या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३० एकनाथी भागवत. पती॥ १८॥ ध्यानी मूर्ति न ये संपूर्ण । तै दृढ धरावे हरीचे चरण । तेणें उठोनि पळे जन्ममरण । आपभये आपण पळती द्वंद्वे ॥ १९ ॥ जैन धरवती दृढ चरण । ते करावे नामस्मरण । ज्याचेनि नाममाने जाण । यम काळ पूर्ण कांपती ॥ ९२० ॥ जेथ हरिनामावा नित्य घोख । तेथ मरणा मरण आले देख । जन्माचे होय काळें मुख । लाजोनि निःशेख ते पळे ॥ २१॥ रामनामाच्या गजरापुढे । काइसे द्वंद्वदुःख बापुडें । अवघे भव. भयचि उडे । नामपवाडे गर्जतां ॥ २२॥ अखंड नामें गर्जे वाणी। त्याचे बोलामाजी चक्र पाणी । तेथ ऋद्धिसिद्धि वाहे पाणी । मुक्ति आदणी तयाची ॥ २३ ॥ निर्विकल्प भावार्थ आपण । सगुण निगुण को नामस्मरण । भक्त भावार्थ आदरी जाण । तें तें होय पूर्ण सद्भावैचि ॥ २४ ।। भावार्थ जे भगवत्पीती । तेचि जाणावी साचार भक्ती । भावे तुष्टला श्रीपती । दे निजशाति साधकां ॥ २५ ॥ ते निजशांतीच्या पोटीं । हस्पती वंद्वदुःखकोटी । परमानंदें कोंदे सृष्टी । मी तूं दृष्टी दिसेना ॥ २६ ॥ ऐसेनि अभेदभावे जाण । सेवितां मुकुदश्रीचरण । मी आपणिया आपण । तारीन जाण निश्चित ॥ २७ ॥ तारीन ह्मणतां उद्धारू । बोली दिसताहे उशिरू । जो झाला हरीचा डिगेरू । त्यासी ससारू असेना ॥ २८ ॥ ऐशी भिक्षुने गाइली गाथा । ते अत्यंत रुचली श्रीकृष्णनाथा । हरिसें ओसंडोनि चित्ता । उद्धवाचा माथा थापटी ॥ २९ ॥ ऐशी 'जे हे निजशांती । माझ्या उद्धवासी व्हावी प्राप्ती । ऐसा कळवळोनि श्रीपती । काय उद्धवाप्रती वोलिला ॥ ९३० ।। श्रीभगवानुवाच-निविद्य नष्टद्रविणो गतकम प्रवज्य गा पर्यटमान इस्थम् । निराकृतोऽसद्धिरपि स्वधर्मादकम्पितोमू मुनिराह गाथाम् ॥ ५९ ॥ ज्याचे निश्विासें जन्मले वेद । ज्याचेनि चरणीं गंगा प्रसिद्ध । ज्याचें नाम छेदी भवचध । तो उद्धवासी गोविंद स्वमुखें बोले ॥३१॥ यालागीं उद्धवाचे भाग्य थोर । ज्यासी तुष्टोनि शाईधर । दाखवी निजशातीचे घर । निरतर थस्तीसी ॥ ३२ ॥ उद्धवा ऐक सावधान । धनलोभ्याचें नासोनि धन । तो धननाश झाला प्रसन्न । केला विवेकसंपन्न वैरागी॥ ३३ ॥ जो धनलोभी न साता। ज्याचें नाव न घेती सर्वथा । तोचि वैराग्ये केला सरता । माझे मुखी कथा तयाची ॥ ३४॥ त्याचे नाम माझे मुखी जाण । त्याचे कर्म वर्णी मी आपण । तो मज पढियंता जाण । जो विवेकसंपन्न वैरागी ॥ ३५ ॥ वैराग्यापरत भाग्य थोर । जगी नाही आन संधर । विवेकवैराग्य जो साचार । तो माझं जिव्हार उद्धवा ॥ ३६ ॥ जो विवेकवैराग्ये आथिला । तो जाण मजमाजी आला! मी अधीन त्याचिया चोला तो मज विकला सर्वस्वे ॥ ३७॥ लोभ्याचें निशेप गेले धन धनासवें गेले मानाभिमान । अभिमानासवे जाण । गेले इद दारुण सुखदुःख ॥३८॥ धन जाता झाली विरक्ती । तेणे नेमस्त झाला यती । भिक्षार्थ हिंडता क्षितीं । दुर्जनी दुरुक्ती निभैसिला ॥ ३९ ॥ पीडिता नाना विकारी । उपद्रविता नानापरी । ने डंडळीच निजनिधारी । स्वधर्म धैर्य करी निद्ध ॥ ९४०॥ सन्याशाचा स्वधर्म पूर्ण | मी देहातीत नारायण । साचार हरविला देहाभिमान । यालागी जाण न डंडळी ॥४१॥ जेवीं छायेसी लागता '-१ आपल्या भया २ नाहीशा होऊन जातात ३ विलय, कालक्षेप, उशीर ४ पाळ, भक ५ भिक्षची ६धनला. मिया ७ पूर्ण ८ आवडता. श्रेष्ठ १० मत करण ११ सपन्न झाला १२ निमास्त्र, नियमनिए १३ चचल होत नाही.