या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९४ एकनाथी भागवत. महानुभावांचा ढीग दाटे । पितर नेटेपाटें धांवती ॥३३॥ वेदासी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे । माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढे थाद दाटे ॥ ३४ ॥ मद्भक्तपूजेचिया उल्हासा । मज टैंक पडे हृषीकेगा । इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥ ३५ ॥ मागां साडूनि माझी पूजा । जेणे मद्भक्त पूजिले वोजा । तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ।। ३६ ॥ प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ती । त्यासी पूजिल्या मी श्रीपती । यथानिगुती सतोपें ॥ ३७ ॥ जैसा मद्भाव मद्भकी । तोचि भावो सर्वांभूर्ती । नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिति अविकार ॥ ३८ ॥ दिसे देहाकृती मुंडली । तीतें ह्मणती हे रोड जाली। परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे सचली आत्मस्थिति ॥ ३९ ॥ दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न भिन्न इंगळ । परी अग्नि एकचि केवळ । तेवी भूतें सकळ मद्रूपें ॥ २४० ॥ चित्रामाजी नानाकृती । पाहता अवघी एकचि भिंती । तेवी मी चिदात्मा सर्व भूती । निजभावे निश्चिती जाणावा ॥ ४१ ॥ सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूर्ती भावो माझा । हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥ ४२ ॥ ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी । मी सर्वांगें रावे त्याच्या घरी । तो मजवरी मिरांशी ॥४३॥ त्याच्या चेष्टाची जे गती । तेचि माझी भजनस्थिती । हेचि स्वमुखें श्रीपती। उद्धवा प्रती सांगत ॥४४॥ __ मदर्थेप्चगचेष्टा च वचसा मद्गुणेरणम् । मय्यर्पण च मनस सर्वकामविवर्जनम् ॥ २२ ॥ , , लौकिक शारीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती । अभिनव माझी भजनस्थिती। सागो किती उद्धवा ॥ ४५ ॥ वैसोनिया हाटवटी । सांगतां लौकिकीही गोष्टी । त्यांमाजी माझें कीर्तन उठी । मद्गुणे गोमटी गर्जे वाचा ॥ ४६॥ स्वधर्मक्रिया करणे । तेंही अर्पा मजकारणे । मजवेगळे काही करणे । करू नेणे अणुमात्र ॥ ४७ ॥ सर्वैद्रियाचिये स्थिती । सहजें निपजे माझी भक्ती । माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो "नेणे ॥४८॥ मनासी आवडे,जे जे काहीं । ते ते अी मजचि पाहीं। शेखी आपुले मन तेंही।माझ्या ठायीं समपी ॥ ४९ ॥ माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण । तेचिविपयीं निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ५० ॥ . मदर्थेऽयपरित्यागो भोगस्य च सुखस्य च । इष्ट दत्त हुत जस मदर्थ यात तप ॥ २३ ॥ मी परमात्मा परम स्वार्थ। ऐसा करूनि निश्चितार्थ । वेचितां धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावा ॥५१॥ परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटीचा विराग । मी भेटावया श्रीरग । सकळ भोग साडिती ॥५२॥ छत्र चामर हस्ती घोडे । त्याग्रनि होती गा उघडे । ऐसे वैराग्य धडफुडें । मज रोकडे पावावया ॥५३॥ माझें पावावया 'निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक । त्यागूनि. सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥ ५४ ॥ आवडी करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण 1 माझे प्राप्तीलागी जाण । रिता क्षण जावों नेदी ॥ ५५ ॥ माझेनि उद्देशे परम । करी श्रीत स्मात स्वकर्म । अग्निहोत्रादि याग गरपुरुषांचा स्तोम • लगबगीने ३ गर्दी, वाट ४ भूल ५ प्रेमान ६ चलनवलनरहित ७ फारच ८ केशवपन झालेली राडली १० वतनदार, हकदार ११ बाजारात १२ रिकामी. १३ नेदी. १४ परिपूर्ण