या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिसापा ४९७ सायरे देवाचें॥४॥ हार न घाणेचि दो करी।मग चारी भुजा पसरी । उद्धवाते हृदयावरी। प्रीती थोरी आलिगी।॥ ५ ॥ हृदयीं हृदय एक जाहले । ये हृदयीचे ते हृदयीं घातले । कृष्णे सर्वस्व जे आपुले त हृदयीं सूदले उद्भवाचे ॥६॥ देव अवाप्तकाम निचाड । त्यासी ही भक्तीची ऐसी चाड । अतिशय उद्धवा लागली गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥७॥ उद्धवप्रेमाचा लवलाहो । आलिगन सोड विसरे देवो । कृष्णहृदया हृदय जडत्या पहा वो । उद्धया उद्धवो विसरला ॥८॥ ऐसे स्वानंदी वाडाकोडा । दोघेही मिसळले निचाडचाडा। भक्तिसुसाच्या सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥९॥ कृष्णे सर्वस्व आपुले। उद्धवाचे हृदयी सूदले । हे उद्धवा कळो नाही दीधले । लाघव केले गोविदं ॥३१॥ हा अर्थ कळला उद्धवासी । हा येईल मजसी ऐक्यासी । पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशी सागावी ॥ ११॥ उद्धवा मज पाडेंकोडें । असड हेचि पोलों आवडे । परी तैसा श्रोता न जोडे । हैं योर साकड़ें मजलागीं ॥१२॥ भक्तिसुखाचा सुरवाड । सांगता माझे पुरे कोड । ऐसा श्रोता कैचा गोड । यालागी उद्भवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥ सूर्यापासूनि फाकती किरण । तैसे सुटले आलिगन | कृष्ण उद्भय जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडेना ॥ १४ ॥ पुढील कथेची सगती ] दूर ठेली श्लोकसगती । श्रोतां विरुद्ध न ध्यावे चित्ती । समूळा निश्चिती विचारावा ॥ १५ ॥ मूलींचें पद सकोचित । तेय उत्तम भक्तिभावार्थ । स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि स्या अर्थ विस्तारिला ॥१६॥ नारळातल्या वस्त्राची घडी । उकलिता थोर वाढे वाढी । तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥१७॥ मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकी पहावा सावचित्त । श्लोकउत्तराधी भगवत्त । ध्वनितार्थ योलोनि गेला ॥१८॥ त्याचि ध्वनिताचे पोर्टी । होती भक्तिरहस्याची पेटी । ते म्या उघडूनि दाविली दिठी । वृथा चावटी झण ह्मणाल ॥ १९ ॥ तव भोते क्षणती नवल येथ । मूळीचे पद होतें गुप्त । ते काढिले भक्तिसारामृत । हृदयस्थ हरीचे ॥३२० ॥ तुझे हृदयी कृष्णनाथ । प्रकटोनि आपुले हद्दत । अथर्थी असे बोलवित । हैं सुनिश्चित कळले आह्मां ॥ २१ ॥ आहा ऐकता भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उधळत होशी देखणा सुनिश्चित । अथ यथार्थ अर्थिला॥२०॥ हैं ऐकोनि सताचे वचन । हरिखला एकाजनार्दन । मस्तकी वंदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥२३॥ निजभक्तीचे दृढीकरण । आदरेंकरिताहे श्रीकृष्ण । सागीतले तेचि निरूपण । पुढती जाण सागत ॥२४॥ यदात्मन्यपित चित्त शान्त सतोपवृहितम् । धर्म ज्ञान सधैराग्यमेश्वर्य चाभिपपते ॥ २५॥ आपुले जे का अतःकरण । तें करिता मदर्पण । माझी निजभक्ति उहासे जाण । जिचे निरूपण ग्या केले ॥२५॥ मद्रूपी अविया मन । सुगम 'वर्म सागेन जाण । माझें करिता नामस्मरण । पापनिर्दळण तेणे होय ॥ २६ ॥ सकाम स्मरता नाम । नाम पुरवी सकामकाम । निर्विकल्पं स्मरतां नाम । करी भस्म पापाचे ॥ २७ ॥ होता पापाचे क्षाळण । रजतमें जिणोनि जाण । सहजें वादे सत्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥ स्वयें धर्म कर १ इच्छा पुरी होईना घातले ३ निष्काम ४ निष्काम प्रेमाच्या कामामध्ये दोघही सापडले ५ौतुक . ७ मोठेपणा, मोरबी ८ उलट, विवय १ बडबड १. सोपा उपाय ११निरिच्छपण