या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ___ तावत्परिचरेभक्त श्रद्धावानासूयक । यावद्रह विजानीयान्मामेर गुरमात ॥ ३९ ॥ - - __ अचळ अमळ अविनाश । परात्परतर परेश । गुरु तो परब्रह्म ईश । हा दृढ विश्वास धरावा ॥७८॥ त्या विश्वासाच्या पडिपाडी । नवल गुरुचरणी आवडी । नित्य नूतन नवी गोडी । चढोवढी भजनार्थ ॥ ७९ ॥ ऐशिया भजनपरवडी । हृदयीं श्रद्धा उथळे गाढी । गुरुआज्ञेची नुलंधी काडी । आळस तोडी समूळ ॥ २८० ॥ गुरुवाक्याचेनि श्रवणे । विकल्पाचे खत खाणणे । सकल्पासी सुळी देणे । जीव घेणे अभिमाना ॥ ८१ ॥ तेथ असुया केची उठी। धाफेचि निमाली उठाउठी । ऐशी गुरुचरणी श्रद्धा मोठी। परब्रह्मदृष्टी गुरु पाहे ॥ ८२ ॥ निर्गुण जो निर्विकारू । तोचि मूर्तिमंत माझा गुरू । करूनि अकर्ता ईश्वरू । तोचि साचारू गुरु माझा ॥ ८३ ॥ नित्य निर्विकल्प देख । ज्यासी मणती समाधिसुख । तें माझ्या गुरूचे चरणोदक । ऐगा भावे नेटक भावार्थी ॥ ८४॥ गुरुते पाहता ब्रह्मदृष्टी । शिप्य ब्रह्मत्वे आला पुष्टी । ब्रह्मरूप देखे सृष्टी । निजऐक्य मिठी गुरुचरणी ॥ ८५॥ ऐसे ब्रह्मरूपी ऐक्य घडे । ते 'गुरुसेवा करणे पडे । ऐक्य झाल्याही पुढे । सेवा न मोडे असंडत्वे ।। ८६ ॥ कापूर घातलिया जळी । स्वयें विरोनि जळी परमळी । तेवी अहं जाऊनि सेवा सकळी । सर्वी सर्वकाळी गुरुचरणी ।। ८७ ॥ ऐशी अवस्था न येतां हाता। केवळ मुंडूनिया माथा । सन्यासी ह्मणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥ ८८॥ स्वयें सन्यास अगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार जो न करी ! त्यालागी स्वयें श्रीहरी । अतिधिकारी निंदित ।। ८९ ॥ यस्वसयतपद्यर्ग प्रचण्डेन्द्रियसारथि । मानबेराम्यरहितखिदण्डमुपजीवनि ॥ ४० ॥ सुरानात्मानमारमस्थ निन्हते मइ च धर्महा अविपन कपायोऽसादगुप्माच विहीयते ॥ ११ ॥ नाही वैराग्याची स्थिती । नसतो विषयविरक्ती । देखोदेखी सन्यास घेती । केवळ वृत्ति अन्नार्थ ॥ २९० ॥ सन्यास नेता पूर्वदृष्टी । जे वैराग्य होते पोटीं । ते सन्यास घेत. त्यापाठी । उठाउठी पळाले ॥९१ ॥ ज्ञानेद्रिय पाच सहावे मन । हेचि अरिपड जाण। याचे न करिता निर्दळण । सन्यासपण तो विटंबू ॥ ९२ ॥ अवैराग्ये सकाम मन । तेणे विपयाकुलित बुद्धि जाण । नाही ज्ञान ध्यान साधन । दंडग्रहण उदरार्थ ॥ ९३ ॥ नुपजेच अनुताप जाण । न करीच श्रवण मनन ! आदरें न साधीच साधन । त्यासी ब्रह्मज्ञान नव्हे ॥ ९४ ॥ त्याचा व्यर्थ सन्यास जाण । व्यर्थ त्याचे दंड मुंडण । व्यर्थ कापायवस्त्रग्रहण । वेपधारण नटाचें ॥ ९५ ॥ सन्यास घेतलियापाठी । काम उचंबळे उठाउठी । क्रोधलोभाची धुमे आगिठी। चौगुण पोटी अभिमान ॥ ९६ ॥ आमक्ति अधिकाधिक उठी। सदा ग्रोमणी चावटी । करणे पैशुन्याच्या गोष्टी । दंड कासोटी दंभार्य ॥ ९७ ॥ अनधिकारी दडग्रहण । तेण सन्यासरू जाण । केवळ आली नागवण | आपल्या आपण नाडिले ॥९८॥ नाडिले यज्ञाधिकारी सुरगण । नाडिले स्वधाधिकारी पितृगण । नाडिले १प्रतीया पलीकडया • उचवळे ३ मत्सर, स्पधी ४ पायाचे तीर्थ ५ नहासपन झाला ६ नुरोनि. ७ थोरवी ८ एक्दम लहरांत येऊा लेक सन्यास घेतात ह्मणून ९ घेण्यापूर्वी १० बाधीन ठेवणं, जिकणे ११ विपर्याध्या गोगेच्छों व्यापलेली १२ पराग्य, पश्चात्ताप, १३ भगवी वस्त्र धारण करण १४ धुमी, शंगटी १५ गांवटाळी, टारगेपणाच्या गोरी १६ दुष्टपणाच्या