ पूर्णत्ये ६ बलान्य, प्रसिद्ध ७ पूर्णकाम ८ यालम, प्रिय -९ दरिखा १. सुखाचेंजे परम सुस ११ सुदर १२ कहा पातळ झार १३ पाहताच १४ भोसरत