या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा. स्वार्थमथित । उपनिषदांचे सारभूत । वार्तिकांतर्गत रहस्य ।। ८५ ॥ येणे आपणियां आपण । लागताहे निजात्मलन । हे ज्ञानाचेही गुह्य ज्ञान । भक्तक श्रीकृष्ण बोलिला ॥८६॥ येणे जीवाचें जीवत्व उडे । शिवाचें शिवत्वही बुडे । द्वंद्वाचे वाधकत्व मोडे। स्वानंदाचे उघडे भांडार ॥ ८७॥ वेदें मौन धरिले जेथ । संशब्द शास्त्रे लाजली तेय । ऐसें अतिरहस्य भिक्षुगीत । ते मी प्राकृत बोलिलों ॥४८॥ जेवी जळीं बुडते पाषाण । श्रीराम तारिले आपण 1 तेवीं मी जड मूढ अज्ञान । बोलवी ब्रह्मज्ञान जनार्दनकृपा ।। ८९॥ अहल्या जे व्यभिचारिणी । ते लागतां श्रीरामचरणीं । तिचेनि नामें पापा धुणी। प्रातस्मरणी पढविली ॥ ९९० ॥ तेवीं सद्गुरुकृपेची करणी | माझी प्राकृत जड मूह वाणी मानिजे साधुसज्ञानी । तेशी बोलणी बोलविली ॥९१॥ सरस्वती ज्यासी घोळे । तो मुकाही वेदशास्त्र बोले । तैसें जनार्दने आह्मां केलें । भिक्षुगीत बोलविलें भाकृत ॥ ९२॥ राजमुद्रा चढे ज्याचे हाती । त्यातें समस्त सन्मानिती । तेवी माझी वाणी सरती । केली निश्चिती जनार्दनें ।। ९३ ।। वाळकाची बोबडी वाणी । ऐकोनि सतोपे निजकजननी । तेवी माझी आरिख पाणी । सतसज्जनी प्रियकर ॥ ९४ ॥ मी माझें उंच नीच बोलणे । हेही माथा ध्यावे कोणे । मीपण नेऊनि जनार्दने । ग्रंथकथनें कथवित ॥ ९५ ॥ आधीच हे श्रीभागवत । त्यामाजी गूढ एकादशार्थ । त्याहीमाजी भिक्षुगीत । अतिगुह्यार्थ निद ॥९६ ॥ त्या भिक्षुगीताची टीका । एकला कर्ता नन्हे एका । ते एकपण हिरोनि देखा । ग्रथार्थलेखा जनार्दन वदवी ॥ ९७॥ तेथ एक ना अनेक । ऐसे जनार्दनं केलें देख । त्यावरी द्वंद्वसाम्यकवतिक । ग्रंथ सम्यक वाखाणवी ॥ ९८॥ एका जनार्दना शरण । जनार्दनू झाला एकपण । ऐसेनि एकत्यें जाण । केले सपूर्ण भिक्षुगीत ।। ९९ ॥ माझे निजगुरूंचाही गुरू । श्रीदत्त परमगुरू । तो भिक्षुगीतार्थे साचारू। योग्या योगेश्वरू तुष्टला ॥१००० ॥ तेणे तोखलेनि अद्भुतें । आदरें आश्वासूनि माते । अभय देऊनि निजहस्ते । पूर्ण अथार्थे डुलतू ॥१॥ एका जनार्दना शरण । श्रोता व्हावे सावधान । पुढील अध्यायीं श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुपलक्षण सांगेल ॥ २ ॥ ते प्रकृतिपुरुषाची कथा । विवंचना हृदयीं धरिता । मी सुखदुःखद्वंद्वापरता । निजात्मता निजबोधू ॥३॥ सतसजना साष्टाग गमन । श्रोतेजनांसी लोटागण । एका विनवी जनार्दन । अतिगोड निरूपण पुढे आहे ॥ ४ ॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकाया भिक्षुगीतनिरूपण नाम त्रयोपिशतितमोऽध्यायः ॥ २३॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥ २३ ॥ श्लोक ॥६२॥ ऑच्या ॥१००४ ॥ ॥ एकूण ।। १०६६ ॥ ॥ ॥ ॥ ॥ दशास्त्रे २ नाश ३ 'भहल्या द्रौपदी सीता' या श्लोकाच्या द्वारे ४ प्रसन्न होते ५ राजाधिकाराचा शिक्षा अधिकारयुक्त, प्रमादयुक्ता ७ आप, सस्कारहीन, वेडीवाकडी, आरप र उत्तम प्रकारानं ९जनार्दनस्वामींचे गुरु श्रीदत्तानेय होत व त्यानी थाना 'आदराने आवासिलं' व 'निजहस्ते अभय देऊन 'खानी केलेले ह विवरण ऐकून खानदाने डोलू लागले धीएकनाथाच्या चरित्राचा विचार करताना या ओंव्याचे महत्व काम आहे ते भाविकांनी पहावे. १० प्रसन्न मारल्याने ए भा. .