या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविसावा ६४३ अंवरी । भौमलोकाहूनि दो लक्षांतरी । देवगुरु करी निजवासू ।। ६ ।। ज्याचे चरण चंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क । नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥ त्याहीवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी । लक्षातरे तेथूनी । सप्तऋपिजनी निवासू ॥८॥ सप्तऋषींची ऋपिपक्ती । तेचि वसे अरुंधती । यावरी बसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥९॥ जेध अगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण । पार्षदगण मरुद्गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥ उच्चैश्रया वारू जाण । कल्पतरूंचे उद्यान । कामधेनूंचें गोधन । नदनवन कीडेसी ॥ ११ ॥ जेथींच्या पायन्या चितामणी । रभा उर्वशी विलासिनी । अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रगणी नादती ॥ १२॥ येणे वैभवे अमरावती । इन्द्र तेथील अधिपती । येथूनि स्वर्गाची समाप्ती । त्रैलोक्य निश्चिती या नाय ॥ १३ ॥ आता त्रैलोक्याबाहेरी । एक लक्ष योजनावरी । भक्तकृयालू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥१४॥ त्रिलोकी होतां प्रळयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ । तो सर्वदा अचळ । यालागी अढळ ध्रुवपदः ॥ १५ ॥ पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण । तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥ तेथूनि कोटि योजने देख । वरुता असे जनोलोक। तेध वसती सनकादिक । ऊधरेते देख महायोगी ॥ १७ ॥ तेथूनि दोन कोटी अधिक । बसताहे तपोलोक । तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥ तपोलोकाहनि देख। चौकोटी उंच अधिक । तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतरोनन ॥ १९ ॥ तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध । मूर्तिमत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमत ॥ २२० ।। गायत्री मूर्तिमत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत । दया मूर्तिमंत नादत । योग मूर्तिमत ब्रह्मसदनीं ।। २१॥ तेथ अग्नि तिनी मूर्तिमंत । ते एकरूपं त्रिधा भासत । सत्य सत्यलोकी मूर्तिमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥ ते लोकी यसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक जे ब्राह्मणतीर्थप्राशक । जे यागउपासक निष्काम ॥ २३ ॥ जे ब्राह्मणकार्यों निमाले । जे गोसरक्षणी जीचे गेले । जे परोपकारार्य वेचले। ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥जे निष्काम द्विजा भजले । जिहीं निष्काम द्विज पूजिले । जिहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५॥ जे कृपाळु दीनार्य देख । जे कृपाळु बधमोचक । जे सत्यवादी सात्विक ा ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥जे परोपवादी मैक। परादानसका जे परद्रव्या पराडाखाते सत्यलोकनियासी ॥२७॥ ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेधींचा ब्रह्मा अधिपती । ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चिती उद्धवा ॥ २८ ॥ ब्रह्माडाहनि धेगळा । कैलास निर्माण करी भोळा । वैकुंठ रची घनसावळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥ होता ब्रह्माडा घडमोडी । चकुंठ कैलास न लगे वोढी । तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३०॥ तेथ नाही काळाचें गमग । नाही कर्माचे कर्मबंधन । तेथ नाही जन्ममरण । हे भक्त अनन्य पावती ॥ ३१॥ वैकुठकैलासरचना । सागतां मन मुके मनपणा । ते लोकींची १पृहस्पति २इंद्रनगरी ३ समासद् ४ घोडा ५ बाग ६ नाचणान्या खिया, नृत्यागना निबर ८ एक पलापर्यंत जगणारे ९ कधीही रेतस्सलन होत नाही असे ब्रह्मचारी १० चार कोटी ११ महादेव ...२ गाईपाय, दक्षिणाति, भाहपनीय १३ जेवू घातले १४ परदीप फाइभ्याविषयों मुफे. १५ यरोखर