या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठराया यालागी श्रीभागवता । तूचि अर्थ तूं कविता । तूंचि अर्थावबोधकता । हेही बोलविता तुचि आत्मा ॥ ५ ॥ जैशी आपुलींचि उत्तरें । पडसादें होती प्रत्युत्तरें । तेषी माझेनि मुखातरें। तूचि कवित्वद्वारे वोलका ॥ ६ ॥ बोलका श्रीभागवती । श्रीकृष्ण कृपामूर्ती । तेणे वर्णाश्रमउत्पत्ती । यथास्थिती सांगीतली ॥ ७ ॥ सप्तदशाध्यायीं श्रीकृष्णे सुगम । सागीतले ब्रह्मचर्यधर्म । गृहस्थाचे स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥८॥ आता अष्टादशाध्यायी जाण। वानप्रस्थाश्रमलक्षण । सन्यासधर्माचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥९॥ श्रीभगवानुवाच-पा निविक्ष पुत्रेषु भार्थी यस्य सहय बा ! या एच बसेकान्तस्तृतीय भागमायुष ॥ १ ॥ आता अनुक्रमें निरूपण । वानप्रस्थाचे आले जाण । त्यासी वनास निघावया कारण । आयुप्यलक्षण विभाग ॥ १० ॥ शतायु पुरुपमर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती । सासष्टी मिल्याअती । वनामती निघावें ॥ ११॥ निघावया बनामती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं । आपण निघावे शीघ्रगती । वानप्रस्थी वनवासा ॥ १२॥ भार्या साध्वी पतिमता सती । ईश्वरस्वरूप मानी पती । भ्रतार निघता वानप्रस्थीं। जे पुत्रामती राहना ।। १३ । साडिता भ्रतारसेवेसी । कल्पात हों पाहे जिसी । जे भ्रतारचरणाची दासी। ते सबै वनासी आणावी ॥ १४ ॥ जो पुरुष स्त्रीसमवेत । वनी झाला वानप्रस्थ । तेणे स्त्रीकामासी अलिप्त । व्हावे दृढव्रत ते आश्रमीं ॥ १५ ॥ जो वानप्रस्थ वनवासी । तेणे दृढ धरावी शाति मानसीं । नीतळावे कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक॥१६॥ पन्दमूलफलैर्य यमध्यति प्रक्रपयेत् । घसीत वार वासस्तृणपर्णाजिनानि च ॥ २ ॥ वनींची कदमूलफळें । जी निपजली ऋतुका । तीही अतिपविनें निर्मलें । आहार तेणें मेजें करावा ॥१७॥ वनवासी वस्त्रे जाण । वल्कले व्याघ्रमृगाजिन । अथवा नेसावी केवळ तृण । का पर्णाभरण वृक्षाचे ॥ १८ ॥ वानप्रस्थी नेमग्रहण । ऐक त्याचेही लक्षण। त्या नेमाचे निरूपण । स्वयें नारायण सागत ॥ १९ ॥ केशरोमनसश्मश्रुमलानि विम्यादत । न धावेदप्सु मजेत निकाल स्थपिठलेशय ॥३॥ केश मणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे। रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन याचे न करावे ॥२०॥ मस्तकी न करावे वपन । न करावे श्मश्रुकर्म जाण । न करावे लोमनखच्छेदन । दतधावन न करावे ॥२१॥ सान मुसलवत् केवळ । अवश्य करावे त्रिकाळ। प्रक्षाळावे ना शरीरमळ । नत प्रवळ वनस्था ॥ २२ ॥ केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावे जाण । तळी घालावें ना तृण । मग वस्त्रास्तरण तें कैंचे ॥ २३ ॥ यापरी वानप्रस्थे जाण । हट धरूनि प्रतधारण । करावें तपाचरण । ते तपलक्षण अवधारी ॥२४॥ __ ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन वर्षास्वासारपाइनले । आफ्ण्ठमम शिशिर एषवृत्तपश्चरेत् ॥ ४ ॥ उष्णकाळी पचानी । अनिकुडें वह कोणी । पाचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥ २५ ॥ माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्पता धारावर्तेसीं । तेथ व्हाये मर्थज्ञान २ प्रतिध्वनी। ३ शतायुर्वे पुरुष' अशी श्रुति आहे ४ शभर वर्षांचे तीन भाग केले तर तिसरा भाग ६६ व्या वर्षी सुरू होतो तिसरा भाग झणजे ७५ वर्षे पुरी होईपर्यंत असाही कोणी अर्ध करितात ५ देवाची मूर्ति ६ घरोवर ७ स्पर्श नये ८ पान ९ साक्तले व शिश्नावरचे १. दांत घासणे ११ मुसळासारखी नुस्ती चुडी मारून बाहेर निघाव भाग चोळू नये १२ पत्र ऑपार्ष. १३ तपश्चरण १४ उन्हाळ्यात १५ उच जागेवर १६ सतत धारानी ए भा ५९