या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६०४ एकनाथी भागवत. ,, एते पञ्चदशानी पर्थमूला मता नृणाम् । तम्मादन माग्य श्रेयोर्थी दृरतम्त्यजेत् ॥ १९॥ । एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित । जे अर्थसग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥ यासी नाममात्र हा अर्थ । येन्हवी मूर्तिमंत अनर्थ । यालागी श्रेयार्थी जे हरिभक्त । तिहीं निश्चित त्यागावा ॥ ४६॥ जेवी का चोळ हुंगेना माशी । टेकुण न ये तेलापाशी । वोळंबा न लगे अग्नीसी। तेवीं जो अर्थासी नातळे ॥४७॥ जेवीं कां अग्नीमाजी लवण पडे । ते तडफडोनि वाहेर उडे । तेवी मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥४८॥ वचनाग मुखी घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण । तोचि परिपाकी आणी मरण । तैसा अर्थ जाण अनीं ॥ ४९ ॥ यालागी जो मोक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हाती । काया वाचा चित्तवृत्ती। अर्थ निश्चिती त्यागावा ॥ ३५० ॥ अर्थमूळ सकळ भेद । पूर्वी बोलिला एवविध । तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सागत ।। ५१ ॥ मिद्यन्ते भ्रातरो दारा पितर मुहदस्तथा । एकास्निग्धा काकिणिना मद्य सर्वेऽरय कृता ॥२०॥ इष्टमित्राचे मित्रत्व मोडी । बंधुवंधूचा स्नेह विघडी । सुहृदांचे सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥ पित्यापुत्रांमाजी विरोध । स्त्रीपुत्रामाजी द्वंद्व । तो हा जाण अर्थसबंध । विभांडी हार्द सुहृदाचे ॥ ५३ ॥ काकिणी ह्मणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्नेह तोडी । त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४॥ ___अर्थ नापीयसा होते सरव्या दीप्तमन्यव । त्यजन्त्याशुस्पृधो प्रन्ति सहसोज्य सौहदम् ॥ २१ ॥ __ अतिअल्प अर्थासाठी । सुहृदता साडोनि पोटी । को खवळला उठी । शस्त्रमुंठी उद्यत ॥ ५५ ॥ तेये आप्त होऊनि अनाप्त । परस्परें करिती घात । अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥५६॥ जिता अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारी । उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥ _ लब्ध्या जन्मामरमाय मानुय्य तहिजाम्यताम् । तदनादृत्य ये स्वाथ शन्ति यान्त्यमुभा गतिम् ॥ २२ ॥ कोटि जन्मांचे शुद्ध सुकृत । तेणे कर्मभूमी नरदेह प्राप्त । तेयेही वर्णायजन्म समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वे ॥ ५८ ॥ ऐसे जन्म पाचावया येथ । अमरही मरण मागत । इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हे जन्म ।। ५९ ॥ जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत । तेही हे जन्म वाछित । उत्कठित अहर्निशी ॥ ३६० ॥ येथ करितां भगबद्धती । पाया लागती चारी मुक्ती । यालागी हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशी ॥ ६१ ॥ ऐसे उत्तम जन्म पावोनी । अतिअभाग्य मी त्रिभुवनीं । निजस्वार्यात उपेक्षुनि । भुललो धनी धनलोभे ॥ १२ ॥ वनलोभाचिया भ्रांती । का लोकेपणा लौकिकस्थिती। जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥६३॥ तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्या नरकप्राप्ती । चौन्यायशी लक्षयोनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ।। ६४ ॥ जया ब्राह्मणजन्माआत । स्वर्गमोक्ष सहजे प्राप्त । तेचि अर्थीचा इत्यर्थ । स्वयें सागत धनलोमी॥६५|| । १ कल्याणाची इच्छा करणारे, खहितेच्छु २ वाळवी, मुग्या "देसा चोळया इगल न चरे"-ज्ञानेश्वरी ८-८९ ३ मीट ४ पटे ५ शेवटीं ६ मुहदपणा ७ मुहदाच्या अतरणातले प्रेम नाहास करितो ८ हातात शस्त्र घेऊन किवा मूट पडून मारायाला तयार होतो ९उदित १० राम्परागोळी, नारा ११ चांत श्रेष्ठ अशा नाह्मणकुळात जन्म १२ रोकात प्रतिष्ठा वाढावी अशा इच्छे।