या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५२ एकनाथी भागवत. त्यागवी निधी विषयांतें ॥ ६१ ॥ तेथ अग्निहोत्रादि विधान । यज्ञात कर्माचरण । तै चित्तशुद्धीचे कारण । वैराग्य दारुण उपजवी ॥ ६२ ॥ दारुण वैराग्यउत्पत्ती । इहामुनविपयनिवृत्ती । तेव्हा साधकास माझी प्राप्ती । सहजस्थिति स्वभावे ॥ ६३ ॥ एवं कर्मकाडाचिये स्थिती । विधिनिपेध वेदोक्ती । साधकांसी माझी प्राप्ती । जाण निश्चिती या हेतू ॥ ६४॥ विषयीं परम बाधा देखती । परी त्यागी नाही सामर्थ्यशक्ती । ऐशिया साधकांप्रती । वेदें मद्भक्ती द्योतिली ॥ ६५ ॥ तेथ मंत्रमूर्ति उपासन । माझे सगुण अनुष्ठान । तेथ करिता अनन्यभजन । रजतमें जाण नासती ॥६६॥ मग केवळ सत्ववृत्तीं । श्रवणकीर्तनी अतिप्रीती । तेणे मझायो सर्वांभूतीं । माझी चौथी भक्ती तेणे होय ॥ ६७ ॥ आतुडल्या माझी चौथी भक्ती । मद्भक्तां नावडे मुक्ती । अद्वैत भजना. चिया प्राप्ती । धिकारिती कैवल्य ॥ ६८ ॥ अद्वैतवोधे करितां भजन । मी अनंत अपार चिद्धन । भक्तीमाजी आकळे जाण । ये मद्रूपपण मद्भक्ता ॥ ६९ ॥ तेव्हां भज्य भजक भजन । पूज्य पूजक पूजन । साध्य साधक साधन । अवघे आपण स्वयें होय ॥४७॥ माझी ऐश्वर्यसामर्थ्यशक्ती । तेही ये निजभक्ताच्या हाती । अद्वैतभजनाचिया प्रीती। मत्पदप्राप्ती मद्भक्तां ॥ ७१ ॥ मी देव तो भक्त शुद्ध । हा बाहेरी नावाचाचि भेद । आतैवटा पाहता बोध । सच्चिदानंद निजऐक्य ॥७२॥ हे उपासनाकांडस्थिती । साधकीं करूनि माझी भक्ती । यापरी पावले माझी प्राप्ती । जाण निर्थिती उद्धवा ॥ ७३ ॥ मायाप्रतिबिवित चैतन्य । त्वंपदार्थे वाच्य जाण । ज्याच्या अंगी जीवाभिधान । अविद्या जाण उपजवी ॥ ७४ ॥ जेवीं स्वमामाजी आपण । आन असोनि देखे आन । तेवीं आविद्यकत्व जाण । जीवपण एकदेशी ॥७५ ॥ जे मायांसवलित चैतन्य । जो योगजन्य जगकारण । जो सर्वद्रष्टा सर्वज्ञ । सदा सपन्न ऐश्वर्यं ॥ ७६ ॥ जो सकळ कर्माचा कर्ता। जो कर्ताचि परी अकर्ता । ज्याचे अगी स्वभावता। नित्यमुक्तता स्वयंभ ॥७७॥ ज्याची अकुंठित सहजसत्ता । जो परमानंदें सदा पुरता । ज्यासी ईश्वरत्वे समर्थता । हे जाण वाचकता तत्पदार्थाची ॥७८ ॥ जीवाचे साडोनिया अज्ञानत्व। शिवाचें सांडनि सर्वज्ञत्व । दोहींचे शोधित जे लक्ष्यत्व । ऐक्य निजतत्त्व साधिती ॥ ७९ ॥ लग्नी नोवरा निमासुरा । तोचि गेलिया देशावरा । विदेशी देखिला ऐकसरा । तारुण्यमदभरा सपन्न ॥ ४८० ॥ ते काळीची त्यजूनि बाल्यावस्था । आजिची नेचूंनि तारुण्यता । पत्नी अनुसरे निजकाता। निजस्वरूपतास्वभावे ॥ ८१ ॥ तेवीं त्वंपदतत्पदवाच्यार्थ । दोहीचा साडावा निश्चितार्थ । ऐक्य अगीकारावा लक्ष्यार्थ। हा ज्ञानकाडार्थ उद्धवा ॥ ८२ ॥ जीवशिवाचेनि ऐक्य जाण । माझे चित्स्वरूपी समाधान । स्वयें पाविजे आपण । हे ज्ञानकांड सपूर्ण बोलिले वेदें ।। ८३ ॥ वेदा आदिमध्यअवसानीं । माते लक्षिती का तिनी । तोचि अर्थ १ दृढ २ या लोकांच्या व परलोकींच्या विपयोपभोगाची निवृत्ती ३ प्रकट केली ४ अति ५ मोक्ष ६ ज्ञानमय ७ अतरी ८ तात्पर्य एवढेच आहे, ती वेदवाणी धर्मकाडात यशखरूपी जो मी त्या माझें विधान करिते, उपासना. काळात तत्तद्देवतारूपी माझंच वर्णन करते, व ज्ञानाडामध्ये ज्या भाकाबादि प्रपचसमूहाचा 'तस्माद्वा एतस्मादात्मन आकाश सभूत' इत्यादि बचनानी उभारणी फरून, विक्रप करून, निषेध करिते तेही मीच होय ९ मायायुक्त १० सुदर, मुखरूप हा शान्द मागे गेला आहे "मुख निमासु मनोहर । भक्तचकोरचद्रमा"-अध्याय १४-४५६ ११ देशातराला, १२ अक्सा १३ न घेऊन १४ सेवा करिते १५ शान्दिकार्थ.