________________
अध्याय अठरावा. जगी विचरे अनासक्त । परमार्थयुक्त निजबोधे ॥ ६९ ॥ त्याच्या निजवोधाचे लक्षण । स्वयें सागताहे नारायण । मपचाचे मिथ्यापण । समाधान निजात्मता ॥ १७ ॥ यदेतदारमाी जगन्मनोवामाणसातम् । सर्व मायेति तर्पण स्वस्थस्त्यावा न तासरेत् ॥ २७ ॥ मनसा चाचा प्राणप्रवाही । अहंकारकृत उभयदेहीं । जग आत्म्याच्या ठायीं। मिथ्या मायिक पाहीं आभासे ॥७१॥ दोराअगी सर्पाभास । शुक्तिकेमाजी रजतप्रकाश । उसरी मृगजळाचा विलास । तैसा जगदाभास चिन्मात्रीं ॥ ७२ ।। जैसा स्वप्नीचा व्यवहार । तैसें भासे चराचर । ऐसें मिथ्या जाणोनि साचार । पुढती स्मरणादर स्फुरेना ॥ ७३ ॥ जो जागा झाला इत्थंभूत । ते स्वभोग न वाछी चित्त । तेवी स्वरूपी सुनिश्चित । तो प्रपंचजात सरेना ।। ७४ ॥ निर्दडी पहुंदकाचे कर्म । तुज म्या सागीतले सुगम । आता हंसपरमहंसाचे धर्म । यथानुक्रम अवधारी ॥७५॥ सन्यास चतुर्विध देख । हस परमहंस एक । एक तो वहदक । कुटीचक तो भिन्न ।। ७६ ।। कर्म त्यागोनि झाला सन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं । अन्नालागी खग्रामवासी । कुटीचक तयासी बोलिजे ॥७७॥ वार्धकी कुटीचकाची परी । अग्निहोत्र स्त्रियेचा त्याग करी। परी शिखासूत्र न अव्हेरी। गायत्रीमत्री अधिकारू॥७८ ॥ नित्य भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बाधी त्याचे द्वारी । मठिका साडोनि न बचे दूरी । कुटीचक निधारी या नाच ॥ ७९ ॥ शिखासूत्र त्यागोनि जाण । करूनि विदंडाचे ग्रहण । केवल करी कर्माचरण | ज्ञानाचे लक्षण जाणेना॥१८॥ नाहीं वैराग्य वेरिए । न दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ । अतिशयेंसी जो कर्मिठ । पहूदक ज्ये, त्यासी ह्मणती ।। ८१॥ जो का वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ विचारी । शिखासूत्रकर्मत्याग करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ।। ८२ ॥ ऐसा जो त्यागविलास । या नाव विविदिपासन्यास । ऐशिया निष्ठं वर्ते तो हंस । एक परमहंस हा ह्मणती ।। ८३ ॥ ऐक परमहसाचे लक्षण । ज्ञानपरिपाके परिपूर्ण । अतएव शाति वोळगे आगण । देखे तिन्ही गुण मिथ्यात्वे ।। ८४ ॥ मिथ्या जाणे कर्माची चार्ता । आपुली देखे नित्य निष्कमता । कर्मक्रिया जे कर्तव्यता । ते प्रकृतीचे माया प्रारब्धं ॥ ८५॥ऐशिया स्थिती सावकाश । त्या नाव जाण परमहंस । नाही मठ मठिका विलास । नित्य उदास निराश्रयी ॥८६॥ आता हंसपरमहंसाचे धर्म । स्वयें सागताहे पुरुषोत्तम । त्या धर्माचे विशद धर्म । ऐक सुगम उद्धवा ।। ८७॥ ज्ञानियो विरत्तो या मदतो पाउनपेक्षा । सरिङ्गानाश्रमास्त्यक्त्या घरेदनिधिगोचर ॥२८॥ विषयाची नावडे मातू । ज्ञानप्राप्तीलागी उद्यतू । यापरी जो अतिविरक्त । तो सन्यास बोलिजेतू मुख्यत्वे ।। ८८॥ जो जाननिष्ठ अतिसपन्न ( सदा स्वरूपी रगले मन । कदा न मोडे अनुसधान । परमहसासमान हा हस ।।८९ ॥ ज्यासी करिता भगवती। अपेक्षामानाची झाली शाती । मोक्षापेक्षा नुपजे चित्ती । हे सन्यासपद्धती अतिश्रेष्ठ ॥ १९० ॥ ज्ञाननिष्ठ का मभक्त। इहीं आश्रमधर्म दडादियुक्त। त्याग करावा हृदयीं १ हिंडतो, फिरतो २ शिंपीवर ३ सध्याचा आभाग ४ माळामितीवर ५ वाांतील मिलासाचे पदार्थ ६ यतींचा एक वर्ग ७ स्वधर्मवासी ८ पर्णकुटी १ सोश्वळ १. श्रेष्ठ पुहर ११ परमात्मतत्व जाणण्याच्या इच्छेन केलेला रावखत्याग १२ भारमात्मविचारात १३ दारी राबते १४ मुलासेवार १५ मोक्षाची इच्छा ..