या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. दुःखभोक्ता । हेही नाही द्वैतकथा । जगासी एकुलता निजात्मा काळ ॥ ७२ ॥ काळ निजात्मा दोनी एक । ते कोणाचें कोणास होय सुख । कोण कोणाचा मानी शोक । द्वंद्वदुःस असेना ॥ ७३ ॥ जेवी नाममात्र मृगजळ । तेथ नाही तिळभरी, जळ । तेवीं आत्मत्वीं जगव्याळ । तो भ्रम केवळ मनाचा ॥७४॥ आत्मा एकत्वे अभेद । काळनामें तोचि प्रसिद्ध । जीव तदंशे चिदत्वे शुद्ध । त्यासी काळादि ,द्वंद्व बाधीना ॥ ७५ ॥ आगीने काय आगी जळे । का उन्हाळेनि सूर्य पोळे । सागरू बुडे लहरीवळें । की अंधाराते काळें काजळे कीजे ॥ ७६ ॥ की हिमाचळ हिमकणे कांपे । तुपासी मोडशी होय तुएँ । तै काळसत्ता खटाटोपें । आत्मा अमूपें इंढे भोगी ॥७७॥आप आपणिया आपदा । कोणा न करवे विरुद्धा । तेवी आल्यासी द्वंद्ववाधा । काळाचेनि कदा करवेना ॥७८ ॥ एवं एकात्मता अभेद । तेथ काळाचा न चले वाध । अभेदीं सर्वथा नाही द्वंद्व । कोणावरी क्रोध करावा ॥ ७९ ॥ जीव शिवत्वे मी केवळ । मीचि आत्मा मीचि काळ । मिथ्या संवादःखगोंधळ । क्रोधाचा कल्लोळ कोणावरी करू।।८८०॥काळ सुखदुःखाचा दाता। यापरी नव्हे विचारिता । सुखदुःखांची बाधकता । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ८१॥ सुखदुःखादि हेतुपट्रैक । 'नाय जनो' इत्यादिक । याचा करितां निजविवेक नव्हती बाधक आत्म्यासी ॥ ८२॥ याही वेगळी बाधकपणे । देशवासे त्रिगुणगुणे । आत्म्यासी बाधावयाकारणे । कोठे कोणी दिसेना ॥८३ || निजात्म्यासी बाधकता । कासेनि न संभवे सर्वथा । जनासी पाधक देहअहंता । त्याचि निजस्वार्था भिक्षु बोले ॥ ८४ ॥ न के चिहापि कथचनास्य द्वन्द्वोपराग परत परस्य। यथाऽहम मरतिरूपिण स्यादेव प्रबुद्धो न विभेति भूते ॥५७ ।। आत्मा गुणातीत शुद्ध । परात्पर स्वानंद । परिपूर्ण सच्चिदानंद । तेथ द्वंद्ववाध रिना ॥ ८५॥ बंद रिघावया आत्मभुवनी । कैसेनि कासेनि कोणाचेनी । कर्मकार्यनियाकरणी । वाधकपर्णी असेना ॥ ८६ ॥ अभेदा नाही द्वंद्ववाध । स्वानंदासी दुःससवंध । पूर्णासी कैचे विरुद्ध । परमानंद एकला ।। ८७ ॥ ॥ आशंका ॥ ॥आत्म्यासी न घडे द्वदसबंध । देहो जडत्वे नेणे द्वंद्व । तरी सुखदुःखांचा महावाध । कोणासी प्रसिद्ध होतसे ॥ ८८ ॥ सुखदु सभोगासी जाण । सोसावया जन्ममरण । एथ मुख्यत्वे देहाभिमनि । तेही लक्षण अतयं ॥ ८९ ।। जेवीं असोनि भर्तारापाशीं । व्यभिचार करितां अहेवेसी । पोट वाढल्याही परपुरुषी । ते कोणासी कळेना ॥ ८९० ॥ तैसे अभिमानाचे विदान । चित्स्वरूपी जडोनि जाण । मिथ्या दावूनि जीवपण । सुखदुखें आपण स्वेच्छा भोगी ।। ९१॥ जेवीं रायापाशील कुडा मंत्री । राजवळे 'अधर्म करी । प्रजेते छळी नानापरी । तैसा शरीरी अभिमान |॥ ९२ ॥ का अग्निसगे लोह जाण । अग्निप्राय होय आपण। तया हाती धरूं शके कोण । पोळी दारुण सर्वासी ।। ९३ ॥ तेवीं चिद्रूपाचा अभिमान । देहात्मता सवळोनि पूर्ण । सुखदुःखादि जन्ममरण । वाढविता कोण आवरी ।। ९४ ॥ १ लाटाच्या वळाने २ वर्षांच्या रणानं ३ जन, देवता, आत्मा, ग्रह कर्म, व काळ, हे सहा ४ कोणत्याही प्रकारे ५ मायेच्या पलीकडचा ६ आनदरूप "आरम्याकडे मी देह हा अहकार, हाच सत्या संसाराला उभारता. ९ सांभाग्यवती स्त्रीला, सपवेला १० गजव कर्तवगारी ११ कपटी १२ अमीसारखें १३ देहबुद्धीनं खरळून जाऊन