या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द अध्याय एकुणिसवा. ५०७ दोष देखे ठायी ठायीं । चित्तविक्षेप पाही या नाच ॥ २९॥ जो वदे परापंवादा । जो करूं रिघे परनिंदा । जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । चित्तविक्षेपबाधा ती नाव ॥ ५३० ॥ जो सन्मार्गापासूनि चेता। पडे अधर्मकर्मउत्पथा । ते ही चित्तविक्षेपता । जाण तत्त्वता उद्धवा ॥३१॥ आपण तत्त्वता परब्रह्म । जाणणे हा वेदमार्ग उत्तम । है नेणोनि वर्तणे सकाम । तोचि परम उन्मार्ग ॥३२॥ स्वर्गशब्दाची व्युत्पत्ती । ते सत्वगुणाची उत्पत्ती। जेणे निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकंगती तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥ अमरभुवना जे जे गेले। ते परतोनि पतना आले । शुद्धसत्वी जे मिसळले। ते पावले निजसुख ॥ ३४॥ ऐसा जो का सत्वगुण । तोचि येथे स्वर्ग जाण । आता नरकाचे लक्षण । तुज सपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥ नरफस्तम उन्नाहो बधुर्मुसरह समे । गृह शरीर मानुष्य गुणाध्यो ह्याट्य उच्यते ।। ४३ ।। __ कामक्रोधलोभउद्रेक । तेणे खवळे महामोह देख । तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ २६ ॥ अरुणोदयीं दाटे कुहर । निविड पडे अधकार । न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७॥ यापरी गा निजचित्तीं । अघतमें वाढे वृत्ती। कर्तव्याकर्तव्यस्थिती। एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८॥ ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नाव जाण महानरक । परी यमयातना जे दुःख । तो नरक ह्मणों नये ॥ ३९ ॥ यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे । थाम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४०॥ काम क्रोध लोम देख । हेचि तीनी निरयदायक । तेथ महामोहो आवश्यक होय एक अंधत्तम ।। ४१ ॥ इतुका मिळे जेथ समुदायो । त्यातें बोलिजे तमउन्नाहो । ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुप पहा वो नरकरूप ॥ ४२ ॥ जो घोरनरकामती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये । तमनाह ज्यासी प्राप्त होय । त्याचा निर्गम नोहे महाकल्पातीं ॥ ४३ ॥ ऐसी तमउन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कटाळे चित्ती । ऐसे बुडते जीव तमोवृत्ती । त्याची उद्धारगती कोण करी ॥४४॥ ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो । बुडतयातें उद्धरी पहा यो । गुरुरावो निजसखा ॥४५॥ ऐसा गुरु तूं कोण ह्मणशी । मी नित्य लागे ज्याच्या पायांशी । जो चिन्मात्र पूर्ण ब्रह्मराशी । गुरु नाम तयासी बोलिजे ॥४६॥ त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलीसे तत्वता । ब्रह्म ब्रह्मत्वे हा प्रतिपादिता । येन्हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥४७॥ अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित । हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुरूनी येथ विस्तारिली ॥४८॥ ऐशी ऐकता सद्गुरुकीर्ती जडजीच उद्धरती । गुरुनामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥ त्या सद्गुरूचें महिमान । करी चुडत्याचे उद्धरण ! निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ।। ५०० ।। सुहृद आप्त सखा वधू । शिप्याचे सद्गुरु प्रसिद्ध । निवारूनि नरकसंबंधू । परमानंदू सुसदाता ॥५१॥ आता गृहार्च लक्षण । तुज मी सागेन सपूर्ण । माच्या गोपुर धवळारे जाण । गृहप्रमाण ते नव्हे ॥५२॥ १ परदोप, दुसन्याचं उर्ण २ च्युत होणारा ३ उपप-आइमाग ४ देवलोकास ५ सत्वगुणाची वृद्धि हाच सग होय ६ काम, क्रोध, लोभ याची अमर्याद उकळी ७ गुहा अधारा भरून जाते ८ दिवस किंवा राम हा व्यवहार ९ उठाप न वाढ १०यालोवीच्या वेदना ११ यमाचे १२ नरपान नेणारे १३ सुटका १४ मितात १५ गोपुरेसाने पुरद्वारे प पवळार दणजे धुनेगची बाडे