या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

જ૮૮ - एकनाथी भागवत. वर्ते ॥ १॥ जंब ज्ञानासी न भेटे विज्ञान । तव न निरसे जीवपण । यालागी सांगावे विज्ञान । जे जीवशिवपण निवारी ॥ २ ॥ असभावनादोपशून्य । तें वोलिजे शुद्ध ज्ञान । जे विपरीत भावनेवीण । त्याते सज्ञान 'विपुल' ह्मणती ॥ ३॥ ऐसे विशुद्ध विपुल ज्ञान। तयुक्त वैराग्य विज्ञान । त्यामाजीही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥४॥ ज्ञानविज्ञानवैराग्यस्थिती । जुनाट तुझी भगवद्भक्ती । मज सागाची सुनिश्चिती । कृपामूर्ति श्रीकृष्णा ॥ ५॥ तुझे उत्तमभक्तिकारणे । साधु पडले गवेषणे । धरणे वैसले जीवेप्राणे। ते भक्ति सागणे मजलागी ॥ ६ ॥ तुझी करिता उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती। आपुली लाभे निजमुक्ती । उद्धवू ते अाँ विनवित ॥ ७॥ सापनयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवानीश । पश्यामि नान्यच्छरण तयाद्विद्वन्द्वात्तपनादमृत्ताभिवात् ॥९॥ जे त्रिविध तापे तापले । जे कामक्रोधी जर्जर केले । आशातृष्णा विसचिले । जे निर्बु जले जन्ममरणे ॥ ८ ॥ संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर । ऐसे श्रमले जे नर। त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥ ९ ॥तुझ्या चरणारविंदीपरते। शरण्य न देखों आणिकातें। यालागी कायावाचाचित्ते । शरण भावार्य तुज आलों ॥ ११०॥ छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचे भिन्न रूप । त्रिविध तासी सताप । निरसोनि निप्पाप करी जन ॥ ११॥ एक शरण निजचित्ते । एक धेरै मिसळले तूतें । एक ते भजनभावार्थे । एक ते भयार्ते स्मरले तूतें ॥ १२ ॥ एक ते सुहृदत्वे सगोत्र । एकाचे केवळ स्नेहसूत्र । एका अंगसग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥ १३ ॥ एवं नानापरी विचित्र । जिही ठाकिलें चरणच्छन । भवभय जे महाघोर । ते त्यांसमोर हो न शके ॥ १४ ॥ भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्या देणे निज ऐक्यपद । बाप उदारता अगाध । तूं स्वानंदवोध सर्वांचा ॥ १५॥ होम दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसे करी । मा अवचटें पडल्यावरी । तेंही करी तैसेची ॥ १६ ॥ एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया सर्वधा । त्याची निरसोनि ससारवाधा । समत्वे निजपदा तूं नेसी ॥ १७ ॥ त्या तुझें ' चरणछन येथें । निवारी त्रिविध तापाते । सदा वर्षे परमामृते । शरण चरणांतें यालागी ॥१८॥ ज्या ससारभयाभेण । तुझ्या चरणा आलो शरण । त्या भवभयाचे निरूपण । उद्धव आपण सागत ॥ १९ ॥ दष्ट जन सपतित निलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरतर्पम् । समुद्धरैन कृपयापवयर्यचोमिरासिच महानुभाव ॥ १० ॥ ससारकुहरामाजी जन । गृहदाराकूपी पडले जाण । याहीमाजी दुःख गहन । काळसर्प दारुण डंसिलें ॥ १२० ॥ त्या काळसर्पाचे विखें । क्षणक्षणा चढे देख । अभिमाने भुलले लोक । विषयसुख वाछिती ॥ २१ ॥ नवल काळसर्पाचा पडिपाडू । विपप्राय विषय केले गोडू । गोडाचा गोड परमार्थ दृढ़ । तो केला कडू जीवभावें ॥२२॥ विखाहूनि विपय अधिक । विख एक वेळा मारक । विपयो पुनःपुनः घातक । काळसप लोक भुलविले ॥ २३ ॥ विपय तो केवळ विख । त्यालागी भुलले मूर्स । विषयाची तृष्णा देख । १ शोधात २ भरले ३ गुदमरले, त्रासले ४ हरीचें पादकमल हाच त्याचा शीतक आश्रय होय ५पादकमला हुन श्रेष्ठ धमें ६ शरण जाण्यास योग्य अमं ७करी जीउ ८ गाठले, जयळ केलं, मिळविल. ९ मोठी. १० ससा राध्या भितीनं. ११ सखाररूपी गुहेमध्ये, दरीत १२ दश केला १३ विप. १४ प्रताप,