या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९२ एकनाथी भागवत. श्रवणार्थी वुडी देती । ते पवित्र होती निजक्षमा ॥ ६९ ॥ ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत । प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥ ७० ॥ । - केनचिद्भिक्षुणा गीत परिभूतेन दुर्जने ।सरता प्रतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥ ५॥ उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनी उपद्रवितां त्यासी । ह्मणे क्षयो 'होय दुष्टकमासी । येणे संतोपें मानसीं क्षमावंत ॥ ७१॥ आपुले अगींचे मळे । पुढिली क्षाळितां सकळ । जो क्रोधेसी करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाती ॥ ७२ ॥ लोक ह्मणती ज्यासी दुर्जन । संन्यासी ह्मणे ते माझे स्वजन । माझे दोपांचे निर्दळण ।। यांचेनि धर्म जाण होतसे ॥ ७३ ॥ संमुख कोणी निंदा करिती । तेणे अत्यंत सुखावे चित्ती । ह्मणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृति सहजें होय ॥ ७४ ॥ ऐसेनि विवेकें तत्त्वतां । शातीसी ढळों नेदी सर्वथा। चढोनि निजधैर्याचे माथां । गायिली गार्थी ते ऐक ।। ७५ ।। उद्धवासी ह्मणे श्रीकृष्णनाथ । ये अर्थी होई सावचित्तं । अतिलोभी तो अतिविरक्त । झाला तो वृत्तांतसांगेन ॥ ७६॥ . ।।। । अवन्तिपु द्विज कश्विदासीदात्यतम श्रिया । वातावृत्ति कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपन ॥६॥ __मालवदेशी अवंतिनगरी । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं । कृपिवाणिज्य वृत्तीवरी । जीविका करी निरतर ॥ ७७ ॥ गांठीं धनधान्यसमृद्धी ।। अमर्याद द्रव्यसिद्धी । परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही निशुद्धी न खाय ॥७८ ॥ पोटा सदा,खाय कैदन्न । तेही नाही उदरपूर्ण । तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन, । जठरतर्पण न पावती ॥ ७९ ॥न, करी नित्यनैमित्य । स्वमी नेणे धर्मकृत्य । देव ब्राह्मण अतिथी तेथ । सदा जात परामुख ॥८० ॥ कवडी एक लाभू पाहे । तै मातापित्यांचे श्राद्ध आहे । तें साडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचे ॥ ८१॥ मी उत्तम हा हीनवर्ण । है धनलोभे गिळी आठवण । हाता येता देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचे ॥ ८२॥ धनकामासाठी देख । न मनी पाप महादोख । कवडीच्या लोभे केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥८३ ॥ यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट । अतिवंक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥ ८४ ॥ त्या धनलाभाचा अवरोधू । होता देखोनि खवळे क्रोधू । गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्ध स्वयें होय ।। ८५ ॥ धनकामी क्रोधाची वस्ती । धनापाशी पा असती । धनलोभी ज्याची स्थिती । कंदर्युवृत्ति त्या, नाव ॥ ८६ ॥- ऐसे धन साचिले फाडोवाडें । त्याचाही व्यय जे करणे पडे । तें प्राणांतचि येऊनि घडे । विचार पुढे असेना ॥ ८७॥ वानराचे गालींचे चणे । हाता न येती, जिता प्राणे । तैसा ,द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥ ८८॥ शाययोऽतिथयस्तस्य पायानेणापि नाचिता । शून्यायमथ आरमापि काले कामैरनर्चित ॥ ७ ॥ घरींचा भात चेल काहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं । तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥ ८९ ॥ अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले १मिधुगीताच्या वर्णनाओं २ समोर ३ नाश, निवृत्ति ४ गाणे ५ सावध ६ ऐका. माळव्यात ८ उज्जनी माय रशेतवासी आश घ्यापार करून निर्वाह करीत असे १० हलके, वाईट अन्न ११ पोटभर १२ उपाशी परत जात १३ विटाळाची क्षिति पाळगीत नसे १४ मोठा ठक १५ अडयदा १६ कृपापणा १७ अनेक फाडी माइन जानेमरी १४३,३९४० १८ तोंडातले. - - - + +H