या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८८ एकनाथी भागवत. करी विकळ अशांती ॥ १५ ॥ ज्यासी तुझी पूर्ण भक्ति जड़े । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे । जो तुझे चरणी अखंड जोडे । त्यासीच घडे हे शांती ॥१६॥ तूं विश्वात्मा त्रिज गती । चोरी न चले तुजप्रती । मज ही इवें न साहवती । तूंही श्रीपति जाणसी ॥१७॥ परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती । ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती वंद्वाते ॥१८॥ इंवें दुःसह सर्वार्थी । तेथे माझा पोड किती । एवं द्वंद्वसंहिप्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ति सांगावी ॥ १९ ॥ सकल साधनें वश्य होती । परी, हे सहिष्णुता न ये चित्ती । ते मी लाभे निजशाती । ऐशी कृपा निश्चिती करावी ॥ ७२०॥ मी शातीचे लाभ कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण । ह्मणोनि धरिले श्रीचरण । उद्धवे आपण निजभावे ॥ २१ ॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । सतोपला कृपामूर्ती । जेवीं चातकाचिया तृषार्ती । गोंनि त्रिजगती निववी मेघ ॥ २२॥ तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा । उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥ २३ ॥ उद्धवप्रश्नाचे प्रत्युत्तर । उदार सुंदर गुणगंभीर । उघडोनि शातीचे भांडार । स्वयें शार्ङ्गधर सांगेल ॥ २४ ॥ नवल सागती ते ठेव । युक्तिचातुर्यवैभव । निजशांतीस पडे खेवें । ऐसे अपूर्व सागेल ॥ २५ ॥ श्रीकृष्णमुखीच्या ज्ञानोक्ती । ऐकता स्वयंभ प्रकटे शाती । ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चिती सावध ॥ २६ ॥ जेवी गजग्रहणाविखी पंचार्न । साटोप धरी आपण । तेवी शाति साधावया जाण । सावधान उद्धव ॥२७॥ जळी तळपंताचि मासा । वडा झेलूनि ने आकाशा । तेवीं शांतीचिया आमिपा । उद्धय तैसा तळपत ॥ २८॥ भिक्षुगीतनिरूपण पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण । निजगाति बाणे संपूर्ण । तेचि लक्षणं सागेल ॥ २९ ॥ ज्यांसी परमार्थाची चाड तिहीं सांडूनि साधनकवाड । शातिसाधनी श्रद्धा चाड । अतिदृढ राखावी ॥३०॥ श्रीकृष्ण सागेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थों सावधान । एका विनवी जनार्दन । श्रोता अवधान मज द्यावे ।। ७३१ ॥ ॥ इति श्रीर्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकायां द्वाविशतितमोऽध्यायः ॥ २२ ॥ ॥ अध्याय ॥ २२ ॥ श्लोक ॥ ६० ॥ ओव्या ॥७३१॥ A अध्याय तेविसावा. श्रीगणेशाय नमः ।।ॐ नमो सद्गुरु विश्वरूप। विश्वा सेवाह्य तूं चित्स्वरूप । तुझें निर्धारिता रूप । तूं अरूप अव्यय ॥॥ चराचर जे सावेव । ते तुज अरूपाचे अवेव । जीवशिव हे तुझी माय । अद्वयवैभव मैं तुझें ॥२॥ घृतपुतळी दिसे साकार । घृतपणे ते निराकार । तैसा तू अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥३॥ उसावले जे दिसे जग । निर्धारितां तुझें अंग। अंग पाहता तूं अनग निगाचा माँग तुजमाजी नाहीं ॥४॥ देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूचि होसी । होणे न होणे नाहीं तुजपाशी । ऐसा तू जगासी जगद्गुरू । ॥५॥ १ वरी १ सोसवत नाहीत ३ पवा, केवा ४ इवें सहन करण्याची शक्ति ५ भक्ताच्या वचनाबरोबर ६ अनुभव, ५ आलिंगन, मिठी ८ हत्तीला क्पजात आणण्यामाठी सिंह १० एक पक्षी ११ तप, यज्ञ, हठयोग, इत्यादि साधने क्षच दारे, साधनाचा मार्ग १२ मोठी.१३ भातवाहेर. १४. साकार, मूतिमत १५ अवय १६ माया १७ तुपाची माहुली १८ अविनाशी १९ पाहता, निश्चित करिता २० कामाचा, २१ मार्ग, पत्ता, मागमूस, लवलेश,