या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत व्याघ्रसिंहांचें दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे । परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढ़ें मनुष्यां ॥४३॥ व्याघ्रसिंहदुधासाठी । अतिसवळता जोडे पुष्टी । परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठी कदा नव्हे ॥ ४४ ।। ह्मणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी । मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचे अमृत निरोगी करी केवीं॥४५॥ व्याघसिहदुग्धशक्ती प्राणी जै अजरामर होती । ते तेणे दुग्धे ज्यांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥ ४६॥ जै हरिभक्ताची भेटी घडे । ते न वाधी संसारसांकडें । जन्ममरण समूळ उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्ये ॥ ४७ ।। आजि मी भाग्य सभाग्य पूर्ण । लाधलो तुमचे दर्शन । तरी 'आत्यतिकै क्षेम' कोण । ते कृपा करून मज सांगा ॥४८॥ ___ अत आत्यन्ति क्षेम पृच्छामो भवतोऽनया । ससारेऽस्मिन्क्षणार्णोऽपि सत्सङ्ग शेवधिणाम् ॥ ३० ॥ __ ह्मणो तुली निप्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शने तत्काळ । नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुझी सर्व ॥ ४९ ॥ स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ 'जगा । ते गंगाही निजपापभंगा। तुमचे चरणसगा वाछित ।। २५०॥तुमची दर्शनसगचिद्गा । अत्यंत दाडगी माजी जगा । दर्शनमात्रे ने भवभंगा । जन्ममरण पै गा मग कचे ॥५१॥ तेथे कायमा गंगेचा पडिपाडु । नाही तीर्थमहिमेसी पवाडु । तीर्थों भवदोप अवघडु । त्यांचा करी निवाडू दृष्टिसगे ॥ ५२ ॥ ऐशी पवित्रता प्रवळ । दृष्टिंवत्सगी वार्डवा सकळ । आजि जालो मी अतिनिर्मळ । तुह्मी दीनदयाळ मीनलेती ।। ५३ ॥ ऐसे पवित्र आणि कृपामूर्ती । भाग्ये लाधली हे सगती । मत्संगाची निजख्याती । सांगतां श्रुति मौनावल्या ॥५४॥ ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखे ब्रह्मत्व ये ब्रह्मा । त्या सत्सगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥ ५५ ॥ सत्सग ह्मणो निधीसमान । निधी जोडल्या हारपे जाण । सत्सगाचे महिमान । साधका सपूर्ण सद्रप करी ॥ ५६ ॥ निधी सापडलिया साग । अत्यत वादे विपयभोग । तैसा नव्हे जी सत्सग । निविपर्य चाग सुखदाता ॥५७॥ इंद्रियावीण स्वानदू । विपयावीण परमानदू । ऐसा करिती निजबोधू । अगाध साधु निजमहिमा ॥५८ ॥ निमिपार्ध होता सत्सग । तेणे सगें होय भवभंग। यालागी सत्सगाचे भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥ ५९॥ सतचरणी ज्याचा भावो । भावे तुष्टती सत स्वयमेवो । सतसन्निधिमात्र पहाहो । ससार धावो स्वयं होय ॥ २६० ॥ नाना विकार विपयविधी । ससार सवळत्वे वाधी । त्या ससाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्सग ।। ६१ ॥ दीपाचिये सगप्राप्ती । नि.शेप कापुरत्वाची शाती। तेवी जाहलिया सत्सगती । ससारनिवृत्ती क्षणार्धे ॥ ६२ ॥ ते तुमची सत्सगती । भाग्य पावलो अवचिती । आत्यतिक क्षेम कैशा रीती। प्राणी पावती ते सागा ॥ ६३ ॥ आत्यतिक क्षेमाचे धर्म । जरी ह्मणाल भागवतधर्म । त्या धर्माचा अनुक्रम । साझ सुगम सागा जी ।। ६४ ॥ धर्मान्मागनतान्यून यदि न श्रुतये क्षमम् । ये असा प्रपन्नाय दासत्यात्मानमयज ॥ ३१ ॥ परिसावया भागवतधर्मी । श्रवणाधिकारी असो जरी आही । तरी कृपा करूनि तुली । - - -- १ नोहे २ सेपिनो ३ मसारसबंधी संकट ४ मर चिरकाल टिकणार कल्याण (हित) ५दर्शनसनंगा समर्थ पाट.मोठेप योरवी इष्टीच्या मादीचर रिमानसन ९ बाडवितो १. मोठेपणा ११ ठेवा १२ उत्तम १३ स्वमेवो १४ गोटा, मिस्या १५ शेवट १६ प्रपचापासून मुफ होणे १७ निखपि १८ तात्पर्य