या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०२ एकनाथी भागवत, जेणे हाती पावे ब्रह्मज्ञान । ते सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥ १६ ॥ प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारिता सावधान । तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥१७॥ तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥ १८ ॥ जो रसू गोड लागे पित्यासी । तो वळेचि पाजी बालकासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥१९॥ आधीचि तनयाचे प्रेम मोटें । परी लागतां त्याचे मुखवटें । मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥४२०॥ तेवी स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान । तेथें उद्धवे पुशिले प्रश्न । तेणे अधिक जाण तुष्टला ॥ २१॥आधीच पर्जन्य खरावरी मीनलासे वीजवारा। मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥ २२ ॥ तेवीं घायया ब्रह्मज्ञान । मिप उद्धवाचे प्रश्न । स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रहा पूर्ण देतसे ।। २३ ।। निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हाती चढे । कां विटेसाठी परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥ २४ ॥ तेवीं उद्याचे थोडे प्रश्न । तेणे आतुडे ब्रह्म पूर्ण । एका विनवी जनार्दन । श्रोता अवधान मज द्यावे ॥ २५ ॥ उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण । उरले बत्तीस गुण । तेही विवंचन अवधारा॥ २६ ॥ प्रश्नी दयेचे प्रतिउत्तर । न सागेचि शारगधर । त्या अर्थी भावगर्भ सार । पड्गुणैश्वर्य बोलिले ॥२७॥ एहीविखींचें आख्यान । पुढे सागेल श्रीकृष्ण । दयेच्या ठायीं भाग्य सपूर्ण । कोण कारण सागावया ॥ २८ ॥ एवं उरले एकतीस प्रश्न । अधिक एक सांगेल श्रीकृष्ण । सर्वस्वसगम शौच जाण । कार्यकारणसबंध ॥२९॥ ऐसे हे तेतीस गुण । व्याख्याने सांगेल श्रीकृष्ण । तें करतळी ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥ ४३० ॥ शमो मनिष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसयम । तितिक्षा दु खसमर्पो जिह्वोपस्थजयो एति ॥ ३६ ।। बुद्धीजे का विवेकवती । असार सांडूनि सार धरिती । तिणे मनाच्या सकळ वृत्ती। विवेकस्थिती आवरोनी ॥ ३१ ॥ त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मी मिळे जाण । जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थ ॥ ३२ ॥ समुद्री मिसळतां लवण । समु. द्रचि होय आपण । तेवी आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यधन स्वयें होय ॥ ३३ ॥ ऐसा बुद्धीचा उपरम । त्यातें हणिजे गा शमायापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारी ॥ ३४ ॥ शत्रूचे जे दुर्दमन । तो दमू येथे नव्हे जाण । करावे इंद्रियदमन । तेही लक्षण अवधारीं ॥ ३५॥ जेणें सहाय होती शमासी । त्या युक्ती रासणे इंद्रियासी । विधीवेगळे नेदी भोगासी । आवरी अहर्निशी वैराग्यें ॥३६॥ ऐसे इंद्रियाचे निग्रहण । त्या नाव गा दमगुण । आतां "तितिक्षेचे लक्षण । ऐक सपूर्ण सांगेन ॥ ३७॥ महासुख आले होये । ते जेणें उल्हासे अगी पाहे । तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगी ॥ ३८ ॥ तेज आणि आधारी । नभ समत्वे 'अगी धरी । तेवीं जो अविकारी । १आपल्या हाताने २ तान्ह्या बाळाच. ३ तोंड ४ वीज व वारा यानी युक्त झाला तर ५ज्याला फारस मोल नाहीं असे ६ विटेच्या मोबदला विचार ८भाव माहे पोटात ज्याच्या अस ९पाविषयीचही १० कमस्वसगम ११ बुद्धि परमात्मरूपी मिसदन नाहीशी होणे "सरी सर्वेद्रियाचिया गति । घेऊनि आपुल्या हातीं । बुद्धि आत्मया मिळ एकतिी । प्रिया जशी ॥ ऐसा बुद्धीचा उपरम । तया नाम हाणिजे शम" भमें ज्ञानोबारायानी (अध्याय १८-८३३१३४) शमाचें लक्षण पेरें आहे १२ क्षमेचे