या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

+7 . ४४ ५०८ एकनाथी भागवत. मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसे मी पुरुषोत्तम । तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ।। ५३ ॥ ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती । वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥ निजगृह में साचार । तें जाणावें नैरशरीर । आता आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥ जो ज्ञानगुणी अतिसपन्न । जे कल्पांतीही ने वेंचे धन । तोचि आढ्यतम जाण । येर तें धन नश्वर ॥५६॥ नश्वर धनाची आन्यता । अवश्य नेत अधःपाता । ज्ञानधने जे आन्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥ दरिद्रो यस्त्वसतुष्ट कृपणो योऽजितेन्द्रिय । गुणेप्यसक्तधीरीशो गुणसको विपर्यय ॥ ५४॥ ऐक दरिद्राचे लक्षण । गांठी असतां कोटी धन । ज्याचे संतुष्ट नाहीं मन । परम दरिद्री जाण या नांव ॥ ५८ ॥ ज्याचे गांठी नाहीं कांचवेटी । परी सतुष्टता नित्य पोटी। तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी है उद्धवा ॥ ५९॥ गांठी असोनिया धन । जो पोटा न खाय आपण । सदा लोलिगतै मन । दरिद्रलक्षण या नाव ॥ ५६० ॥ यावरी जें कृपणपण । ऐक त्याचेही लक्षण । जेवी राजा वाधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१॥ निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण । ते विसरोनि होय दीन । इद्रियांअधीन होऊनि ठाके ॥ ६२ ॥ मन तयाचे आज्ञाधार । मनाची इंद्रियें किंकर । त्यांच्यानी हा होय डिंगर । अंजितेंद्रिये होय थोर कृपणत्व ऐसें ॥ ६३ ॥ निज. किंकराची किंकरें । त्या इंद्रियांची हा "वोळंगे द्वारें । अजितेंद्रियत्वे अतिखरें । निजांगी सुभरे कृपणत्व ॥ १४॥ या नांव गा कृपणपण । तुज न्या सागीतले जाण । आतां ईश्वरा, सुलक्षण । ऐक सपूर्ण उद्धवा ।। ६५ । कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनीहूनी । तोचि ईश्वरू त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥ तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी बोळगती गुण । त्यांसीही ज्याचे अलिप्तपण । ईश्वरत्व सपूर्ण त्या नाव ॥ ६७ ॥ कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनीहूनी । तोचि अनीश्वरू जनीं । हे सत्य मानी उद्धवा ॥६८॥ शमादि सांगीतले प्रश्न । त्याचे जे विपरीत लक्षण । तेचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण ते ठायीं ॥ १९ ॥ एत उन्दव ते प्रश्रा सर्व साधु निरूपिता । किं वर्णितेन बहुना लक्षण गुणदोपयो ॥ ५५ ॥ उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्या निरूपिले सुलक्षण । जेणे होइजे ब्रह्मासपन्न । तैसें व्याख्यान सागीतले ॥५७० ॥ संसारी गुणदोपलक्षण । सागता अपरिमित जाण । यालागी धरावे मौन । परम कैठिण गुणदोष ॥ ७१ ।। गुणदोष नायकावे कानी । गुणदोप न देखावे नयनीं । गुणदोप न बोलावे वदनीं । गुणदोप मनीं न धरावे ॥ ७२ ।। ब्रह्मज्ञानाचे मुख्य लक्षण । तेही बहुत नाहीं निरूपण । श्लोकाधैं श्रीकृष्ण । स्वयं आपण सागत ॥ ७३ ॥ . १ वर्णितो २ निजशरीर ३ सपनपणाचा ४ सरत नाही ५ काचेचा तुकडा ६ जवळ, गाठी, पदरी, पूर्वी यतादिवांच्या गाठी लोक द्रव्य ठेवीत गाठ झणजे प्रथि वेचे कदा प्रथिचा अर्थ काहीं"-रामदास ७ लोभी रहान मूल ९इद्रिये ताब्यात न ठेवल्यामुळे १०फिरता ११ अधीन १२ सागता येणे कठिण खरें. १३ ऐकू नयेत