या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - एकनाथी भागवत जाण । साधक न सांडी जै आंगवण । तै सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥५६॥ प्राणापानांच्या मिळणी । शक्ति चेतवे कुंडलिनी । ते प्राणापानांतें घेउनी । सुपुत्रास्थानी प्रवेश ।। ५७ ॥ ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट । तेथें पड़चक्राचा कडकडाट । पूर्वीच सपाट पवनें केला ॥ ५८ ॥ कुंडलिनी चालता वाटा । चुकल्या आधि. व्याधींच्या लाटा । वुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा धावू न शकती ॥ ५९ ॥ साधितां उल्हाटशक्तीचे उलट । उघडे ब्रह्मरधींचे कपाट । तंव लोटले सहस्रदळाचे पाट । अतिचोसट चंद्रामृत ॥२६० ॥ ते प्राशूनि कुंडलिनी वाळा । संतोपें 'साडी गरळा । ते शरीरी बोतली कळा । तेणे पालटला देहभाव ॥६१ ॥ शरीराकारें चोतिली कळा । तेणे देहो दिसे अतिसोज्वळा । ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । की उमलला कळा शातिसुखाचा ।। ६२ ।। जीवाचे जीवन मुसावलें। की ब्रह्मविद्येसी फळ आले । ना-ते चैतन्या कोव निघाले । तैसे शोभले अवयव ॥६३ ॥ त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळा सामावे । जीवामाजी वावरो पावे । निजस्वभावे सवाद्य ॥ ६४ ॥ तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी । या नांव परम खेचरी । सिद्धेश्वरी चोलिजे ॥ ६५ ॥ त्याचिया अगीचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती । त्याचे चरणामृत वांछिती । अमृतपानी इंद्रचंद्र ॥ ६६ ॥ क्रमूनि और्टपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट। भेदनि सोहहंसाचे पीठ परमात्मा प्रकट होऊनि ठाके ॥६७॥ हा योगाभ्यासे योग गहन । अवचटें कोणा साधे जाण । हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण घोलिला ॥ ६८ ॥ हेचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सागता । हा मूळश्लोकार्थ पाहता । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥६९ ॥ हा ऐकता अतिगोड बाटे । परी करिता काळीज फाटे । तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥ २७० ॥ असो हे अत्यंत कठिण । तुज मी सागेन गा आन ।' आन्वीक्षिकी विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकू ॥ ७१ ॥ तत्पदाहूनि वेगळा । पाचभौतिक त्वंपदाचा गोळा । चुकोनि व्यापका सकळा । कोठे निपजला एकादेशी ॥ ७२ ॥ अनादि मायाप्रवाहयोगें। तन्मात्राविषयसगें। मनाचेनि संकल्पपांगें । वेगळे सवेगें मानले ॥७३॥ मने मानिला जो भेदू । त्यासी करावा अभेदवोधू । येचि अर्थी स्वयें गोविदू। विवेक विशेद दाखवी ॥ ७४ ॥ पांचभौतिक शरीर खैरे । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळी विरें । पृथ्वीचा गध जळी भरे । तै पृथ्वी सरे निःोप ॥७५ ।। त्या जळाचा जळरसू । शोधूनि ज घे हुताशू । तैं जळाचा होय हासू । निजनि शेपू तेजत्वे ।। ७६ ।। त्या तेजाचे कारणरूप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप । तेव्हा तेजाचे मावळे स्वरूप । वायूची झडप लागतां ॥७७ ॥ त्या वायूचा स्पर्शगुण । नेता गंगने हिरून । तेव्हां वायूचे नुरे भान । राहे मुंसावोन गगनचि ।। ७८ ॥ केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्य रिघे अहकारी । अहंकारू रिघे मायमाझारी । माया परमेश्वरी मिथ्या होय ॥७९॥ रात्रि आपुलिया प्रौढी । आंधाराते वाढवी वाढी । तेथ नक्षत्र खद्या- १ पळ २ कुडरिनीनामा शक्ति ३ वायुन ४ हा सर्व विपय मागील एका अध्यायति झाला आहे ५ अमः तपति ६ ही योगातील अगें ७ कदाचित् ८ मोठमोठे, दाडगे ९ तत् य ख या उभय पदाचा याच दणारा अध्या स्मविद्या १० पचभूतापासन शारेला ११ शब्दस्पर्शादि विषयाच्या संगती। १२ सकल्पामुळे १३ स्पष्ट १४ क्षर, मष्ट होते १५ एस्पटरेलें, केवळ एकरें