या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

है एकनाथी भागवत. श्रुतोऽनुपठितो ध्यात आदतो वानुमोदित । सद्य पुनाति सद्धर्मो देवविश्वनुहोऽपि हि ॥ १२ ॥ भागवतधर्माचेनि गुणे । एक उद्धरती श्रवणे । एक तरती पठणे । एक निस्तरती ध्याने ससारंपाशा ॥ १२ ॥ एक श्रोतयांवक्तयाते । देखोनि सुखावती निजचित्तें । सद्भावे भले ह्मणती त्यांते । तेही तरती येथे भागवतधर्मे ॥१३॥ हे नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा । अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भागवतधर्मी ॥१४॥ हृदयीं धरितां भागवतधर्म । अकाचे निर्दळी कर्म । अधयांचे निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥ १५ ॥ जेथ रिघाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म । निदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचे नाम उरों नेदी ॥ १६ ।। ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेने केला प्रश्न तुवा थोर । निजभाग्ये तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा ॥ १७ ॥ तुझें वायूँ पविपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण । जयाचेनि नामें आझी जाण । परम पावन जगद्वंद्य ॥ १८ ॥ तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य बसे तुझिया घरांत । तुझिया ऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहाता ।। १९ ।। वसुदेवा तुझिया नामता । वासुदेव हाणती अनंता । तें वासुदेव नाम स्मरतां । परम पावनता जगद्वंद्या ॥ १२० ॥ त्वया परमकल्याण पुण्यश्रवणकीर्तन । सारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥ १३ ॥ ज्याचेनि श्रवणे वाढे पुण्य । ज्याचेनि नामें झडे भवबंधन । तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥ २१॥ तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण । मज तुझा हा उपकार पूर्ण । तूं परम कल्याण वसुदेवा ॥२२॥ ॥ आशंका॥ ॥ ऐकोनि नारदाचे वचन । झणे विकल्प धरील मन । यासी पूर्वी होतें विस्मरण । आता जाहले स्मरण वसुदेवप्रश्ने ॥ २३ ॥ ज्याची ऐसी विकल्पयुक्ती । ते जाणावे आत्मघाती । तेही अर्यांची उपपत्ती । ऐक निश्चिती शुक सांगे ॥ २४ ॥ अग्निकुंडामाजीं स्वंयभ असे । तो घृतावदाने अतिप्रकाशे । तेवी सप्रेम प्रश्नवशे । सुख उल्लासे मुक्ताचें ॥२५॥ सप्रेम भावार्थ, मीनला श्रोता । मुक्तही उल्हासे सागे कथा । तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता संवर्म ॥ २६ ॥ यालागी मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्मे निवती सपूर्ण । तोचि वसुदेव केला प्रश्न । तेणे नारद पूर्ण सुखावला ॥ २७ ॥ जे कां पूर्वपरपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ । सागावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥ २८ ॥ ____अप्राप्युदाहरन्तीममितिहास पुरातनम् । आफ्भाणा च सवाद विदेहस्य महात्मन ॥१५॥ येच अर्थी विदेहाचा प्रश्न । सवाढती आर्षभ नवजण । ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास सपूर्ण सागेन ऐक ॥ २९ ॥ आर्षभ कोण हाणसील मुळी । त्यांची सागेन शावळी। जन्म जयाचा सुकुळीं । नवामाजी जाहली ब्रह्मनिष्ठा ।। १३० ।। मियनतो नाम मुतो मनो स्वायभुषस्य य । तस्यासीधस्ततो नाभिर्नपभस्तामुत स्मृत ॥ १५ ॥ स्वायभु मनूचा सुतु । जाण नामें प्रियवतु । त्याचा आग्नीध्र विख्यातु । नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी ॥३१॥ त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ऋषभ जन्मला वासुदेवांशु । मोक्षधर्माचा प्रकाशु । जगी सावकाशु विस्तारिला ॥ ३२ ॥ ससारयात्रा २ यात ३ देवांची निंदा करणारा ४ प्राणिमानाचा द्वेप करणारा ५तिही लोकी ६ तत्क्षणी कदाचित् निजात्मघाती मूर्निमत १० तुपाच्या आहुतीने ११ मुगाची अत्यत गोडी १२ रहस्यासक्ट ११ आराम पापतात १४ पुरातन, सनातन १५ सगू सागरा १६ श्रीकृष्णाचा अश STU