या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत ॥ ३३ ॥ असोनि इंद्रियपाटवं पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण । त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥ ३४ ॥ तो नारद महामुनीश्वरू । मुक्त होऊनि भजनतत्परू । द्वारके बसे निरतरू । श्रीकृष्णी थोरू अतिप्रीति तया ॥ ३५ ॥ तभेकदा तु देवा वसुदेवो गृहागतम् । अचित सुसमासीनमभिवादममवीत् ॥ ३ ॥ धन्य धन्य तो नारदू । ज्यासी सर्वी सर्वत्र गोविंदू । सर्वदा हरिनामाचा छंदू' । तेणें परमानंदू सदोदित ॥ ३६॥ जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा । ज्याचेनि सगें तत्त्वता । नित्यमुक्तता जडजीवां ॥ ३७ ॥ तो नारदू एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा । आला वसुदेवाचिया राउळा । तेणे देखोनि डोळां हरिसला ॥ ३८ ॥ केले साष्टाग नमन । वैसी घातले वरासन । ब्रह्मसद्भावे पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिले ॥३९॥ नारद तोचि नारायण । येणे विश्वासेकरूनि जाण । हेमपात्री चरणक्षाळण । मधुपर्कविधिपूर्ण पूजा केली ॥ ४० ॥ पूजा करोनि सावधानी । वसुदेव बैसोनि सुसासनीं । हृदयी अत्यत सुखावोनी । काय आल्हादोनी बोलत ॥ ४१ ॥ यसुदेव उवाच-भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् । कृपणाना यथा पित्रोत्तमलोकवर्मनाम् ॥ ५ ॥ स्वलीला कृपा केली तुझी । तेणे सभाग्य जाहलों आझी । तुमचेनि आगमने आही। कृतकृत्य सन्निधिमानें ॥ ४२ ॥ चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं। त्यासी मातेच्या आगमनीं । सतोप मनी निर्भर ॥४३॥ त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखंदाती भूतमात्रा । स्वलीला तुझी मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥४४॥ मातेच्या आगमनी निजवाळा । दृष्टिउत्सगी नित्य नवा सोहळा । तुमची यात्रा दीना सकळा । भो. गवी स्वलीला निजात्मसुस ॥ ४५ ॥ माता सुख दे ते नश्वर । तुमच्या आगमनी अनश्वर । नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥४६॥ तुझी भागवतधर्ममार्गगामी । तेंचि तुमची भेटी लाहो आमी । जै पुण्यकोटी निष्कामी । प्रयागसंगमीं केलिया ॥४७॥ नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप । तुवा कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरूप ठसावे ॥४८॥ तुझेनि भक्तीसी महिमा अभूप । तुझेनि बाढला भक्तिप्रताप । तुझेनि भक्ति भगवद्रूप । तूं चित्स्वरूप निजनिष्ठा ॥ ४९ ॥ तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । की भक्तिमार्गीचा मार्गद्रष्टा । नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥५०॥ मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवा व्यासासी उपदेशन । प्रगट करविले दशलक्षण । दीन जन १ इद्रियाचे पढ़त्ल, चलासी (अविकलता) • घरी ३ हर्षला ४ पृताय ५ सुखदाची ६ दृष्टिसनिधानाने ७ अविनाशी ८ पुष्कळ ९ भागवताची दशलक्षणे अथवा दहा विषय आहेत ते येणेप्रमाणे -(१)सर्ग-विराटोत्पत्ति (२) विसर्ग-स्थावर जपमारमपसट्युत्पत्ति, (३) स्थान सष्टीचे पान व उनकप, (४) पोपण-मतारमा प्रह, (५) ऊति-पुण्यपापकमाइत वासना, (६) मन्चतर-ईशकृपापानभून मावतराधिपतींचे धर्म. इवरचरिने प भक्तचरित, (८) निरोध-जीवात्म्याचे इद्रिय व मत करण यासह लीन होणे, (९) मक्ति वमोत स्वाभिमानाच्या मुटनतरची स्थिति, (१०) आश्चय-सर्वनाशक परमात्मा नामानी आपल्या चतु शोसी भागरतात दशजाणामयधान लिहिलेल आहे ते येणेप्रमाणे ---'मुन्य भागरताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थितीत मी सागेन तुज समिती नृपवर्या ।। ८११ ।। सर्ग, विमर्ग, म्यान, पोपण, । ऊति, मम्वतर, देशानुकथा,। निरोध, मुक्ति, सय पूर्ण । एक 'दालक्षण' भागरत ॥ १२ ॥ दशलक्षणाचे रक्षण । नुज भी सागेन संपूर्ण । ऐक राया सावधान । शशिधा जाता ॥ १३॥ सर्ग पोलिजे संसारात विसग हाणिजे सहारते । स्थान माणिजे चाठात । पोपण तेथे साकर्म सा नाय जति । चौदा मनची व्यवस्थिती । या नानमन्वतर हाणती । दशाननारकोनि ईशचरित ॥१५॥