या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६२ एकनाथी भागवत. यहच्छयोपपनेन शुक्छेनोपार्जितेन चा । धनेनाऽपीडयन् भृत्यापायेनैवाहरेत् कतून ॥ ५५ ॥ . . . . . . । उदीमध्यापार जोडिलें । कां जें असत्ये गृहा आलें । नातरी परपीडा प्राप्त जाहलें । कां आडवूनि घेतले जे द्रव्य ॥८६॥ द्रव्य देतां चरफडी । ते शिष्या घालून सांकडीं । असा अर्थ जोडिला जोडी । ते अपरवडी द्रव्याची ॥८७॥ जे यदृच्छा सहज आले । कां में शुक्लवृत्ती जोडिले । जे सुखोपायें हाता आलें । तें द्रव्य विहिले यज्ञार्थ ॥ ८८॥ पाडूनि कुटुंबासी लंघन । सर्व द्रव्य वेंचूनि जाण । करूं नये यज्ञाचरण । अधर्मपण तेणेही ॥ ८९ ॥ का जीविका जीवनवृत्ती । याग करूं नये निश्चिती । लौकिकी मिरवावया स्फीती । याग करिती ते मंद ।। ४९० ॥ न धरितां कर्माभिमान । शुद्ध द्रव्य जोडिल्या जाण । करावे यज्ञाचरण । हें स्वधर्मलक्षण गृहस्थाचें ॥९१ ॥ सांड्रानियां विषयलिप्सा चित्ती । त्यजूनि गृहाची गृहासक्ती । गृहस्थें धरावी निवृत्ती। हें स्वयें श्रीपति सांगत ॥९२|| कुटुम्नेषु न सजेत न प्रमायेरकुटुम्ब्यपि । विपश्चिमश्वर पश्येदृष्टमपि दृष्टवत् ॥५२॥ . . जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती । परी न धरावी त्यांची आसक्ती । सावध राखावी चित्तवृत्ती । परमात्मयुक्तिसाधनें ॥ ९३ ॥ सांडूनि कल्पना प्रमाद संग । चुकवूनि प्रमदोचें अग । ईश्वरनिष्ठा अतिचांग । वृत्ति अभंग राखावी ॥ ९४ ॥ गृहस्थ कुटुंबविषया. सक्ती । पाहतां विवेकाचिये स्थिती । परिपाकै नश्वरप्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥१५॥ जैसा इहलोकींचा परिपाकू । तैसाचि जाण स्वर्गलोकू । उभयतां नश्वर देखू । केवळ मायिकू मिथ्यात्वें ॥ ९६ ॥ स्त्री पुत्र आणि धन । हे नश्वर जैसे का स्वम । येचिविषयीं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ९७॥ पुनदाराप्तवन्धूना सहमः पान्थसङ्गम । अनुदेह वियन्स्येते म्वनो निद्रानुगो यथा ॥ ५३ ॥ . जैसे वृक्षातळी पथिक । एकत्र मीनले क्षण एक.। तैसे पुत्रदाराप्तलोक । सर्वही क्षणिक सगम ॥ ९८ ॥ उभय नदीप्रवासीं । काष्ठं मीनली सगमी जैसीं । सोयरी सर्व जाण तैसीं । हेलाव्यासरसी फांकती ॥ ९९ ॥ जे योनी जीव देहधारी । "तेथें तेचि योनीची सोयरीं । ऐशी अनंत जन्में ससारी । तें अमित सोयरी जीवाची ॥ ५०० ॥ परी ये योनीची योन्यंतरी । येरयेरा नोळखती सोयरी । जैसी ये स्वप्नींची पैदार्थपरी । स्वमांतरी रिघेना ॥१॥ यापरी हे समस्त । स्त्री पुन बधु आप्त । मायामय कल्पित । जाणे निश्चित तो धन्य ॥२॥ इत्य परिझशन्मुसो गृहेमतियिवद्वसन् । न गृहरनुबध्येत निर्ममो निरहनुत ॥ ५४॥ ऐसेनि विवेकें विवेकवंता । कदा न बाधी, मोहममता । अतिथीच्या परी सर्वथा । अनासक्तं गृहवासी ॥३॥, एवं निर्मानमोहममता । जो उदासीन गृहावस्था । ज्यासी निष्कामनिर्लोभता । त्यासी अहता वाधीना ॥४॥ निर्ममता निरभिमान । व्हावया १ अयोग्य प्रकार २ घरच्छन मिळेल ते ३ जे सरळ व न्यायाच्या व्यरमायाने मिळते ते ४ यक्षाच्या उपमा त थाना उपाशा ठेवून यज्ञ करण्यात पुण्य नाही ६ दभ, मोठेपणाचा डोल. ७ विपयेच्छा. ८ परसावधपणा स्त्रियांच, १० परिणामी ११ सोटी झणा ऐहिक तशीच पारलौलिक फळेही नश्वर आहेत है त्या ओठन मदापी भासक असाव १२ प्रवासी १३ लाटेसरशी दूर होतात. १४ ते तिये योनीची. १५ असंख्य १६ यापरी १७ अन्य जन्मांत १८ पदार्थाचे प्रकार, पदार्थचोरी. १९ आसक्तिन ठेवणारा. २० मा, मोह, ममता, याविषयी उदासीन