या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकविसावा. ५४५ नाडले निश्चिती । शेखी निजवीजा नागेवती । राजे दंडूनि घेती करभार ॥ १३ ॥ तैशी अविधी याज्ञिकांची गती । स्वर्ग स्वीही न देखती । वित्या नरदेहा नागवती । शेखी दुःख भोगिती यमदंडें ॥ १४॥ वृथा पशंस दुःख देती । तेणें दुःखें स्वयें दुःखी होती। ऐसी याज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपति सांगत ॥ १५ ॥ स्वमोपमममु रोकमसन्त श्रवणप्रियम् । आशिपो हदि सकरप्य यजन्त्योन्यथा वणिक् ॥ ३१ ॥ स्वम दिसे सेवेचि नासे । तेवी काल्पनिक जग भासे । येथ सकाम कामनापिसे । स्वर्ग विश्वास मानिती सत्य ॥ १६ ॥ मुळीच मिथ्या मृगजळ । त्यामाजी शीतळ जळ । थाया घेऊनि मागे वाळ । तैसे सकाम केवळ स्वगालागीं ॥ १७ ॥ पिंपळावरून मार्ग आहे । ऐकोनि रुखा वेंधा जाये । तो जेवीं में गुतोनि राहे । तेवी स्वर्गवणे होये सकाम ॥ १८ ॥ स्वधर्ममार्गी चालावया नर । वेदू स्वर्ग बोले अवातर । ते फांदा भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ १९॥ वाट पिकावरी ऐकोनी । शाहाणा चाले मार्ग लक्षोनी । अश्वत्य साडी डावलोनी । तो पावे स्वस्थानी सतोपें ॥ ३२० ।। तेवीं स्वधर्माच्या अनुछानी । जो साडी स्वर्गफळे उपेक्षुनी । तो चित्तशुद्धीतें पावोनी । ब्रह्मसमाधानी स्वये पावे ॥ २१॥ या साडूनि स्वधर्ममार्गासी । श्रवणप्रिय स्वर्गसुखासी । सकाम भुलले त्यासी । जेवीं घटानादासी मृग लोधे ॥ २२ ॥ तेवीं जन्मोनि कर्मभूमीसी । वेचूनि धनधान्यसमृद्धीसी । वित्या नाडले नरदेहोसी । स्वर्गसुखासी भाळोनी ॥ २३ ॥ जैसा कोणी एक बाणी । जुनी नाव आश्रयोनी । द्वीपातरीचा लाभ ऐकोनी । न विचारिता मी समुद्री रिघे ॥ २४ ॥ उन्मत्त कर्णधाराचे संगैती । फुटकी नाव धरोनि हाती घेऊनिया सकळ सपत्ती । रिघे कुमती महार्णवीं ॥ २५ ॥ तो जेवीं समुद्री वुडे । तैसचि सकामासी घडे । स्वर्ग वाछिता वापुडे । बुडाले रोकडे भवार्णवीं ॥ २६ ॥ चाछित्ता स्वर्गसुखफळ । बुडाले स्वधर्मवित्त सकळ । वुडाले चित्तशुद्धीचें मूळ । बुडाले मुद्दल नरदेह ।। २७ ।। एव्हडें हानीचे कारण । देवो सागत आपण । सकामतेसी मूळ गुण । तेही लक्षण वयें सांगे ॥ २८ ॥ रज सत्वतमोनिया रज सरवतमोजुप । उपासते इन्द्रामुख्यान देवादीन तथैव माम् ॥ ३३ ॥ रजतमाचेनि उन्म । तत्त्व "संकीर्ण होय तेथें । तेव्हा रजतमाचेनि समतें । काम चित्तातें व्यापूनि खवळे ॥२९॥ अति काम सवळल्या चित्तीं । गुणानुसार विषयी प्रीती। तेव्हा सकामाची सगती । धरी निश्चिती भावार्थे ॥ ३३० ॥ सकामसगती साचार । कामकर्मी अत्यादर । स्वर्गभोगी महातत्पर । यजी देव पितर प्रमादिक ॥ ३१ ॥ मी सर्वात्मा सर्वेश्वर । त्या माझ्या ठायीं अनादर । कामलंपटत्वे नर । देवतातर उपासिती ॥ ३२॥ हाणसी देवतातर जे काहीं । ते तूंचि पं गा सर्वही । हा ऐक्यभावो नाहीं ।भेदयुद्धी पाहीं विनियोग ।। ३३॥ इंद्रादि देवद्वारा, जाण । मीचि होय गा प्रसन्न । त्या माझ्या ठायीं नागरले २ पसतात ३ असलेला तत्काल ५ कामाच्या इदाने ६हा, उद ७ साहायर ८ पद रागनो ९ बाजूला घालन १० कानाय संगसुखाची वर्णन थापडतात. ११जमभूमीसी १२सायला प्राप्त झालेल्या नरदेवारा मुस्तात १३ गलयत, जहाज १४ नावाड्याच्या सोबतीने, मदतीन, १५ मिश्रित १६ भूतपिशावादिर, समयमा भणजे भूतपति असे शस्रास हाणतात १७ कामनसाय -