या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा ६०३ त्यासी । आपणियापाशी राहिले ॥ ३२० ॥ ऐशिया अविश्वासापुढे । परमार्थ काइसें वापुडें । विकल्पाचे बळ गाद। तो करी कुडे तत्काळ ॥ २१॥ पोटातून जो अविश्वासी। तो सदा देखे गुणदोषांसी । अखड द्वेपी परमार्थासी । हा त्यापाशी स्वभावो ॥२२॥ यापरी अविश्वासी । बंद्धवैर पडे परमार्थासी । जो पोटीचा अविश्वासी । हाँसल्याही त्यापाशी नचावे दीनीं ॥ २३ ॥ सकळ दोपांमाजी समर्थ । सकळ दोपांचें राजत्व प्राप्त । तो हा अकराया अनर्थ । असे नादत धनांमाजी ॥ २४ ॥ अकराही इंद्रियासी। पूर्ण करी अविश्वासेसी । यालागी अकराव स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजी ॥ २५ ॥ मुख्यत्वे स्पर्धेचे आयतन । बहुविद्या का बहुधन । हेचि स्पर्धेचे जन्मस्थान । येथूनि जाण ते याढ़े ॥ २६ ॥ विद्या झालिया सर्पन्न । पडित पंडितां हेळण । मुख्य गुरूसींच स्पर्धा करी जाण । हे स्पर्धालक्षण विद्येचे ॥ २७ ॥ गार्गी झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण । कुबेर परधनें सपन्न । मी स्वसत्ता जाण धनान्य ।। २८ । माझिया निजधनापुढे । गणिता अल्प गंगेचे खडे । माझिये धनाचेनि पाडे | कोण यापुढे उभे राहे ॥ २९ ॥ मग जे जे देखे धनरंत । ते ते हेल्लनि साडी तेथ । यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ।। ३३० ॥ एच धरूनिया अर्थ । स्पर्धा वारावा अनर्थ । सदा नादे धनाआत । तो हा वृत्तात सागीतला ॥ ३१॥ आता तीन अर्थाचा मेळा । एके पंदी झाला गोका । तोही नादे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ।। ३२॥ स्त्री धूत आणि मद्यपान 1 या तिहींत वाढवी धन । हे तीन अनर्थ दारुण । धनवता पूर्ण आदळती ॥३३॥ जो का पुरुप निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान । देखोनि निर्धनाचे वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुकी ॥ ३४॥ धनहीन पुरुपाचे घरीं । कलहो स्त्रीपुरुषामाझारी । निर्भसनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुपात ॥ ३५ ॥ धनवंता पुरुपासी। स्त्री लवोटयो करी कैशी। कुंटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुकीत ॥ ३६॥ त्या धनाची झालिया तुटी । स्त्री सरसोनि लागे पाठी । आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठी फडफडोनी ॥ ३७॥ दिवसा पोराची तडातोडी । रात्री न सोसे तुमची वोढी । हाती नाही फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८॥ ऐशापरी कडोविकडी । निर्भटूनि दूरी दवडी । निर्धन पुरुपाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥ यापरी निर्धन पुरुपासी । स्वस्त्री चश्य नव्हे त्यासी । स्त्रीवाधा धनवतासी । अहर्निशी अनिवार ॥३४०॥ लानि धनवंत नर । वेश्या मिरवी श्रृंगार । हावभाव चमत्कार । त्यासी धनाध्य थोर भाळले ॥४१॥ वेश्याकामसंग जाण । अखंड लाचावले मन । तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥४२॥ मद्यपानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा सेळे द्यूत । एष हेही तिन्ही अनर्थ । जाण निश्चित अर्यासी ॥४३॥ अर्थापाशी पधरा अनर्थ । ते सागीतले इत्यंभूत। सुखाचा लेश येथ । नाहीं निश्चित धनवता ॥४४॥ १ हटवेर २ जाव ३ अविश्वासी ४ चुरस, एरपराभवाची हौस ५ स्थान संपूर्ण ७ विटयन ८ दगडाचे खदे, व, लहान गोटे ९ शब्दात 'व्यसनानि' या एका पदात १० भिडतात ११ जडामारसा, व्यर्थ ओझ्याप्रमाणे १२ल्द पूत आय १३ भाकरीचा तुरडा १४ पुत्री १५ 'पू' करीत १६ सतापा दातओठ साउन १७ आयुष्याची १८ नानातन्हान, परोपरीनी १९ दारू पिणे