या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९८ एकनाथी भागवत. नाहीं । हे ना ते ऐसे पाहीं मज जाहले ॥१॥ आयासत्रासचिंतेसहित । धनापाशी भ्रम नादत । अर्थ तितुका अनर्थयुक्त । तोचि अर्थ स्वयें सागे ॥२॥ स्तेय हिंसाऽनृत दम्भ काम कोष स्मयो मद । मेदो घेरमविश्वास सरपर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥ अर्थ सर्वांगें अनर्थभूत । हे माझें वचन त्रिसत्य । पृथ्वीमाजी जे जे अनर्थ । ते ते अर्थात उपजती ॥३॥ पुसाल अर्थीचे अनर्थ । ते सांगता असंख्य अनंत । सक्षे सागेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥४॥ प्रथम अनर्थ अर्यासी । चोरी बसे अर्थापाशीं । अयूं नाहीं गा जयापाशीं । चोरापासून त्यासी भय नाहीं ॥ ५॥ द्रव्य नाहीं ज्याच्या हाती । त्याते देखोनि चोर भिती । काही मागेल आह्मांप्रती । ह्मणोनि लपती त्या भेणे ॥ ६ ॥ अतयं नेत्रांतरें नेणे । कां धातुवादें सर्वस्व घेणें । परस्त्र भोळ्यांनी बुडवणे । कां विजनी हरणे सर्वस्व ॥७॥ मार्गी पडलें धन पराचे । स्वयें जाणोनि अमकियाचे । नाही देणे त्यासी साचे । हेही चोराचे लक्षण ॥ ८॥ स्वर्णस्तेयें नरकप्राप्ती । ऐसे विवेकीही चोरी करिती । मा इतराची कायशी गती। चोरीची वस्ती धनापाशी ॥ ९ ॥ जगी महापापिणी चोरी । तीस कोणी बैसों नेदी द्वारीं । ते राहिली सुवणोंमाझारी । धन तेथ चोरी निश्चित ॥२१० ॥ देखतांचि त्या धनासी । विकल्पी होती सन्यासी । इतराची कथा काइसी । चोरी धनापाशी स्वयें ॥११॥ प्रथम अनर्थलक्षण । धनापाशी चोरी जाण । धन हिसेचे आयतन । तेही निरूपण अवधारीं ॥ १२॥ धनालागी द्वद्ध दारुण । पुत्र पौत्र मारिती जाण । धनालागी घेती प्राण । सुहृदपण साडोनी ॥ १३ ॥ धनलोभाचे कवतिक । कन्या बापासी देतसे विख । पितृघाताचे न मानी दुःख । निष्ठुर देख धनलोभ ॥ १४ ॥ धनलोभी सांडी वापमाये । स्त्री घेऊनि वेगळा राहे । तेथही धनलोभ पाहें । वैर होये स्त्रीपुरुपा ॥ १५॥ धनलोभाची नवलपरी । पुत्र पित्याते जीवे मारी । पिता पुत्राते सहारी । कठिण भारी धनलोभ ॥ १६ ॥ जे नवमास वाहे उदरात । जे सदा मोशी नरकमूत । ते मातेचा करी घात । द्रव्यानिमित्त निजपुत्र ॥ १७ ॥ अभिनव धनलोभाची त्राय । नवल ते मी सांगों काय । पोटींचा पुत्र मारी माय । ऐसा अनर्थ होय धनासाठी ॥१८॥ एवं हिसा ते हे सपूर्ण । दुसरे अनर्थलक्षण । आतां असत्याचे विदान । तेंही निरूपण स्वयें सागे ॥ १९ ॥ असत्य जन्मले अर्थाच्या पोटी । अर्थवळे ते दाटुंगें सृष्टीं । अर्थासवे असत्य उठी । असत्याची गाठी अर्थसीं ॥ २२० ॥ तो अर्थ असे जयापाशीं । का अर्थअपेक्षा जयासी । तेथ असत्य वसे कुटुंसी । धन ते मिरासी मिथ्यात्वी ॥ २१॥ अर्थवळ थोर असत्यासी । मिथ्या वोलवी वापासी। धनलोभ झंकवी मातेसी । सत्यत्व धनापाशी असेना ॥ २२ ॥ क्रयावि कयीं धनलोभ जाण । मिथ्या बोलती साधारण । परी वेदशास्त्रसंपन्न । धनार्थ सज्ञान वोलती मिथ्या ॥ २३ ॥ वेदींचा आठव न ये पूर्ण । तो सभावनेलागी जाण । ह्मणवी भी वेदसपन्न । कराया यजैन 'नीचाचें ॥ २४ ॥ भाग देऊनि मध्यस्था । मी चतुःशास्त्री १लेशदायक • निवार सत्य ३ पाहोनि ४ सोने चोरल्याने ५ बुद्धिम्राट ६ जागा, स्थान ७ द्वेष ८ पुत्र पित्यातें मारी जाण ९ नवल १० विप ११ मोव्या नवलाची १२ सत्ता, सामर्थ्य १३ करणी, कसर १४ पळवत, प्रपळ. १५ पसनितो. १६ देण्याघेण्यात १७ द्रव्यप्राप्तीसाठी.१८ याग