या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. पाहतां दिसेजल । परी ते कोरडे देस केवळ । तेवीं दिसे में जगईंबाळ । तें मिथ्या समूळ मायिक ॥ ८॥ जेथ मिथ्या द्रुत मायिक । तेथ परमात्मा एकला एक । तेन्हाचि हारपले सुखदुःख । कोपावया नि शेख ठावो नाही ॥ ९॥ जेथ निजात्मता एकपण । तेथ सुखदुःखें नाहीं जाण । कोणावरी कोपे कोण । आपल्या आपण एकला ।। ८१० ॥ जेथ आत्म्याचा निजानुभावो । तेथ द्वैताचा अभावो । सुखदुःखें झाली पायो । कोपासी ठावो असेना ॥ ११ ॥ हे निजात्मता नेणोनि देख । सत्य मानिती जे सुसदुःस । ते होत का वेदशास्त्रज्ञ लोक । तयां क्रोध देस विभाडी ॥ १२॥ ज्यासी सर्व भूती निजात्मता । तेथ कोण कोणा दुसदाता । कोण कोणावरी कोपता । निजात्मता एकली ॥ १३ ॥ आत्मा सुखदुःखाचा दाता । यापरी नव्हे गा तत्त्वता । आपण्या आपण व्यथा । मूर्खही सर्वथा न देती ॥ १४ ॥ एथिलेनि चौथे मते । ग्रह मानावे दुःखदाते । तेही न घडे गा येथें । ऐक निश्चिते सागेन ॥ १५॥ . ग्रहा निमित्त सुखदु सयोश्चेत् किमात्मनोऽजस जनस्य ते थे। महेहदैव बदन्ति पीडा क्रुध्येत कसे पुरपस्ततोऽन्य ॥ ५५ ॥ १ जननीजठरी जन्मे जाण । देहाचे जे नाव ह्मणती जन । ते जन्मकाळी जे होय लग्न। त्या जन्मापासून पूर्ण ग्रहगति लागे ॥ १६ ॥ तेथ द्वादशाप्टमजन्मस्य । शुभाशुभ ग्रह जे येत । ते सुखदुःखाते देत । आत्मा अलिप्त प्रगती ।। १७॥ मूळी आत्म्यासी जन्म नाही । मा मह लागती कवणे ठायी । जेय शेतचि पेरिले नाहीं । तेथ उंदिरी काची करंडावे ॥ १८ ॥ मुख्यत्वे घर केले नाही । तेथील माडी जळेल कायी । आत्म्यासी तव जन्मचि नाहीं । मा महगती कै लागेल ॥ १९ ॥ ग्रहाची ग्रहगती देहापासीं । आत्मा अलिप्त देहभावासी । जेवी काउळा न चढे कैलासीं । तेवी ग्रह आत्म्यासी न लागती ॥ ८२० ॥ जेवीं कां अग्नीत न चाखे माशी । धारी झडपिना चद्रासी । तेवी लागावया आत्म्यासी । सामर्थ्य ग्रहासी असेना ॥ २१॥ आत्मा साँचा अवघा एका त 'ग्रहाचा आत्मा तोचि देस । तया निजात्म्यासी देता दुख । ग्रह पीडी आवश्यक आपआपल्या ॥ २२ ॥ देह जड मूढ अज्ञान । ते सुखदु साचे नेणे ज्ञान । आम्यासी सुखदुःस देता जाण । ते आपण्या आपण पीडिती ग्रह ॥ २३ ॥ आपणचि आपणाप्रती । कदा न देववे दुखमाप्ती यालागी आत्म्यासी ग्रहगती । जाण कल्पाती वाधीना ।। २४ ।। ग्रहग्रहामाजी वैरस्थिती । ग्रह ग्रहाते पीडा देती । तेही अर्थीची उपेपत्ती । यथानिगुती अवधारा ॥ २५ ॥ जोतिषशास्त्रसमती । शनि भौम सूर्या वैरप्राप्ती । गुरु शुक्र दोनी वैरी होती। बुधसोमाप्रती महावर ॥२६॥ तेथ एकाची ते शीघ्रगती । एक ग्रह मंदगामी होती। अतिचार का वक्रगती। मंडळभेदें येती एकत्र ॥२७॥वैरी मीनल्या एके राशी। एके चरणी एकत्रवासी । ते राहु गिळी सूर्यासी । सूर्यचद्रासी कुह करी ॥ २८ ॥ ऐसे ग्रहचि ग्रहासी जाण । परस्परें पीडिती आपण । मी आत्मा त्याहूनि भिन्न । सुखदुःस कोण मज त्याचें ॥ २९ ॥ अलकार मोडिता सणाण | सोने मोडेना आपण । तेवीं ग्रह ग्रहासी पीडिता १दय पसारा २ पूणसत्ता, निमम तेज ३ व्यर्थ ४ वेदशाम जाणणारे ५मातेच्या उदरति ग्रहण पुख डार्षे ८पीडी देख आपण्या ९युकी १० परोयर ११ मगळ १२ अति त्वरिश गमन करणारे १३ अमावास्या भमा झणजे सूयचद्र पकन आले की भमावास्या होते १४ आनान