या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४२ एकनाथी भागवत. त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चिती उद्धवा ।। ८१॥ जे न करितीचि माझी भक्ती जे नायकतीचि माझी कीर्ती । जे माझें रामनाम नुच्चारिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२॥ त्यांसी पुनःपुनः स्वर्गलोक । पुनःपुनः भोगिती नरक । पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनी दुःख भोगिती ॥ ८३ ॥ जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म । त्यांसी त्रैलोक्याबाहेरी निर्गमे । त्रिगुणधर्म निधो नेदी ।। ८४॥ सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना । लोकी लोकांतरगणना। समूळ जाणां सांगेन ।। ८५ ॥ रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी । तळी पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरी निवास ॥ ८६ ॥ पार्थी चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्याऐलीकडे । भुवर्लोकींची 'थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वा ॥ ८७ ॥ भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी । पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारी रविलोक ॥ ८८ ॥ वायूपासूनि चक्राकारी। रविचंद्रतारालोक कुसरी । खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९॥ त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणे कालू तत्त्वता । क्षणलवनिमिपावस्था । अधिकन्यूनता होऊ नेदी ॥ १९० ॥ नवल काळचक्रगती । मौसा रवि चंद्र समान होती। सूर्याआड चंद्राची गती । जाण निश्चिती दिनद्वयें ॥ ९१॥ ते अमावास्यापतिपदेसी । चंद्रचंद्रमंडळी सावकाशी । सूर्यसमभागें गमन त्यासी। ते या लोकासी दिसेना ॥ ९२॥ इत. क्यासाठी ते दिवशी । जीवें जित्या चंद्राशी । नटत्व स्थापिती ज्योतिपी। तें या लोकांसी सत्य माने ॥ ९३ ॥ रवि चंद्र एकासनी । सर्वथा नव्हती गमनीं । लक्षातरें बसती दोन्ही। मंडळसमानी मासांती गती ॥ ९४ ॥ रविआड गति ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सागे ज्योतिपी । सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५॥ दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्री सत्य पहा हो। न दिसे त्याचा अस्तभावो। दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥ अभ्राआड ग्रहण झाले । देखिले तेथे पर्व फावले । न दिसे ते देशी नाहीच झालें। येणे बोले वर्तती ॥ ९७ ॥ रविचंद्राहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती । ते जै मंडळाआड येती । तें ग्रासिले ह्मणती रविचंद्रा ॥ ९८ ॥ राहु सूर्या गिळिता साचें। ते तोंड जळते राहूचें । मंडळी मंडळ आड ये त्याचें । हे सर्वग्रासांचे संमत ॥ ९९ ॥ सूर्य सूर्यमंडळी राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी । ज्योतिपी सांगे घरोघरीं । ते देखोनि नरी महाशब्द कीजे ॥ २०० ॥ सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक वॉव उठी। शेखी" रविराईसी नाही भेटी । स्पर्शही शेवटी असेना ॥१॥ ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं रविचंद्रादि चालणें नाहीं । ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाही चालती ॥२॥ रविलोकाहूनि वरी। चंद्रलोक लक्षातरी । चद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरी तोरालोक ॥३॥ तारालोकाहूनि वरी। बुधलोक दो लक्षातरी । बुधलोकाहूनि वरी । दों लक्षातरी शुक्रलोक ॥४॥मिळोनियां दैत्यगण ज्याच्या चरणा येती शरण । नित्य घालिती लोटागण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५॥ शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक बसे १ सुटका २ जडित करून, भूपित करून खेवण झणजे भूषण ३ फिरवितो ४ महिन्याने ५ अमा , मणजे एकन, पास हणजे राहणे सूर्य, चद्र एकन राहतात हाणून अमावास्या ६न्याय, नियम ७ अलीकडे ८ सप्रास प्रहणाच, सपंथा सार्च कोलाइल, १० वास्तविक पाहतां ११ क्षिप्रलोक १२ मगळलोक