या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३६ एकनाथी भागवत सभार । होय तो नर शुद्धात्मा ॥१३॥ त्याची मकारापुढे धकार । ठेवूनि करितां उच्चार । अगी आदळे पाप घोर । तेणे होय नर अतिबद्ध ॥ १४ ॥ रजस्वला शुद्ध चतुर्थेहेनि । मेघोदक शुद्धः तिसरे दिनी । वृद्धिसूतक दहावे दिनीं । काळ शुद्धपणी या हेतू ॥ १५ ॥ पूर्व दिवशीचे जे अन्न । ते काळेंचि पाये गा दूपण । ज्यासी आले शिळेपण । ते अन्न जाण अशुद्ध ॥ १६ ॥ तैसे नव्हे घृतपाचित । ते बहुत काळे तरी पुनीत । जे विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि ॥ १७ ॥ में साचवणी अल्प जळ । त्यासी स्पर्शल्या चाडाळ । ते अपवित्र गा केवळ । नये अळुमाळ स्पर्श करूं ॥ १८ ॥ तेचि निझर को अक्षोभ जळ । तेथ स्पर्शल्याही चाडाळ । त्यासी लागेना तो विटाळ । ते नित्य निर्मळ पवित्र ॥ १९ ॥ अल्प केलिया स्वयंपाक । त्यासी जै आतळे श्वान काक । ते ते सांडावें निःशेख । अपवित्र देख तें अन्न ॥ १२० ॥तोचि सहनभोजनाचा पाक । त्यासी आत. ळल्या श्वान काक । सांडावे जेध लागले मुख । येर अन्न निर्दोख भोजनीं ॥ २१ ॥ शक्याशयाथवा युवा समन्या च यदारमो । अघ कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारत ॥१॥ झालिया चद्रसूर्यग्रहण । शक्तं स्नान न करिता दूपण । बाळक पृद्ध आतुर जन । न करिता स्नान दोप नाही ॥ २२ ॥ पुत्र जन्मलिया देख । स्वगोत्रज जे सकळिक । त्यांसी जाण आवश्यक । वाधी सूतक दहा दिवस ॥ २३ ॥ तेचि स्थळातरी पुत्र श्रवण । सूतकाअर्ती झाल्या जाण । त्या सूतकाचे बंधन । न बाधी जाण सर्वथा ॥२४॥ पूर्वदिनी गोत्रज मरे । तें स्वगोत्री सूतक भरे । येरे दिवशी दुसरा जै मरे । ते सूतकें सूतक उतरे दोहींचें ॥ २५ ॥ जेणे घेतले होय विख । त्यासी सर्पू लाविलिया देख । तेणे विखें उतरे विख । तेवी सूतकें सूतक निवारे ॥२६॥ जे वुद्धिपूर्वक केलें आपण । तें अवश्य भोगावे पापपुण्य । जे वुद्धीसी नाहीं विद्यमान । तें अहेतुकपण वाधीना ॥ २७ ॥ आपुले में अतःकरण । त्यासी पवित्र करी निजज्ञान । हे बुद्धीची शुद्धि जाण । विवेकसपन्न वैराग्य ॥ २८ ॥ जो धनवंत अतिसपन्न । त्यासी जुने वस्त्र अपावन । शिविले दंडिले" तेही जाण । नव्हे पावन समर्था ॥ २९ ॥ तेंचि दुर्वळाप्रति जाण । अतिशयें परम पावन । हे वेदवाद अतिगहन । स्मृतिकारें जाण प्रकाशिले ॥ १३० ॥ समर्थासी असाक्षभोजन । ते जाणावे अशुद्धान्न । दुर्बळासी एकल्या अशन । परम पावन श्रुत्यर्थे ॥ ३१॥ स्वयें न करिता पंचयज्ञ । भोजन ते पापभक्षण । सकळ सुकृतासी नौगवण । जै पराङ्मुखपणे अतिथीसी ॥ ३२ ॥ स्वग्रामी सर्वही स्वाचार । ग्रामातरी अर्धे आचार,। पुरी पट्टणी पादमात्र । मार्गी कर्मादर संगानुसारें ॥ ३३ ॥ विचारोनि देशावस्था । हे वेदमर्यादा तत्त्वता । याहूनि अन्यथा करिता । दोप सर्वथा कासी ॥ ३४ ॥ पाटव्य असता स्वदेहासी । कर्म न करी तो महादोषी । रोगें व्यापिल्या शरीरासी । कर्मकासी अतिदोपू ॥ ३५॥ पूर्वी द्रव्ये द्रव्यशुद्धी । सांगीतली यथाविधि । तेचि मागुतेनि प्रतिपादी । धर्मशास्त्रसिद्धी वेदोक्त ॥ ३६॥ १ मद्य २ चवथ्या दिवशी ३ तुपात तळलेले ४ पवित्र ५ वाहते पाणी ६ नि शक ७ ज्याला तोड लागले तें ८रोग्यान ९ दुसणेवरी १. भाऊवद ११ अतरे १२ हेतच्या अभावामुळे १३ विशुद्धबुद्धि १४ अपवित्र १५ दह घातलेलें: १६ कोणी पक्तीला नसता १७ हानि १८ शहरात १९ चवथ्या हिश्शाने २० पटत्व, बळ