या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'एकमाथी भागवत. यालागी जंव जंब झातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन । काळाची शक्ति सुटली जाण । न करवे क्षीण भीष्मासी ॥४७॥ यालागीं तोडरी काळ काम । आंकणां रिघाला परशुराम । हाचि धर्मिष्ठी वरिष्ठ धर्म । हैं साजे नाम भीष्मासी ॥४८॥ ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारी । देवासी लावूनियां हारी । निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिजेची ॥ ४९ ॥ न मोडतां भजनमयोंदा । युद्धी मिसळोनि गोविंदा । हारी लायू. नियां मुकुंदा । चरणारविदा लागला ॥ १५० ॥ आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रे साडिली दूरी । पुढती बाण भेदितां जिव्हारी । शस्त्र करीं न धरीच ॥५१॥ वाणी कंडतरले जिव्हार । विकळता देखोनि थोर । भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥ ५२ ॥ हे दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकता उत्तर । काळासी करूनिया दूर । स्वशरीर राखिले ॥ ५३॥ मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरी । त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋपीश्वरी परिवारिला ॥५४॥ आमा सकळा देखता । जाहला युधिष्ठिर पुसता । तेचि पुरातन कथा । तुज मी आता सागेन ॥ ५५ ॥ निवृत्ते भारते युद्ध सुहृनिधनविहर । श्रुत्वा धर्मान् यह पश्चान्मोक्षधर्मानपृष्ठत ॥ १२ ॥ मी सधि करितां श्रीकृष्ण । तेन मनीच दुर्योधन । व्यास वर्जिता आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥ ५६ ॥ एवं दैववळे कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारी । सापल दुर्योधनादि वैरी । सपरिवारी मारिले ॥ ५७ ॥ युद्ध निवर्तल्यापाठौं । धर्म बैसल्या राज्यपाटीं । तेणे अभिमान घेतला पोटीं । महादोपी सृष्टी मी एक ॥ ५८॥मीराज्यीं बैसतां आपण । मणेभ्यां मारिला गुरु ब्राह्मण । म्या मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्या मारिला ॥ ५९ ।। उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरू जाण तत्त्वता । तें साडोनिया सर्वथा। 'अहं कर्ता मणे धर्म ॥१६० ॥ देहाभिमानाचे सटाटोपी । थोर होऊनियां अनुतापी । गोत्रहंता मी महापापी । ऐसे आरोपी निजमाथां ॥ ६१ ॥ त्यासी द्यावया समाधान | समयो भीष्माचे निर्याण । तेथे म्या नेऊनियां जाण । धर्मे केले प्रश्न ते ऐका ।।,६२ ॥ राजधर्म दानधर्म । पुशिला तेणे आपद्धर्म । मुख्यत्वे पुशिला मोक्षधर्म । उत्तमोत्तम परियेसीं ॥ ६ ॥ - तानह तेऽमिधास्यामि देवव्रतमुखातान् । ज्ञानवैराग्यविज्ञानभन्दाभक्त्युपहितान् ।। १३ ॥ ते भीममुखीचे मोक्षधर्म । म्या परिशिले अतिउत्तम । जे निरसिती भवनम | सकळ कर्मदाहक ।। ६४ ॥ ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती। भीष्म सागीतली धर्माप्रती । ते मी निश्चिती सांगेन । ६५ ॥ ह्मणणे भीष्मासी 'देवव्रत' । तेणे देवावरी ठेवूनि चित्त। शरपजरी सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥६६॥ तेणे सागीतला मोक्षधर्म त्यात मख्यत्वे ज्ञान प्रथम । ते ज्ञान सागे परुषोत्तम । अतिउत्तम अवधारी। १. नवेकादश पच त्रीन् भावान् भूतेषु येन थे । इक्षेताथैकमप्येषु तज्ज्ञान मम निश्चितम् ॥ ३४ ॥ । ', प्रकृति पुरुप महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्ष्मस्वभाव । अहंकारें सगट नव । तत्त्ववैभव है सख्या ॥ ६८ ॥ एकादश बोलिजे तें तें । अकरोही इद्रिये येथें । पंच ते पंचमहाभूते । १ कृष्णाला हार आणून, पराजित करून २ मर्माच्या ठाया ३ न्यासिलें. ४ भेदल ५ वेटिला ६ मैनी. ७ गई ८ राज्यपदावर ९ स्वकुळाचा नाश करणारा १० कर्म जाळून टाकणारे ११ पाच सूक्ष्म भूत १२ पाच शानिद्रिये, पाच कर्मेंद्रिय व मन मिदन करा