या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. येणेचि द्वारें सुलक्षण । धर्मार्थकाममोक्षसाधन । पुरुषांच्या हितालागी जाण । म्यां केलें नियमन वेदाज्ञा ॥ ६८ ॥ रूप नाम आश्रम वर्ण । वेदू नेमिता ना आपण । तै व्यवहारू न घडता जाण । मोक्षसाधन तै कैंचें ॥ ६९ ॥ एवं वेदें चालवूनि व्यवहारू । तेथेंचि परमार्थविचारू । दाविला असे चमत्कारू । सभाग्य नरू तोचि जाणे ॥ ७० ॥ अत्यंत करितां कर्मादरू । तेणे कर्मठचि होय नरू । तेथ परमार्थ नाही साचारू । विधिनिषेधी थोरू पीडिजे ॥ ७१ ॥ केवळ स्वधर्मकर्म साडितां । अगी आदळे पॉपंडता। तेणेही मोक्ष नये हाता। निजस्वार्थी नागवले ॥ ७२ ॥ यालागी स्वधर्म आचरतां । निजमोक्ष लामे आयिता । हे वेदार्थाची योग्यता । जाणे तो ज्ञाता सज्ञान ॥७३॥ हे वेदार्थनिज योग्यता । सहसा न ये कवणाचे हाता । याचिलागी गा परमाथों । गुरु तत्त्वता करावा ॥ ७४ ॥ त्या सद्गुरूची पूर्ण कृपा होय । तरीच आतुडे वेदगुह्य । गुरुकृपेवीण जे उपाय। ते अपाय साधकां ॥ ७५ ॥ यालागी माझा वेद जगद्गुरू । दावी आपातता व्यवहारू। नेमी स्वधर्मकर्मादरू । जनाचा उद्धारू करावया ॥७६ ॥ ऐसा माझा वेदू हितकारी। दावूनि गुणदोप नानापरी । जन काही विषयाबाहेरी । वेद उपकारी जगाचा ॥ ७७ ॥ देशकालादिभावाना वस्तूना मम सत्तम । गुणटोपौ विघीयेते नियमार्थ हि कर्मणाम् ॥ ७ ॥ भक्तामाजीं भक्तोत्तम । साधलक्षणी साधसम । यालागी उद्धवासी सत्तम । ह्मणे पुरुषोत्तम अतिप्रीती ॥ ७८ ॥ उद्धवा येथ भैलता नर । भलता करील कादर । यालागीं वर्णाश्रमविचार । नेमिला साचार वेदांनीं ॥ ७९ ॥ जेथ करूं नये कर्मतंत्र । ऐसा देश जो अपवित्र । आणि काळादि द्रव्य विचिन । पवित्रापवित्र सागेन ।। ८०॥ अकृष्णसारो ठेशानामयमण्योऽशुचिर्भवेत् । कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासस्कृतेरिणम् ॥ ८॥ कोणे एके पृथ्वीतळी । मेघन वर्पता जळी । पेरिली धान्ये सदा निळी । वसुधा जिव्हाळी ते ह्मणती ॥ ८१ तेचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागी गा उखरी । मेघ वर्पतां शरधारीं । अकुर ना "डिरी उखरत्वे ॥८२॥ तेवी, देशाची शुद्धयशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी । जेथ कर्मी नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धीं न करावे ॥ ८३ ॥ कृष्णमृग जेथ नाहीं । ते जाण पा अपवित्र भुयी । कर्मादरू तिये ठायीं। न करावा पाही सर्वथा ॥ ८४ ॥ जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाही । ब्राह्मण अकर्मी जे ठायीं । भूमी तेही अपवित्र ॥ ८५ ॥ जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखी हेलनि निदिती । तो देश कर्माप्रती । जाण निश्चिती अपवित्र ॥ ८६ ॥ जे देशी कृष्णमृग असती । परी नाहीं भगवभक्ती । तो देश कर्माप्रती । जाण निश्चिती अपवित्र ॥ ८७ ॥ भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीटक कलिंग मागध । तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥ ८८ ॥ नाहीं उपलेप समार्जन । ते स्वगृही भूमी अशुद्ध जाण । का जेथ वेदवाह्य असज्जन । तही स्थान अपवित्र ॥ ८९ ॥ जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र । आता काळाचें काळतंत्र पवित्रापवित्र सांगेन ।। ९०॥ १ कमासक्ति २ पडिजे ३ नास्तिकपणा ४ हाताला येते ५ साधारणपणे ६ उत्तम लक्षणाचा ७ आपल्या वणोधर माला विरुद्ध ८ कला दिव्य विचित्र ९ दमदार, पाणथळ १० जिला पाण्याचा आधार नाहा अशी, उसारअस्मानी ११ कोम, बारीक अकुर १२ जमीन १३ निषिद्ध कमें करणारे व विहित न करणारे १४ अनाद, करून १५ वेदमार्गाला सोडून राहणारे