या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥ डोळीचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख । तेवीं वासनामात्रे मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८॥ ह्मणाल येथ अविद्या देख । ते होय सुखदुःखदायक । अविद्या ब्रह्म असतां देख । मनेवीण सुखदुःख कदा नुपजे ॥९॥ अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुपुप्तीच्या ठायीं । तेव्हा सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेही कहीं देखिजेना ॥ ६१० ॥ मन दुश्चिंत जेन्हां पाहीं । तेव्हा जो भोग भोगिजे देहीं । तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११॥ यालागी सुखदुःखांचे कारण । मनचि आपण्या आपण । तेणे लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्री ॥ १२ ॥ भवचक्री प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन । तेचि अर्थीचे निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३॥ मनो गुणान्दै सृजते बलीयततश्च कर्माणि विलक्षणानि । शुक्रानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्य सयों मृतयो भवन्ति ॥ ४५ ॥ __ मनें कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तीतें । त्याचि त्रिगुण होती येथें । गुणविभागातें गुणवृत्ती ॥ १४ ॥ सत्त्वरंजतमादि गुणी । सुरनरतिर्यगादि योनी । मनें त्रिभुवन उभवूनी । ससारभुवनीं स्वयें नादे ॥ १५ ॥ त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणे रची क्षणे मोडी । मन ब्रह्मादिका भुली पाडी । इतर वापुडी ती कायी ॥ १६॥ मनाचा वलात्कार कैसा । निर्गुण पाडी गुणाच्या फासाँ । लावूनि जीवपणाचा झांसाँ। संसारवळसा आवर्ती ॥ १७॥ केवळ विचारिता मन । तें जड मूढ अचेतन । त्याचें केवी घडे स्त्रजन । तेचि निरूपण सांगत ॥ १८ ॥ अनीह आरमा मनसा समीहता हिरण्मयो मसस उद्विचष्टे । ___ मन बलिझं परिगृह्य कामान् जुपन्निपदो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥ आत्मा चित्स्वरूपें परिपूर्ण । निःसग निर्विकार निर्गुण । त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥ जो स्वप्रकाशे प्रकाशघन । निजतेजें विराजमान । जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ २० ॥ विचारिता निजनिवाडें । मनाचे जडत्यचि जोडे । त्यासीही संसार न घडे । भवबंध धडे तो ऐका ॥ २१॥ नवल मनाचे विंदान । शुद्धी उपजवी मीपण । तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्या जाण स्वयें आणी ॥ २२ ॥ मन सकल्पाचे वळ । शुद्धासी करी शबळ । लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें वाघे ॥ २३ ॥ जेवीं घटामाजील घटजळ । आँकळी अलिप्त चद्रमंडळ । तेवीं मनासकल्पें केवळ । कीजे शवळ चिदात्मा ॥ २४ ॥ घटींचे हालतां जीवन । चंद्रमा करी कपायमान । तेवी शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखे ॥ २५ ॥ आत्मा स्वप्रकाश चित्स्वरूप । मन जड कल्पनारूप । ते मानूनि आपुले स्वरूप । त्याचे पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥ जीवाचा आप्त आवश्यक सुहृद सखा परमात्मा एक । तो मनाची न १ गाढ निद्रेच्या २ सात्त्वि कमानी देवयोनि, राजस कर्मानी मनुष्ययोनि, तामस कर्मानी पशुपक्ष्यादिकाची योनी प्राप्त होते ३ जीव निगुण असून मन लाला गुणाच्या पाशात पाहते ४ निद्रा "उचितानुचित माघ । झामुरता नाटयी जीवे"-माने वरी अध्याय १४-१८५५ ५ विचार करिता ६ शुद्ध आत्म्याला मीपणा लावून त्याला जीवपणात माणत ७ सोपाधिर, अविद्यायुक्त ८ आणि आकाशी चद्रमंडळ.