या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८६ एकनाथी भागवत. तपस्तीर्थ जपो दान पवित्राणीतराणि च । नालकुर्वन्ति ता सिद्धिं या ज्ञानकलया कृता ॥ ४ ॥ सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशे होय त्रिशुद्धी । ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानसिद्धीचा महिमा ॥५८॥ तप में करिता पंचाग्नी । तीर्थ गंगादि सरिता त्रिवेणी। जप जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिलदानी सुवर्णादि ॥ ५९॥ आणिकही इतर पवित्रं । जें स्वधर्मकर्मादि वाचारें । नाना याग अग्निहोत्रं । पवित्र करें अतिशुद्धे ।। ६० ॥ एवं तपादिक जे साधन । या सकळांची शुद्धी गहन । तें ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥ ६१ ॥ ज्ञाननिष्ठा अर्धक्षणे । जे पवित्रता स्वयें लेहाणे । ते तपादि नाना साधने । नाही पावणे कल्पातीं ॥ ६२ ॥ ऐसे जे पवित्र ज्ञान । ते मुख्यत्वे धरोनि जाण । माझें करावे भजन । तेंचि निरूपण हरि वोले ॥ ६३ ।।। ____तस्मानानेन सहित ज्ञात्वा स्वात्मानमुद्धय । ज्ञानविज्ञानसपनो भज मा भक्तिभावत ॥ ५॥ या कारणे गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा । तेथ प्रक्षाळूनि निजभावा। जीवू तो वोळखावा परमात्मत्वे ॥ ६४॥ जीवू परमात्मा दोनी एक । ऐसे जाणणे ते ज्ञान देख । ऐक्ये भोगणें परमात्मसुख । 'विज्ञान' सम्यक त्या नांव ॥६५॥ ऐसा ज्ञानविज्ञानसपन्न । होऊनि करावे माझें भजन । त्या निजभजनाची खूण । ऐक सपूर्ण उद्धवा ॥६६॥ तेव्हां जेथें देखे जकांहीं । तें मीवाचूनि आन नाहीं । मग अनन्यभावे तिये ठायीं। भजे पाहीं भावार्थे ॥६७॥ ऐशिया माझ्या भजनाहाती। उसतू नाही अहोराती । जागृतिस्वमसुषुप्ती । माझी निजभक्ती न मोडे ॥ ६८ ॥ विसरोनि जावे जेथे । तेथेचि देखे माते । मरण आले विस्मरणाते । स्मरणही तेथे हारपले ॥ ६९ ॥ यापरी ज्ञानविज्ञानसपन्न । मजवेगळे न देखती आन । तैसेचि माझे अनन्य भजन । शुद्ध भती जाण या नाय ॥७०॥ मागा मुनीश्वरी याचि गती । माझी करोनि अनन्य भक्ती । मज पावले जैशा रीतीं। ऐक तुजप्रती सागेन ॥७॥ ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽमानमात्मनि । सर्पयज्ञपति मा चै ससिद्धि मुनयोगमन् ॥ ६ ॥ जे ज्ञानधने अतिसपन्न । परम पवित्र विज्ञाने जाण । ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यनद्वारा भजन करिती माझें ॥ ७२ ॥ हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमी खाणोनी । शमदमविरक्ती कुंडे तिन्ही । केली आवो साधुनी श्रद्धेचा ॥ ७३ ॥ तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्र दृढ मंथुनी । काढिला सूक्ष्म निधूमाग्नी । कुंडी स्थापूनी पेटविला ॥७४॥ सत्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येसी मिश्रित । वैरोग्यसुवेने आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥७५ ॥ घेऊनि विद्याशस्त्र लखलसित । सकल्पपशूचा करून घात । तेण यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजवोधे ॥ ७६ ॥ तेध पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचे अवीन । यज्ञभोका श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी जाला ॥७७ ॥ यापरी माझें यजन । करूनिया मुनिगण । निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धी जाण पावले ॥ ७८ ॥ मुनीश्वरी साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागी त्रिशुद्धी । व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपचनिषेधी वस्तु सागें ।। ७९॥ १ज्ञानाच्या एका अशान २ गगा, यमुना व गुभ सरस्वती या तिघींचा संगम ३ गाई, भूमी व तीळ यांच्या दानांनी ४ उत्तम आचाराने, साचारें ५लामते ६ प्रभाव, प्राप्ती ७ जीवभावाला ८ "जीवा ब्रह्मव नापर" ९ विमाती, फुरसत १० अशाच ११ आया, आरागडा १२ सन भते आणि फूटस्थ आरमा. १३ होमामि उत्पन्न करण्याचे फाठ १४ धुरावाचून-युच्छ, सतेज-अपि १५ पैराग्यरूप पानानं. १६ आहुती. - -